JNV Hingoli येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा | सांस्कृतिक व परेड कार्यक्रम
JNV Hingoli येथे 77 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये NCC, Scout & Guide, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी भाषणे व प्राचार्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.
जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोली (JNV Hingoli) येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
(JNV Hingoli) येथे सांस्कृतिक, परेड, क्रीडा व देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर दुमदुमला
हिंगोली :
जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोली (JNV Hingoli) येथे देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशभक्तीपर व प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांत सांस्कृतिक सादरीकरण, परेड मार्च, क्रीडा स्पर्धा, भाषण, कविता व प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
JNV Hingoli येथे प्रचार्याद्वारे परेडचे निरीक्षण व क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले खेल मैदानाचे उद्घाटन
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री. एस. जे. गावई यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानी सर्वप्रथम नवनिर्माण करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले खेल मैदाना वर आयोजित केलेल्या परेडमध्ये सहभागी असलेल्या अरावली, नीलगिरी, शिवालिक, उदयगिरी व पथकांचे (हाऊसवाइज) विद्यार्थ्यांच्या तुकड्यांचे बारकाईने निरीक्षण केले. यानंतर प्राचार्य महोदयांच्या हस्ते ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले खेल मैदानाचे’ उद्घाटन करण्यात आले.
JNV Hingoli येथे प्रचार्याद्वारे ध्वजारोहण व मानवंदना
खेल मैदानाच्या उद्घाटनानंतर देशाचा राष्ट्रीय ध्वज प्राचार्याद्वारे फडकविण्यात आला. यानंतर NCC, स्काऊट अँड गाईड तसेच प्रत्येक हाऊसच्या वतीने राष्ट्रीय ध्वजाला सॅलामी देण्यात आली. या कार्यक्रम दरम्यान संपूर्ण परेडचे नेतृत्व संबंधित हाऊस कॅप्टन यांनी केले, त्यामुळ हा विशेष उल्लेखनीय क्षण ठरला.
प्रजासत्ताक दिनाची JNV Hingoli येथे कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात
या सम्पूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री. कानडे सर यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या सुत्रसंचालनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
JNV Hingoli येथे प्रजासत्ताक दिनी विद्यार्थी भाषणे
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली—
इयत्ता 12 वीचा विद्यार्थी मंथन वाकोडे यांनी संविधानिक मूल्यांवर प्रभावी भाषण सादरीकरण केले. तसेच श्रुती गुट्टे (इ. 12 वी) हिने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व व जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. त्यानंतर इयत्ता 10 वीचा विद्यार्थी अर्जुन पुंड याने आपल्या ओघवत्या व आत्मविश्वासपूर्ण भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच इयत्ता ७ वि ची विद्यार्थिनी स्मृति वाघमारे हिने देखिल स्पुर्तिदायक भाषण दिले, त्यासोबतच कृष्णा महानुभाव याने आपल्या शैलीत मांडनी केली तसेच वर्ग १० वि चा विद्यार्थी श्रीपाद वावरे ह्या देखिल कार्यक्रमात भाषण प्रस्तुति केली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषणातून देशप्रेम, जबाबदारी व नेतृत्वगुण स्पष्टपणे दिसून येत होते याची जाणीव उपस्थित प्रत्येकाला झाली.
JNV Hingoli येथे प्रजासत्ताक दिनी पीटी, योग व पिरॅमिड्सचे नेत्रदीपक सादरीकरण
JNV Hingoli च्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने खेल मैदानात
पिरॅमिड्स, पीटी ड्रिल, योग प्रात्यक्षिके, सादर कलित ज्यामुळ कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व आकर्षक पद्धतीने सादर झाला. या सादरीकरणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
शिक्षक भाषण : संविधान व बाबासाहेबांचा विचार
JNV Hingoli विद्यालयाचे ग्रंथपाल श्री. शरद खंडारे यांनी आपल्या भाषणात सबंध विद्यार्थ्यांना व उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून, समानता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या मूल्यांवर आधारित राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे जो डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या अथक परिश्रमातुन साध्य झाला.
त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये, सामाजिक न्यायाची संकल्पना तसेच लोकशाही व्यवस्थेची ताकद यावर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ त्यांच्या हक्कांचीच नव्हे, तर आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे हेच खरे सुजाण नागरिकत्व असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाचा उल्लेख करताना, त्यांनी बाबासाहेबांचे शिक्षणप्रेम, समतेसाठीचा संघर्ष, वंचित घटकांसाठी केलेले कार्य आणि संविधान निर्मितीतील त्यांची दूरदृष्टी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेबांचे विचार आजच्या युवकांसाठी दिशादर्शक असून, शिक्षण, शिस्त व आत्मसन्मान हाच प्रगतीचा मार्ग आहे, हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यानी त्यांच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करणे, त्यातील मूल्ये आचरणात आणणे आणि जबाबदार नागरिक बनणे हेच खरे राष्ट्रप्रेम असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिर्माण, सामाजिक जाणीव व संविधानिक मूल्यांबद्दल आदर निर्माण झाला आणि उपस्थित सर्वजण निश्चितच प्रेरित झाले.
प्रजासत्ताक दिनी JNV Hingoli येथे NCC व स्काऊट–गाईड विद्यार्थ्यांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान NCC तसेच स्काऊट अँड गाईडमधील अनेक विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री. गवई सर यांच्या द्वारे प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
प्रजासत्ताक दिनी प्राचार्य श्री. गवई यांचे अध्यक्षीय भाषण
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री. एस. जे. गावई यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना देशाप्रती आपले योगदान व् शिस्त तसेच नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचा आदर ठेवून जबाबदार नागरिक घडावे, असे आवाहन केले. तसेच त्यांनी उपस्थित सर्वांना 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी प्रेरणा दिली.
JNV Hingoli येथे प्रजासत्ताक दिनी मंच सजावट व व्यवस्थापनाचे नियोजन
मंच सजावट :
विद्यालयाचे कला शिक्षक श्री. दत्ता लांडगे व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन आकर्षक मंच सजावट केली. ज्यामुळ कार्यक्रमाला आकर्षक स्वरुप प्राप्त झाले.
शिस्त व परेड व्यवस्थापन :
विद्यालयाचे श्री. प्रशांत देवरडे (PET) व सौ. रेखा भगत (PET) यांनी ग्राउंड, परेड व शिस्तीची सर्व जबाबदारी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली.
संगीत सांस्कृतिक विभाग :
विद्यालयाच्या संगीत शिक्षिका सौ. हेमलता इंगळे व त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टरीत्या सादर झाले.
प्रजासत्ताक दिनी JNV Hingoli येथे कार्यक्रमात सर्व शिक्षक कुटुंबियांची उपस्थिती
या विशेष सोहळ्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व त्यांची कुटुंबे मोठ्या संख्येने उपस्थित होती, ज्यामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक व उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
