Site icon Desh Varta

भूषण गवई यांच्या वकिली ते सरन्यायाधीश कारकीर्दीचा प्रवास ?

मराठमोळ्या भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर वर्णी; देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ

भारतीय संविधानानुसार देशाचे महत्वाचे पद असनारे सरन्यायाधीश या पदावर मराठ्मोळे व विशेष म्हणजे विदर्भातील व्यक्ती श्री. भुषण गवई यांची नियुक्ती झालेली आहे. भारताचे आताच्या घडीला असनारे विद्यमान सरन्यायाधीश श्री. संजीव खन्ना हे १३ मे २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी या पदावार सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची देशाचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्या उपस्थितीत पदाचा १४ मे रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा वयक्तिक परिचय ?

जन्म: २४ नोव्हेंबर १९६०, अमरावती, महाराष्ट्र

वडील: रामकृष्ण गवई, (रा. सु. गवई)  माजी खासदार व राज्यपाल, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते

आई: कमलाताई गवई

शिक्षण: कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८५ साली वकिलीस सुरुवात

प्रारंभिक काळात: दिवंगत बॅरिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम

 

न्यायमूर्ती भूषण गवई यांचे महाराष्ट्र असनारे नाते ?

२४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म झाला. त्यानी कला व कायदा या संदर्भात पदवी ही नागपुर विद्यापीठातून प्राप्त केली आहे. तसेच त्यांचे वडील राज्यसभेचे खासदार, केरळ व बिहार चे राज्यपाल श्री. रामकृष्ण गवई हे राहीलेले आहेत. त्यांच्या परिवाराचा आंबेडकरी चळवळीशी जवळचा संबंध राहीलेला आहे.

भूषण गवई यांच्या वकिली ते सरन्यायाधीश कारकीर्दीचा प्रवास ?

·         1992-93 या कालखंडात ते नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत होते.

·         सन 2000 मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणू नियुक्ती.

·         भूषण गवई यांची 14 नोव्हेंबर 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

·         त्यानंतर 12 नोव्हेंबर 2005 मध्ये त्याना मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नेमन्यात आले. तसेच

·         २४ मे २०१९ पासुन त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. व आता, १४ मे २०२५ पासून त्याना देशाचे सरन्यायाधीश म्हणून नेमन्यात आलेले आहे.

 

भूषण गवई हे सरन्यायधिश म्हणून किती काळ पदावर राहतील ?

भूषण गवई यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ हा १४ मे २०२५ रोजी सूरु होनार आहे तर ते २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच सहा महिने एवढाच त्यांचा कार्यकाळ असणार आहे. हा कार्यकाळ जरी त्यांच्याकरिता लहान असला तरी, या काळात ते कोणती महत्त्वाची प्रकरणं हाताळतात आणि काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशासोबतच महाराष्ट्राचंही विशेष लक्ष असेल.

न्यायमुर्ती भूषण गवई यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि योगदान 

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे ते खालीलप्रमाणे आहेत.

देशाच्या सुप्रीम कोर्टाचा इतिहास फेडरल कोर्ट ते सर्वोच्च न्यायालय

भारताचे सर्वोच्च न्यायालय हे संविधान लागु झाल्यानंतर म्हणजेच २८ जानेवारी १९५० रोजी अस्तित्वात आले, पण त्याआधी याला फेडरल कोर्ट ऑफ इंडिया म्हटले जात होते व याची सुरुवात हि १ ऑक्टोबर १९३७ रोजी सुरू झाली होती. तेव्हा हे न्यायालय संसद भवनातील चेंबर ऑफ प्रिन्सेस मध्ये कार्यरत होते. पहिले सरन्यायाधीश सर मॉरिस क्वायर, आणि त्यांच्यासोबत सर शहा मोहम्मद सुलेमान व एम. आर. जयकर होते.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version