Site icon Desh Varta

Kurla Bus Accident

कुर्ल्यात BEST बस अपघात: नेमकं काय घडलं?

कुर्ल्यात सोमवार रात्रिला एक बेस्ट बसने वेगावरचा ताबा सुटवत तब्बल अनेक घर केली उध्वस्त, काय आहे नेमका प्रकार, कुरल्यात भरदाव बेस्ट बसने सात जणांचा जीव घेतलाय. यातील आरोपी बस ड्रायव्हर संजय मोरेला पोलिसांनी अटक केली आहे. संजय वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दरम्यान कुर्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेस्ट बस अपघात नेमका कशामुळे झाला पोलीस तपासात काय काय समोर आलंय या प्रश्नांची उत्तर सामन्य लोक शोधत आहेत.

तेथील लोकांच्या प्रत्यक्ष माहिती नुसार त्या बस ची स्पिड किमान ७०-८० असवी असे तेथील प्रत्यक्ष पाहनारे लोक सांगत आहेत ! कुर्ल्यात घडलेल्या ह्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. भरधाव बेस्ट बसने धडक दिल्यामुळे सात ते नऊ निष्पाप लोकांनी आपला जीव गमावलाय अनेक रिक्षा कार वाटेत आलेल्या नागरिकांना धडकत बेस्ट पुढे गेली आणि आंबेडकर नगरच्या कमानीला धडकून बस तिथेच थांबली.

  1. कुर्ल्यात अपघात कसा घडला ?

या प्रकरणी बस ड्रायव्हर संजय मोरेला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधिक तपास करत आहेत ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीने संजय वर मध्यप्राशन केल्याचे चा आरोप केला. संजय मोरे हा दारू पिऊन बस चालवत असल्याचं प्रत्यक्ष दर्शननी म्हटलं पण संजयने मध्यप्राशन केलं नव्हतं अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पण आत्तापर्यंतच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे बस अपघात प्रकरणातील आरोपी ड्रायव्हर संजय मोरे हा एक डिसेंबरलाच इलेक्ट्रिकल बस चालवायला लागला होता. संजयला या आधी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता आणि याच गोष्टीमुळे पुढचा अनर्थ घडला असावा असा अंदाज लावल्या जात आहे. संजय मोरे हा कोरोना काळापासून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बेस्ट मध्ये कामाला होता या आधी त्याला बेस्टच्या मिनी बसेस चालवण्याचा अनुभव होते. मिनी बसेस मधील स्टेरिंग हे वारंवार फिरवावं लागतं संजय मोरे हा दहा दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बस चालवायला लागला होता फक्त दहा दिवसांच्या अनुभवावर संजयला इलेक्ट्रिक बस चालवायला दिली होती इलेक्ट्रिक बस मध्ये असलेले पावर स्टेरिंग वर संजयचा अद्याप हात बसला नव्हता पावर स्टेरिंग असलेली वाहन वळवण्यासाठी फारसा जोर लावावा लागत नाही स्टेरिंग हलक्याने फिरवले तरी वाहन लगेच वळते आणि इथे संजयचा घात झाला मिनी बसवर सतत स्टेरिंग वळवण्याची सवय असलेल्या संजयने पावर स्टेरिंग जोरात वळवल्याने पुढचा अनर्थ घडला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय आरोपी संजय मोरे यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना होता या अपघातानंतर पोलिसांनी हा परवाना जप्त केलाय दरम्यान फक्त दहा दिवसांच्या ट्रेनिंगच्या अनुभवावर संजय मोरेला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण हा बेस्ट प्रशासनाचा निर्णय योग्य होता असं तुम्हाला वाटतं का?

कुर्ल्यातील ती बस आता कोठे आहे ?

काल संध्याकाळी नऊ च्या सुमारास बेस्ट बसने काही जणांना धडक दिली होती, कुर्ला मार्केट परिसरात ही धडक दिली होती त्या ठिकानी काही वाहन होती त्यांना देखील या बसने धडक दिली होती व काही व्यक्ती होते त्यांना देखील चिरडलं होतं आता ती बस सध्या कुर्ल्या आगारात नेन्यात आलेली आहे. काल दोन ते तीन तासाच्या रेस्क्यू नंतर ही बस ज्या ठिकाणी अडकली होती तिथून बाहेर काढण्यात आलेला आहे. आपण बसची अवस्था देखील बघू शकतो त्या बसची जी काच आहे ती काच पूर्ण मोडकईस आलेली आहे व त्याचे हेडलाईट आहे हेडलाईट देखील सध्या तुटलेली आहे व याच बसने काल 30 जणांना चिरलं देखील होतं व 30 ते 35 जण जी वाहन आहे त्यांना देखील धडक दिलेली होती अशा अनुषंगाने हा भीषण अपघात आहे व या बसमध्ये 60 जण हे प्रवास देखील करत होते व मात्र या बसने अचानक ही बस कुर्ला डेपोने जशी निघाली तसे काही अंतरावरती या बसचा अपघात झालेला आहे या बस वाहनाने स्पीडमध्ये काही वाहनांना देखील धडक दिलेली आहे व काही जे आहेत नागरिक त्यांच्या अंगावर देखील ही बस गेलेली आहे.

कुर्ल्यातील बस अपघातात किती लोक मारली गेलीत ?

बसमध्ये 60 जण प्रवासी देखील होते व आतापर्यंत ७-८ जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व त्यापैकी 26 जण हे खाजगी रुग्णाला सध्या उपचार घेत आहे मात्र कुर्ला या स्थानका बाहेर जे गस्त घालणारे पोलीस आहे त्यांच्या अंगावरनं देखील ही बस गेलेली आहे असं देखील म्हटलेलं आहे व त्यांच्या जबाबानुसार आता बस चालकावरती गुन्हा नोंदवलेला आहे व त्याला पोलिसांनी सतत ताब्यात घेतलेला आहे मात्र अपघाताचं कारण अस्पष्ट आहे मात्र आपण जी पाहतोय बस या बसचा हा दुर्दैवी भीषण अपघात म्हणावा लागेल.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

टेलिग्राम

जॉईन करा

Share Chat

जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

 

Exit mobile version