Site icon Desh Varta

JNV Hingoli विद्यार्थ्यांच्या आवाजात जागले अन्नाभाऊ साठे! नवोदयमधील प्रेरणादायी कार्यक्रम प्राचार्यांच्या हस्ते पुष्पांजली !

JNV Hingoli शिक्षकांच्या हस्ते पुष्पांजली, विद्यार्थ्यांच्या आवाजात इतिहासाचे स्मरण !

नवोदय Hingoli  विद्यालयात भव्य Assembly अन्नाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तसेच बाल गंगाधर टिळक पुण्यतिथीचे आयोजन

JNV Hingoli बसमतमध्ये विद्यार्थी झाले सूत्रधार, सभागृह दुमदुमले प्रेरणेने!

जवाहर नवोदय विद्यालय, बसमत येथे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळच्या सत्रात एका सुंदर आणि शिस्तबद्ध Assembly मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवोदय मधील सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे नवोदय गीताने करण्यात आली, ज्यामध्ये संपूर्ण विद्यालयातील शिक्षकवृंद सामील झाले होते. आजच्या या Assembly मध्ये विशेषत्व म्हणजे, तिचे आयोजन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या त्यांच्या उपक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि व्यासपीठावर बोलण्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत झाली.

JNV Hingoli कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृद्र शिंदे याने केले. त्याने त्याच्या सहज व आत्मविश्वासपूर्ण शैलीत संपूर्ण कार्यक्रम आपल्या शांत बोलण्याने चालवला. त्याने भारताची प्रतिज्ञा म्हणन्याकरिता आनंद निरगुडे याला, मंचावर बोलाविले ज्याने संपूर्ण विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली. त्यानंतर दिवसाची सुरुवात एका सकारात्मक ऊर्जेने व्हावी यासाठी यश कराळे याने एक प्रेरणादायी सुविचार सर्वांपुढे सादर केला.

त्यानंतर पुढे, समृद्ध या विद्यार्थ्याने कालच्या दिवसातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सर्व विद्यार्थ्यांपुढे सादर केला. त्यानंतर दिनविशेष या सत्राचे सादरीकरण करताना या सदराअंतर्गत हनुमान सावंत याने लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ‘व्यक्तिविशेष’ सादर केला. त्या लहानश्या विद्यार्थ्याने अन्नाभाऊ साठे यांच्या लहानपणापासून ते शाहिरी आणि सामाजिक चळवळीतून ते प्रबोधनकार कसे बनले, हे ओघवत्या शब्दात मांडले.

JNV Hingoli Assembly Quiz Presentation

यानंतर विद्यार्थ्यापुढे प्रश्नमंजुषा सादर करताना आदर्श या विद्यार्थ्याने अचूक तयारी करून आलेल्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि त्यांच्यात जिज्ञासेची भावना जागवली.

 

JNV Hingoli अन्नाभाऊ साठे जयंती आणि बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

Assembly संपल्यानंतर लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांची जयंती व बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्ताने एक विशेष वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या सन्मानपर घटनेत विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. जे. गवई सर, नवोदय विद्यालय बिड चे प्राचार्य श्री. बोस सर आणि वरिष्ठ शिक्षक श्री. गायकवाड सर ह्यानी प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.

अन्नाभाऊ साठे यांची जयंती व बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात

या कार्यक्रमाचे संचालन राजश्री खोकले हिने अतिशय प्रभावी शैलीत केले. तिने कार्यक्रमाची सुरुवात काही ओळींनी केली:

> “तू उठ आता सत्वर

> हे तुडवून दंगेखोर

> म्हणे अन्ना साठे शाहिर

> सावरून धर

> तू शांती ध्वजा सत्वर”

या ओळींमुळे सभागृहात एक प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तिने अन्नाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याकरीता गौरी आसोरे हिला आमंत्रित केले.

JNV Hingoli अन्नाभाऊ साठे जयंती निमित्त विद्यार्थी भाषण

गौरीने आपल्या सादरीकरणात अन्नाभाऊ साठे यांचे लहानपणातील संघर्ष, भटकंतीचे दिवस, त्यानी वयाच्या केवळ १४ व्या वर्षी मुंबई गाठल्यावर अनुभवलेला हलाखीचा जीवनप्रवास, आणि त्यांच्या टोकाच्या दारिद्र्यातून शाहिरी काव्याची सुरुवात आणि ‘फड शाहिरी’चे माध्यम वापरून समाजप्रबोधनाचे काम कसे केले, हे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या अनुभवातुन “सामाजिक वास्तवावर आधारित साहित्यातून त्यांनी श्रमिक आणि उपेक्षित समाजाचे दु:ख मांडले” हे गौरवपूर्ण योगदान गौरीने ठळकपणे सांगितले.

त्यानंतर पुन्हा सूत्रसंचालिका राजश्रीने एका प्रेरणादायी ओळींनी प्राजक्ता हिला व्यासपीठावर आमंत्रित केले:

> “योग्य रस्ता येण्याची वाट पाहता

> आम्ही आमचे दिवस घालविले

> परंतु हे विसरतो की रस्ते

> वाट बघण्यासाठी नव्हे

> तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत”

प्राजक्ताने थोडक्यात पण प्रभावी पद्धतीने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तिने टिळकांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे तिलकांचे ध्येय, त्यांच्या केसरी आणि मराठा पत्रिकांमधून दिलेली वैचारिक लढाई, टिळकांच्या शिक्षणावरील विश्वास यांचा उल्लेख केला.

प्राचार्य श्री. बोस सरांचे मार्गदर्शन: विद्यार्थी मंत्रमुग्ध

विद्यालयातील कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे, नवोदय विद्यालय बसमतचे संस्थापक शिक्षक व सध्या बिड येथे कार्यरत असलेले प्राचार्य श्री. बोस सर यांची उपस्थिती. त्यांच्या ओजस्वी भाषणात त्यांनी नवोदय विद्यालयाची स्थापना, त्यामागील उद्दिष्ट, ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी याबद्दल सखोल माहिती दिली.

त्यांनी आपल्या भाषणात नवोदयमधील माजी यशस्वी विद्यार्थ्यांचे उदाहरण देत तत्कालीन विद्यार्थ्याना प्रेरणा दिली. त्यांनी सांगितले की, “याच नवोदयमधून शिकलेली मुले आज देशात वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करत आहेत.” त्यानंतर त्यांनी अन्नाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांचा सामाजिक आणि राष्ट्रीय विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवताना त्यांच्या संघर्षाचा आदर्श घेण्यास उद्युक्त केलं.

निष्कर्ष / उपसंहार

या संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवी चेतना निर्माण झाली. नवोदय विद्यालय बसमतने एकीकडे नव्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिलं, तर दुसरीकडे दोन महान विभूतींच्या स्मृतींना अभिवादन करत प्रबोधन आणि प्रेरणेचा संगम घडवून आणला. हा कार्यक्रम निश्चितच विद्यार्थी व शिक्षकांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाणारा ठरला.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version