Site icon Desh Varta

भीमा कोरेगाव येथे शोर्य दिनाची जय्यत तयारी पुर्ण ! पोलिसांची मोठी तुकडी तैनात

भीमा कोरेगाव येथे यंदा विशेष आकर्षन !

शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती लाखो अनुयायी कोरेगाव भीमा या ठिकाणी येत असतात आणि त्याची जयत तयारी पुणे पोलीस त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवरती यावर्षी पोलीस आयुक्तालयासह अधीक्षक 707 त्याचबरोबर अधिकारी 5500 त्याचबरोबर अंमलदार जे आहेत तेही या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. 2100 होमगार्ड त्यांच्या तुकड्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. एक तारखेला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनेक भीम अनुयायी भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात आणि त्याची जयत तयारी सध्या या ठिकाणी पुर्ण झालेली आहे. दरम्यान सुरक्षितच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून 165 सीसीटीव्ही कॅमेरे लावन्यात आलेले आहेत तसेच त्याचबरोबर सहा ड्रोन कॅमेरे आणि पीए सिस्टीमची व्यवस्था जी आहे, ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पिण्याचं पाणी असेल त्याचबरोबर टॉयलेट असेल सर्व व्यवस्था जिल्हा परिषद त्याचबरोबर समाज कल्याण विभागाकडून या ठिकाणी करण्यात येते.

भीमा कोरेगाव विजय स्तम्भला क्रुत्रिम फुलांची सजावट ?

207 वा हा शौर्यदिन आहे जी रेग्युलर नेहमीची फुलं असतात त्या फुलामुळं मोठा अडचण जी आहे ती या स्तंभाला भविष्यात निर्माण होईल असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आणि त्यानंतर यावर्षी पासून कृत्रिम फुलं वापरण्याचा निर्णय जो आहे तो संयोजन समितीने घेतलेला आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे जाणार्या वाहतुकि मध्ये बदल!

अभिवादन करायला येनार्या अनुयायांकरिता प्रशासनाच्या माध्यमातुन 45 पार्किंग सेंटर त्या 30 हजार कार आणि 30 हजार दुचाकी पार्किंगची व्यवस्था 650 बसेसची व्यवस्था 300 सीसीटीव्ही दोन मोबाईल सर्वेलन्स 10 ड्रोन 50 पोलीस टॉवर चोरी रोखण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक परिसरात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे घोषित करण्यात आलाय सोशल मीडिया वापरावर निर्बंध असणार आहेत नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हे बदल असतील.

पुण्याहून अहिल्या नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी गुंडवा केडगाव चौखोला नावरा शिरूर मार्गे नगर रस्त्याला लागावं तसेच सोलापूर रस्त्याने आळंदी चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर मगरपट्टा चौक खराडी आणि बाह्य वळण मार्गावरून विश्रांत वाडीकडे जावे व मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ चाकण खेड मंचर नारायणगाव आळेफाटा मार्गे जावं असे मार्ग प्रशासनाकडुन ठरवुन देन्यात आलेले आहेत.

भीमा कोरेगाव शौर्य दिन इतिहास

एक जानेवारी 1818 रोजी इंग्रजांच्या लष्करातील नागवंशीय म्हणजेच महासैनिकांनी पुणे जवळच्या भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव या गावी बाजीराव पेशव्यावर आक्रमण करून 500 महारसैनिक व पांच इंग्रज अधिकारी या युद्ध सामुग्रीने पेशव्यांच्या 25000 घोडदळ 3000 अरब सैनिक आणि 5000 पायदळ यांना करून पेशवाईचे पानिपत केले त्यालाच भीमा कोरेगाव चरण संग्राम असेही म्हणतात.

डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांनी भीमा कोरेगाव विजय स्तम्भाला अभिवादन केले तेव्हा!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार विजय स्तंभाला साक्षी ठेवून बहिष्कृतांचे हक्क मिळवून देण्याच्या चळवळीला प्रारंभ केला एक जानेवारी 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले या महार महायोद्ध्यांना त्यांनी मानवंदना दिली आणि महारांचा नष्ट होऊ पाहणारा इतिहास बाबासाहेबांनी जिवंत केला तर महार सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास पाहायचा झाला तर 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रजांच्या लष्करातील महार म्हणजेच नागवंशीय सैनिकांनी पुणे जवळच्या भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव या गावी बाजीराव पेशव्यावर आक्रमण करून 500 महार सैनिकानी २८००० पेशव्याना परास्त केले.

महार सैनिकांच्या या लढाईच्या विजयानंतर इंग्रज सरकारने त्यांच्या स्मरणात विजयस्तंभ उभारण्याचे ठरवले तर 1821 मध्ये भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाच्या कार्यास प्रारंभ झाला 1822 मध्ये इंग्रजांनी विजय स्तंभाचे काम पूर्ण केले या विजयस्तंभास महारस्तंभ असे नाव होते स्वतंत्र महार रेजिमेंटची उभारणी झाल्यानंतर 1941 ते 1946 पर्यंत या विजय स्तंभाचे चिन्ह त्यांच्या कॅम्प बॅच वर गौरवाने घेण्यात आले होते आणि महारेजिमेंटचे मुख्यालय सागर मध्यप्रदेश येथे या स्तंभाची प्रतिकृती युद्ध स्मारक म्हणून करण्यात आली आहे भीमा कोरेगाव येथील महारस्तंभावर भीमा कोरेगाव अभूतपूर्व लढा 20 शहीद व तीन जखमी झालेल्या महार योद्ध्यांची नावे येथे कोरली गेली आहेत व याच महार विजय स्तंभाला बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षी ठेवून 19 व 20 मार्च 1927 रोजी होणाऱ्या महार क्रांती लढ्याचे रणशिंग फुंकले क्रांतीच्या नव्या पर्वाला येथून सुरुवात झाली.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version