Site icon Desh Varta

गोविंद पानसरे हत्या प्रकरण; आरोपीला जामीन मंजूर, तपासावर प्रश्नचिन्ह?

गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा निर्णय! सचिन अंदुरे गणेश मुस्कीन, अमित देगवेकर आणि भरत कुरणे यासोबतच वासुदेव सूर्यवंशी याला मुम्बई न्यायालयाकडून जामीन मंजूर. या निर्णयावर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा!

गोविंद पानसरे हत्या प्रकरण; प्रशासन अपयशी !

गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संपुर्ण राज्याचे लक्ष लागले असताना महत्त्वाचा निकाल आला आहे. सचिन अंदुरे गणेश मुस्कीन, अमित देगवेकर आणि भरत कुरणे यासोबतच वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून २९.०१.२०२५ रोजी आरोपींचा जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकल पिठाने निर्णय घेतला. या निर्णयामुळे तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडित कुटुंबासह सामान्य जनतेमधुन नाराजी व्यक्त केली आहे.

गोविंद पानसरे हत्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाचा निर्नय !

गोविंद पानसरे हत्या प्रकरनी साल 2018 ते 2019 सचिन अंदुरे, गणेश मुस्कीन, अमित देगवेकर आणि भरत कुरणे यासोबतच वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती त्या अरोपीना आता मुम्बई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे त्यामुळे सम्पुर्ण राज्याचे लक्ष आता या निर्णायाकडे लागलेले आहे. अटक झाल्यापासूनच हे सर्व आरोपी तुरुंगातच होते दरम्यान खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची शक्यता नाही त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचं हायकोर्टाने सांगितलेलं आहे, याशिवाय तपासामध्ये कुठल्याच प्रकारची प्रगती नाही झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा कोर्टाने निवाळा दिलेला आहे न्यायमूर्ती ए एस किल्लोर आणि यांच्या याच प्रकरणातील आणखीन एक आरोपी वीरेंद्र सिंह तावडे यांच्या जामीनाचा अर्ज स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यातआले आहेत.

गोविंद पानसरे कुटुंब आणि सामाजिक गटांचा प्रतिसाद !

संशयीत आरोपीना मुम्बई हाय कोर्टन जामीन मंजुर केल्या प्रकरणी आता आपण हायकोर्ट मध्ये दाद मागनार आहोत अशी माहीती गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी ही माहिती दिलेली. आम्हाला भीती होतीच कि संशयीत आरोपीना जामिन मिळेल आणि तो मिळाला हा खटला ज्या प्रमानामध्ये न्यायालयामध्ये चालायला हवा होता तसा चालला नाही आता अम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ अशी माहीती त्यांच्या कुटूम्बीयानी दिलेली आहे.

तब्बल सात वर्षानी जामीन मंजूर

16 फेब्रुवारी 2015 ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची त्यांच्या राहत्या घरामध्ये कोल्हापूर इथे अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आधी नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश यांच्या हत्येशी देखील संशयीत आरोपीचा संबंध असल्याचे बोलले जात होते; मात्र महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरू असताना यश आलेलं नाही. म्हनून जेव्हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झालेल्या संशयीत आरोपी व त्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली होती मात्र गोविंद पानसारे यांच्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून सुरू होता, मात्र हा खटला अजूनही सुरू आहे. आरोपींना 2018 अटक करण्यात आली होती आरोपी सहा ते सात वर्ष अटकेत होते. त्यामुळे त्यांनी जामीनास अर्ज केला होता हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि तपास यंत्रणेला या खटल्यात यश देखील आलेलं नाही त्यामुळे हायकोर्टानं आरोपीना जामीन मंजूर केलाय.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version