Site icon Desh Varta

JNV-Hingoli “नवोदय विद्यालयात कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जागर”

JNV-Hingoli कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने नवोदय विद्यालयात देशभक्तीचा जागर

दिनांक 26 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील JNV नवोदय विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त, श्रद्धांजली आणि अभिमानाचा सोहळा संपन्न झाला.

बसमत (हिंगोली) | 26 जुलै 2025

JNV-Hingoli कारगिल विजय दिनानिमित्त कार्यकरामाचे आयोजन 

जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, बसमत येथे आज ऐतेहासिक म्हाजेच कारगिल विजय दिवस अत्यंत राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय सेनेच्या शौर्याचे स्मरण करत या दिनानिमित्त विविध भाषण, सादरीकरण व देशभक्तीपर उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

JNV-Hingoli कारगिल विजय दिनानिमित्त विद्यार्थी भाषण

कार्यक्रमाची सुरुवात कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. व यानंतर शाळेतील विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी विशेषत: NCC विद्यार्थ्यानी कारगिल युद्धावर आधारित माहितीपर भाषणे सादर केली. तथा कारगिल युद्धाची पार्श्वभूमी व माहिती सांगितली तसेच त्यांनी शौर्य, बलिदान, आणि देशसेवेचा प्रेरणादायक इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडला.

प्राचार्य श्री. गवई सरांचे प्रेरणादायक मार्गदर्शन

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्राचार्य श्री. गवई सर यांचे मार्गदर्शनपर भाषण. त्यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, व त्याप्रसंगीची भारतीय सेनेचा पराक्रम आणि यामागील देशभक्ती याविषयी सखोल माहिती दिली.

> “देशासाठी प्राण अर्पण करणारे आपले सैनिक हे आपल्या आयुष्यातील खरे आदर्श आहेत. आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत स्वतःमध्ये देशसेवेची भावना जोपासली पाहिजे,” असे गवई सरांनी आपल्या भाषणात सांगितले.

या दिअनाचे औचित्य साधून Morning PT दरम्यान विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम” गीत गाईले तसेच प्रार्थना सभेमध्ये “सारे जहाँ से अच्छा”, यांसारख्या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिनावरील निबंध व कविता स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.

JNV-Hingoli कारगिल विजय दिवस साजरा करण्या मागील उद्देश ?

अश्या प्रकारचा कार्यक्रम आयोजन करण्यामागील उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे आणि भारतीय सेनेच्या योगदानाची जाणीव करून देणे असा होता. विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी राष्ट्रगिताचे गायन करुण भारत माता की जय आणि जय हिंद या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version