Buddha Dhamm वैशाख पौर्णिमा 2026 भगवान बुद्धांच्या जीवनातील अतिशय पवित्र दिवस, महत्त्व, इतिहास आणि साजरी करण्याची योग्य पद्धत
Buddha Dhamm तील वैशाख पौर्णिमे विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या – तथागत भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, त्यांचे महापरिनिर्वाण, इतिहास, महत्त्व आणि साजरी करण्याची पद्धत.
आपल्याला माहितच आहे की, वैशाख पौर्णिमा, ज्याला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते, बुद्ध धम्मात हा दिवस तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांशी संबंधित आहे. हा सण केवळ बौद्ध धर्मीयांसाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी शांतता, अहिंसा आणि करुणेचा संदेश देणारा जागतिक सन आहे.
वैशाख पौर्णिमा म्हणजे काय? Buddha Dhamm या पोर्णिमेला नेमके काय घडले?
वैशाख महिन्यात तथा साधारण पणे में महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा. या दिवशी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनात महत्वाच्या घटना घडल्या :
- सिद्धार्थ गौतमाचा (बुद्धाचा) जन्म
- सिद्धार्थ गौतमाची पत्नी अर्थात माता येशोधरा जन्म
- त्यांचा विवाह
- त्यांचा प्रिय घोडा कंठक याचा जन्म
- त्यांचा सारथी चन्ना याचा जन्म
- सिद्धार्थ गौतमास ज्ञानप्राप्ती (ज्ञानप्राप्ती नंतर बुद्ध)
- महापरिनिर्वाण
ह्या सर्व महत्त्वाचे घटना ह्या वैशाख पोर्णिमेला घडलेल्या आहेत असे मानले जाते तथा ईतिहासकार सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक शिलालेख यावरून ते स्पष्ट झाले आहे.
Buddha Dhamm बुद्ध पोर्निमेचा इतिहास आणि पार्श्वभूमी
- जन्म (Birth)
वैशाख पोर्णिमेला ई.सन. पूर्व. ५६३ ला गौतम बुद्ध (सिद्धार्थ) यांचा तेव्हाचे कपिलवस्तु व आताचे नपाळ या ठिकाणी त्यांचा जन्म लुंबिनी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव माता महामाया आणि वडिलांचे नाव राजा शुद्धोधन होते.
- ज्ञानप्राप्ती (Enlightenment)
वयाच्या २९ व्या वर्षी आषाढ़ पोर्णिमेला त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केल्या नंतर त्यांनी ६ वर्ष तपश्चर्ये केली व् नंतर बोधगया येथे बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमास ज्ञान प्राप्त संबोधि प्राप्त झाले.
- महापरिनिर्वाण (Mahaparinirvana)
ई. सन. पूर्व. ४८३ ला भगवान गौतम बुद्धानी मल्ल देश अर्थात कुशिनारा व आताचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आपला देहत्याग केला, ज्याला महापरिनिर्वाण असे सम्बोधितात.
Buddha Dhamm त वैशाख पौर्णिमेचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व
बुध्द जगतात हा दिवस सत्य, अहिंसा आणि करुणेचा संदेश देणारा दिवस आहे.
हा दिवस जगामध्ये बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो.
ह्या दिवसाला ध्यानसाधना, दान आणि मैत्रिभावना यांना विशेष महत्त्व दिले जाते.
त्यांनी समाजात स्वातंत्र्य, समानता, शांतता, करुना आणि बंधुभाव वाढवण्याचा आपल्या जिवानात महापरिनिर्वान संदेश दिला. याला वाढविन्याकरिता वैशाख पोर्णिमेला अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वैशाख अथवा बुध्द पोर्णिमा साजरी करण्याची पद्धत
वैशाख पौर्णिमा केवल भारतामध्येच नाही तर अनेक देशांमध्ये मोठ्या आनंदाने साजरी केली जाते:
बुद्ध विहारामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी दिलेला संदेशाचे जतन केले जाते.
ध्यान आणि साधनांचे आयोजन केले जाते.
गरजूंना अन्नदान व वस्त्रदान केले जाते.
अनेक ठिकाणी विपस्सना तथा श्रामानेर शिबिरांचे आयोजन केले जाते.
शांती यात्रांचे आयोजन केले जाते.
भारत आणि जगातील वैशाख बुद्ध पोर्निमेचा उत्सव
भारतासह, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, जपान, व्हियातनाम, चीन, तिब्बत, म्यांमार, दक्षिण कोरिया आणि इतर बौद्ध देशांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेषतः बोधगया येथे लाखो धम्म अनुयायी एकत्र येतात.
वैशाख पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही, तर मानवतेला योग्य मार्ग दाखवणारा एक प्रेरणादायी दिवस आहे. गौतम बुद्ध यांच्या शिकवणी आजही जगाला शांततेचा मार्ग दाखवतात.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

