Site icon Desh Varta

हिंगोलीत JNV नवोदय विद्यालयाचे नवीन तारे दाखल! 6 वीचे स्वागत सोहळा ठरला खास

JNV जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोलीमध्ये इयत्ता 6 वीचे तारे दाखल! स्वागत समारंभाने विद्यालय गजबजले

राज्यातील हिंगोली मध्ये JNV जवाहर नवोदय विद्यालय, इयत्ता 6 वीचे ताजे चेहरे दाखल झाले आहेत; त्यांच्या स्वागत समारंभाने विद्यालय गजबजले

हिंगोली, ता. 7 जुलै

JNV प्राचार्य श्री. गवई सरांचे प्रेरणादायी मनोगत

हिंगोली येथील नवोदय विद्यालय, बसमतनगर, याठिकाणी इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या नव्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. नवोदय विद्यालयाच्या संस्कृतीनुसार इयत्ता ६ मध्ये शालेय जीवनाचा प्रारंभ करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे स्वागत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. जे. गवई होते त्यांनी प्रातःकालिन सभेमध्ये कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे संबोधित केले –

देशातील अनेक जिल्ह्यामध्ये स्थित असणारे जवाहर नवोदय विद्यालय हे केवळ शिक्षणसंस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ज्ञानमंदिर आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी विविध कलेचे ज्ञान संपादन करीत आहेत. इथे मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग करून झिल्ह्यातील विद्यार्थी त्यांचे भविष्य उज्वल करू शकतात तथा करीत आहेत. या विद्यालयाच्या नियमानुसार प्रामाणिक प्रयत्न, शिस्त व आत्मविश्वास या तीन गोष्टींची कास धरल्यास विद्यार्थ्याला यश नक्की मिळेल या अशी आशा विद्यालयाचे प्राचार्य श्री. गवई सरांनी आपल्या स्वागत भाषणात सांगितले.

JNV बसमतनगर तील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन 

कार्यक्रमात यावेळी उपस्थित विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री. गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले –

जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणं ही विद्यार्थ्यांकरिता  एक सुवर्णसंधी आहे. ग्रामीण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी हे व्यासपीठ म्हणजे एक उज्वल भविष्याचे आशेचं किरण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच चारित्र्य आणि सामाजिक मूल्यांचाही विकास या ठिकाणी होतो, याचा लाभ विद्यार्थ्याने नक्की  घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली.

JNVST (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test) Incharge  श्री. व्ही. व्ही. गर्जे सर यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेतून निवड होणे ही तुमच्या क्षमता आणि अभ्यासाचा साक्षात्कार आहे. आता या नंतर तुमच्या पुढे मोठा टप्पा आहे – येथे तुम्हाला जी संधी मिळेल ती तुमची खरी ताकद ओळखून स्वतःला घडवण्याविन्याचे आहे. या ठिकाणी शिक्षणाशिवाय क्रीडा, कला आणि नेतृत्वगुण यामध्येही पुढे जाण्याची संधी इथे तुम्हाला मिळणार आहे,” असे गर्जे सर म्हणाले.

JNV बसमतनगर विद्यार्थ्यांनी केले इतर विद्यार्थ्यांचे स्वागत

या प्रसंगी कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले तर,व काहींनी कवितेच्या माध्यमातून आपले मत सादर करून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

शेवटी विद्यालयात प्रवेश घेतलेल्यासर्व नवोदयी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत त्यांना भविष्यामध्ये काय व्हावयाचे आहे ते सर्वाना सांगितले.

या कार्यक्रमाचे संयोजन शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी मिळून उत्कृष्टपणे व्यवस्थापन केले केले.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version