पुष्पक रेल्वेचा मोठा अपघात;
“जळगाव जिल्ह्यात पुष्पक रेल्वेचा अपघात 2025: अपघाताची कारणे, प्रशासनाची भूमिका, आणि घडामोडी जाणून घ्या.”
अपघात नेमका कसा झाला ? काय आहेत कारणे ?
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ एक मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळूर एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती नुकतीच समोर आलेली आहे. खरं म्हणजे पुष्पक रेल्वेने अचानक ब्रेक लावल्याकारनाने रेल्वेचे चाक रुळावर घासल्या गेले आणि त्यामुळे उडालेल्या चिंगार्यानी ट्रेनमधील प्रवाश्याना अशी गैरसोय झाली कि त्याना वाटले रेल्वेला आग लागल्याचे समजून ट्रेनमध्ये गोंधळ घातला आणि याच भीतीमुळे ट्रेनमधील एका जनरल डब्यातील काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारायला सुरुवात केली आणि रेल्वेतील प्रवासी जसे खाली उतरले तसंच समोरून येणाऱ्या रेल्वे लाईनवरील एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं आणि ही दुर्घटना घडली आहे असे समतज आहे.
आज दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे, या संदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना असे म्हटले आहे कि, या अपघातात आत्तापर्यंत तब्बल 11 जणांचा मृत्यू झालाय मृतांची संख्या पुढे वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस याचे ट्विट
या एकूण घटनेवरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातुन पोस्ट करत माहिती दिली आहे, देवेंद्र फडणवीस लिहितात की पाचोरा नजीक परधाडे गावाजवळ एका अत्यंत दुर्दैवी रेल्वे अपघात झालेला आहे, ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझे सहकारी गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेत जिल्हाधिकारी काही वेळातच तिथे पोहोचतायत संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येते आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्यात सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले अशी माहिती राज्याचे मुखमंत्री देवेंद्र फडनविस यानी दिली.
त्यानी पुढे असे म्हटले आहे कि, ग्लास कटर आणि फ्लड लाईट सह इत्यादी आपात्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्यात संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आवश्यक ती सर्व मदत अपघात झालेल्याना तातडीने पुरवण्यात येते मी स्वतः जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे दरम्यान जळगाव मधील आरपीएफ जवान रेल्वे पोलीस रेल्वेचे अधिकारी हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा व मदतकार्य सुरू केलेलं आहे.
पुष्पक रेल्वे अपघात ! म्रुत्युंची संख्या ?
पुष्पक एक्सप्रेस जी लखनऊ वरुन मुंबईकडे जात होती आणि ही गाडी ज्यावेळेस मुंबईकडे जात असताना जळगाव जिल्ह्यातील परधाडे गावाजवळ रुसखेडा म्हणून एक गाव आहे तिथे टर्निंग आहे त्या ठिकाणी ही गाडी आल्यानंतर रेल्वेचे चाक घासले गेले व त्यामधुन चिंगारी निर्माण झाली त्यामुळे अशी काही अफवा फैलली की गाडीमध्ये आग लागली आहे त्यामुळे त्याच्या चैन पुलिंग झाल्यामुळे गाडी फास्ट थांबली आणि पुन्हा त्याच्या चिंग्या उडाल्यामुळे कन्फर्म झालं की आग लागली आहे. त्या ठिकाणी जनरल डब्यातले जे लोक होते त्यामधल्या काही लोकानी रेल्वेच्या दुसर्या साईडला झेप घेतली आणि ते जे या साईडला उतरले तर त्याच बाजुने नेमकी कर्नाटक एक्सप्रेस येत होती. त्या रेल्वेचा स्पीड जवळपास 130 ते 140 चा स्पीड असावा असे तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारलं तेव्हा त्यानी अंदाजाने सांगितले त्यामुळे त्या ठिकाणी एक्सीडेंट झाला आणि जवळपास 11 लोकं चिरडल्या गेले.
अशी माहिती तेथील स्थानिक आमदार गुलाबराव पाटिल यानी दिली.
त्यानी केंद्रसरकारला देखील अशी मागनी केलेली आहे कि ज्यांचा ज्यांचा यामध्ये म्रुत्यु झाला आहे, जे गम्भीर जखमी आहेत त्याना सरकारने मदत करावी अशी मागनी त्यानी यावेळेस केलेली आहे.
- तुमच्या मते अशा अपघातांसाठी काय उपाययोजना करता येतील क्रुपया आपले मत नोंदवावे ?
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

