Railway Good News भुसावळ–नागपूर मार्गावर वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अनारक्षित विशेष मेमू गाडी जाहीर केली आहे. या निर्णयाचा खानदेश व विदर्भातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Railway Good News प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय! भुसावळ–नागपूर विशेष मेमू गाडी धावणार
भुसावळ–नागपूर मार्गावर धावणार अनारक्षित विशेष मेमू गाडी; Railway Good News हजारो प्रवाशांना दिलासा
महाराष्ट्रात आणि विदर्भाची वाढती प्रवासी संख्या आणि त्यातून निर्माण होणारी प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ–नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाडी सुरु करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि खानदेश या दोन प्रमुख विभागांना जोडणाऱ्या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो नाही तर लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
Railway Good News भुसावळ–नागपूर विशेष मेमू गाडी कोणत्या दिवशी आणि वेळेवर सुटेल?
भारतीय रेल्वे प्रशासनाच्या भुसावल विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गाडी क्रमांक 01101 ही अनारक्षित विशेष मेमू गाडी शनिवारी (ता. 9) आणि रविवारी (ता. 10) भुसावळ स्थानकावरून सकाळी 6.50 वाजता सुटणार आहे. तसेच ही गाडी मार्गावरील सर्व निर्धारित स्थानकांवर थांबत दुपारी सुमारे 2.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे ही मेमू गाडी परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01102 ही विशेष मेमू गाडी याच दिवशी नागपूर स्थानकावरून दुपारी सुमारे 3.00 वाजता सुटणार असून रात्री 11.40 वाजताच्या सुमारास भुसावळ येथे दाखल होईल असे सांगण्यात आले आहे.
Railway Good News भुसावळ–नागपूर विशेष मेमू गाडी कोणत्या स्टेशन वर थांबेल?
या विशेष मेमू रेल्वे गाडीला भुसावल वरुण निघाल्या नंतर बोदवड, मलकापूर, नादुरा, जळंब, शेगाव, अकोला, बोरगाव, मूर्तिजापूर, बडनेर, चांदूर, धामणगाव, वर्धा आणि अजनी अशा प्रकारे एकूण 13 स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
भुसावल नागपुर ला सोडण्यात आलेल्या या विशेष मेमू गाडीचे सर्व थांब्यांमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील प्रवाशांना थेट नागपूर व भुसावळकडे जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः अकोला, शेगाव, मूर्तिजापूर आणि बडनेर या प्रमुख जंक्शनवरील प्रवासी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भुसावल नागपुर ही विशेष मेमू गाडी 12 डब्यांची संरचना असलेली असून ती पूर्णतः अनारक्षित असल्यामुळे आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर अनेक गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठीच ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे.
तसेच आठवड्याच्या शेवटी तसेच सण-उत्सवांच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने ही विशेष गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

