-
(Heatwave Alert 2025) मध्ये उष्णतेच्या लाटा वाढणार? जाणून घ्या कारणे आणि उपाय!
नुकताच भारतीय हवामान विभागाने या वर्षीच्या उष्नतेच्या दिलेल्या अंदाजानुसार (Heatwave Alert 2025) मध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होणार आहेत. मार्चपासून तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याचे म्ह्टले जात आहे. यामुळे नागरिकांनी आतापासुनच वेळीच सावधगिरी बाळगने गरजेचे झालेले आहे.
-
देशात आणि राज्यात गेल्या काही वर्षांतील तापमान विक्रम
- उन्हाळा सुरु झाल्यापासुन सुरुवातीलाच एप्रिल-मे 2024 हा इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरला.
- तर मार्च 2022 हा भारतातील सर्वांत उष्ण मार्च म्हणून नोंदला गेलेला आहे.
- राज्यामध्ये चंद्रपूर, नागपूर आणि अकोला यासारख्या शहरांमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान सातत्याने वाढत आहे.
- आपल्याला माहितच आहे कि विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अकोला आणि इतर भाग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागपूर हे राज्याचे उपराजधानी असून ते संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठे शैक्षणिक आणि व्यापारी हब विकसित झाले आहे. चंद्रपूर हे कोळसा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ओळखले जाते, तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे येथे पर्यटनाला चालना मिळते. अकोला हा कृषीप्रधान जिल्हा असून कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. संपूर्ण विदर्भ हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून येथील जंगल, नद्या आणि प्राचीन मंदिर पर्यटन आकर्षणाचा भाग आहेत.
-
ग्रीन हाऊस इफेक्ट आणि प्रदूषणाचा परिणाम (Global Warming & Greenhouse Effect)
मानवाने तयार केलेल्या आधुनिकरनाच्या पडद्याआड जंगलतोड, ध्वनी प्रदुषन, तसेच विदिध प्रकारच्या वाढत्या प्रदूषणामुळे ग्रीनहाऊस गॅसांचे प्रमाण वाढलेले आहे व त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ग्रीन हाऊस गॅसांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ज्याचा परिणाम म्हणून वातावरणातील उष्णता अधिक काळ टिकून राहते आहे. आणि याचाच आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे.
-
उष्नतेचा आरोग्यावर होणारे परिणाम आणि सावधगिरीचे उपाय! (Impact of Heatwaves on Health)
दिवसेंदिवस वाढत असनार्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढतो आहे. यामुळे मनुष्यजीवनावर उष्माघात (Heatstroke), डिहायड्रेशन, थकवा जानवतो. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेले माहितीनुसार यावर उपाय म्हणून लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांनी विशेष काळजी घेने जरूरीचे आहे. याकरिता आपण नियमीत पुरेसे पाणी प्या आणि साध्य होईल तेवढे उन्हात काम करण्याचे टाळा.
-
वाढत्या उष्णतेचा शेती आणि जलसाठ्यांवरील परिणाम ? (Effect on Agriculture & Water Resources)
दैनंदिन स्वरुपात वाढत्या तापमानामुळे याचे ज्याप्रमाने मानवी जिवनावर परिणाम होत आहेत त्याचप्रमाने शेतीवर व शेती उत्पादनावर याचे जाचक परिणाम होताना दिसत आहेत, याचा परिणाम म्हणून पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. व यामुळे शेतकऱ्यांसाठी जलसंवर्धन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-
नागरिकांनी काय काळजी घ्यावी? (Precautionary Measures for Heatwave)
वाढत्या उन्हापासुन संरक्षन म्हणुन घराबाहेर पडण्याआधी उन्हाळ्यात हलका आणि सैलसर (सुती) कपडा वापरा. परंतू शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा. यासोबतच उन्हामध्ये घ्यावयाची महत्वाची काळजी म्हणजे थंड पेय आणि फळांचे सेवन नियमित करित चला.
-
उन्हाळ्यामध्ये सरकार आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ?
आपण सर्वकाही सरकारवर अवलंबुन न राहता काही महत्वाच्या गोष्टी आपणसुध्दा पाळणे महत्वाचे आहे ते म्हणजे पाण्याच्या स्त्रोतांचे निश्चित ठिकानी व्यवस्थापन करने. शहरांसोबत तसेच ग्रामिण भागामध्येसुध्दा वृक्षारोपण मोहीम राबवणे गरजेचे झालेले आहे कृपया ती व्यवस्थित राबवुन स्थानिक प्रशासनाकडून व वयक्तिकरित्या त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी.
उन्हाळ्यामध्ये सरकारने साकारावयाची महत्वाची जबाबदारी म्हणजे उष्णतेच्या लाटांबाबत नागरिकांना वेळीच माहिती देऊण त्याबद्दल जागरूक करणे.
निष्कर्ष:
या वर्षी उष्णतेच्या लाटांचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. प्रशासन आणि सामान्य नागरिकांनी मिळून याकरिता उपाययोजना केल्या, तर या समस्येवर मात करता येईल.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

