-
1 एप्रिलपासून UPI आणि बँकिंग नियम बदलणार; समान्यांवर होणारा परिणाम!
प्रत्येक वर्ष्याच्या 1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते, आणि त्याअनुशंगाने अनेक महत्त्वाचे आर्थिक नियमांमध्ये अर्थिक स्वरुपात बदल केला जातो. यंदा देखील काही नविन वर्ष्याच्या सुरुवातीला UPI मध्ये नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा थेट प्रभाव सामान्यांच्या खिश्यावर पडू शकतो. UPI व्यवहारांपासून ते बँकिंग सेवांपर्यंत, या बदलांबद्दल जाणून घेऊया.
-
बॅन्केचे कुठले कार्ड Used केल्याने अधिक फायदे मिळतात ?
यावेळेस NPCI ने रुपे डेबिट सिलेक्ट कार्डधारकांसाठी नवे उपक्रम व फायदे जाहीर केले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅव्हल, फिटनेस, वेलनेस यांसारख्या अनेक सेवांचा समावेश असेल. ज्यांच्याकडे डेबिट तसेच क्रेडीट कार्ड आहेत अश्या कार्डधारकांना एअरपोर्ट लांज एक्सेस, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वासाठी रु. 10,000 पर्यंतचा इन्शुरन्स, तसेच OTT सबस्क्रिप्शन आणि जिम मेंबरशिपवर सवलत मिळनार आहे.
बॅन्केच्या नविन नियमांचे सदस्यता शुल्क ?
तुम्हाला जर नविन वर्षा मध्ये या सुविधांचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्हाला वर्षाला केवळ ₹250 शुल्क आकारले जाईल व ते तुम्ही वर्षातुन एकदा जमा करु शकता.
-
बँकांच्या मिनिमम बॅलन्समध्ये बदल नविन नियम लागू ! UPI Transaction Limit per Day
आधी खातेधारकाच्या खात्यामध्ये मिनिमम काही रक्क्म असायला हवी होती त्यामध्ये बदल करित SBI, PNB आणि कॅनरा बँक यांसारख्या प्रमुख बँकांनी त्यांच्या मिनिमम बॅलन्सच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय यावेळेस घेतला आहे. त्यामध्ये तुमचे खाते जर शहरी भागात असेल तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ₹5000 ते ₹35000 पर्यंतचा असू शकतो, आणि जर तुमचे बॅक खाते ग्रामीण आणि निमशहरी भागात असेल तर तुम्हाला काही प्रमाणात वाढ अपेक्षित आहे.
जर तुमचे मिनिमम बॅलन्स कमी असेल तर?
तुमच्या बॅन्केच्या खात्यामध्ये जर खुप कमी रक्कम असेल तर यावेळी आता बँक तुमच्याकडून दंड आकारू शकणार आहे. तसेच अश्याप्रकारच्या प्रसंगात तुमचे खाते इनॅक्टिव्ह होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.
UPI यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी! इनॅक्टिव्ह नंबरमुळे पेमेंट होणार बंद?
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 1 एप्रिलपासून UPI व्यवहारांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला जानार असल्याचे जाहीर केलेले आहे. जर तुमचा मोबाइल नंबर जो तुमच्या बॅन्केच्या खात्याला लिंक आहे तो जर 90 दिवसांहून अधिक काळ इनॅक्टिव्ह किंवा बंद असेल आणि तो तुमच्या UPI ID शी लिंक असेल, तर तुम्हाला UPI पेमेंट करण्यात अडचण येऊ शकते. सुरक्षेच्या कारणास्तव NPCI ने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
UPI ID बंद पडू नये याकरिता तुम्ही काय करू शकता?
जर तुमचा UPI ID तुम्हाला बंद पडू द्यावयाचा नसेल तर तुम्हाला आपला मोबाइल नंबर ऍक्टिव्ह आणि अपडेट ठेवा. जर तुमचा नंबर बर्याच दिवसांपासुन इनॅक्टिव्ह असेल, तर मात्र लवकरात लवकर तो ऍक्टिव्ह करा. अश्यावेळी तुम्हाला जर तुमचा UPI ID बंद पडला तर तुम्ही बँकेत जाऊन किंवा मोबाईल ॲपद्वारे तुमचा नवीन नंबर लिंक करा.
-
बँकिंग क्षेत्रात AI चा वापर व याचा फायदा कि तोटा ?
आपला डिजिटल व्यवहार सुरक्षित व्हावा याकरिता प्रत्येक युजर्स सुरक्षित राहण्याच्या उद्देशाने बँका आता को-फॅक्टर ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आणि AI चॅटबॉट्सचा वापर करणार आहेत. यामुळे ग्राहक सेवा अधिक जलद आणि प्रभावी होईल.
-
पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) काय आहे ?
पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) मध्ये जर तुम्ही ₹5000 पेक्षा जास्त गुंतवनुक केली तर या रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार आहे. याकरिता तुम्हाला आधिच चेकच्या डिटेल्स बँकेला आगाऊ कळवावे लागतील, ज्यामुळे फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल.
-
एटीएम इंटरचेंज फी वाढ !
भारताच्या रिझर्व्ह बँकेने आता एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. तुमच्या आर्थिक व्यवहारांसाठी ही फी ₹17 वरून ₹19 इतकी करण्यात आली आहे, तर गैर आर्थिक व्यवहारांसाठी हि फी ₹6 वरून ₹7 करण्यात आली आहे. हा निर्णय 1 मेपासून नियम लागू होईल.
UPI संबंधी शेवटची टिप:
UPI मध्ये करण्यात आलेले हे सर्व बदल तुमच्या आर्थिक व्यवहारांवर थेट परिणाम करू शकतात. त्यामुळे तुमचा मोबाइल नंबर ऍक्टिव्ह ठेवा, मिनिमम बॅलन्सची पूर्तता करा आणि नवीन कार्ड ऑफरचा लाभ घ्या.
अशा आणखी माहितीपूर्ण लेखांसाठी www.deshvarta.in ला भेट द्या!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

