Site icon Desh Varta

महाराष्ट्र विधानसभा निवडनुक २०२४ सर्वाधिक मतानी निवडुन आलेले आमदार

सर्वाधिक मतानी निवडुन आलेले टॉप 5 उमेद्वार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागलेला आहे, निकाल निश्चितच वेगळ्या प्रकारचा लागलेला असलेला दिसत आहे तरी यामध्ये महायुती अर्थात भाजपा, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या आघाडीला खूप मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्याचे आपल्याला दिसत आहे. निश्चितच लोकांनी त्यांना दिलेला हा कौल आहे याबद्दल शंका नाही असे म्हटले जात असले तरी विरोधी पक्षाने मात्र यावर बऱ्याच शंका कुशंका निर्माण केलेले आहेत तरीसुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुती सरकारचा विजय आहे असे सिध्द झाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाला तब्बल 132 जागांवर विजय मिळवता आला तर शिवसेना शिंदे गटाला एकूण 57 जागांवर विजय मिळाला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागांवर विजय प्राप्त झालेला आहे. याच प्रमाणे महायुतेला एकूण 220 जागांवर विजय मिळालेला आहे हा विजय एकतर्फ विजय झालेला आपल्याला दिसून येत आहे.

तर महाविकास आघाडी अर्थात शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेस या तीनही पक्षाला एकूण 46 जागांवर विजय प्राप्त झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 20 जागांवर विजय प्राप्त करता आला तर काँग्रेसला 16 जागांवर विजय प्राप्त करता आला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागांवर विजय मिळविला आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक फरकाने विजयी होनारे टॉप 5 आमदार

सर्वाधिक मतं मिळालेला उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा असून सातारा विधानसभा निवडणूक क्षेत्रातील आहे.

शिवेंद्र राजे भोसले यांना एकूण एक लाख 76 हजार 849 मते मिळालेली असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांचा एक लाख 42 हजार 124 मतांनी पराभव केलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधला हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते मिळवून विजय प्राप्त करणारे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार परळी विधानसभेचे आहेत या विधानसभा क्षेत्राकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना हा विधानसभा क्षेत्र सर्वात महत्त्वाचा ठरतो.

परळी विधानसभा क्षेत्रामध्ये धनंजय मुंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली होती त्यांनी एक लाख 94 हजार 889 मते मिळवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राज साहेब देशमुख यांचा तब्बल एक लाख 40 हजार 244 मतांनी पराभव केलेला आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पराभव आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक लक्षवेधी असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती यामध्ये एकाच घरातील दोन उमेदवारांनी निवडणूक लढवली राष्ट्रवादी कोठेनंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांमध्ये झोपली असल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळाले यामध्ये अजित पवारांनी एक लाख 81 हजार 132 मते मिळवत युगेंद्र पवार यांचा तब्बल एक लाख 899 मतांनी पराभव केलेला आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव आहे.

महाराष्ट्रात शिवसेना फुटी नंतर शिंदे गटाला विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून यामध्ये चौथ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळवलेला आहे असे आपल्याला दिसते त्यांनी  कोपरी पाचपखडी या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती या निवडणुकीमध्ये त्यांना एक लाख 59 हजार 60 मते मिळालेले असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांचा एक लाख वीस हजार 717 मतांनी पराभव केलेला असून हा महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा पराभव आहे.

पाचव्या क्रमांकावर भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत खैरे यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळविला आहे त्यांचा मतदारसंघ कोथरूड हा असून त्यांना मिळालेल्या एकूण मतदान एक लाख 59 हजार 234 मिळाले असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकळे यांचा एक लाख 12 हजार चार मतांनी पराभव केलेला आहे हा महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा करावा आहे.

महाराष्ट्राचे राजकीय परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णय ठरलेले आहे यामध्ये सर्वाधिक मते मिळवून विजय प्राप्त करणाऱ्या पाच विजेत्यांबद्दल आपण पाहिलेले आहे त्याचप्रमाणे सर्वात कमी मतांचा फरक ठेवून कोण जिंकला याबद्दल देखील आपण पाहू….

महाराष्ट्रातील सर्वात कमी फरकाने विजयी होनारे टॉप 5 आमदार

मालेगाव विधानसभा क्षेत्राचे ए आय एम आय एम पक्षाचे उमेदवार मुक्ती मोहम्मद खोलीत यांना एकूण एक लाख सहा हजार 953 मते मिळाली असो त्यांनी केवळ असे ASIF SHAIKH RASHEED यांचा 162 मतांनी पराभव केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधला सर्वात कमी फरक असणारा हा निकाल आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात होते त्यांना एकूण 96 हजार 795 मत मिळालेले असुन त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा केवळ 206 मतांनी पराभव केलेला आहे हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी मते मिळालेला पराभव आहे.

तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक कमी फरकाने निवडून आलेले उमेदवार भारतीय जनता पक्षाचे असून मंदा मात्रे ह्या बेलापूर मतदारसंघातून यांनी निवडणूक लढविले त्यांना मिळालेले एकूण मते 91 हजार 852 आहेत तर त्यांनी केवळ 377 मतांनी विजय मिळविला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे उमेदवार संदीप नाईक यांचा पराभव केलेला आहे.

त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकाने सर्वात कमी मध्य मिळवून ज्यांनी विजय प्राप्त केला शिवसेना उमेदवार संजय गायकवाड हे बुलढाणा मतदारसंघातून उभे होते त्यांना 91,660 मते मिळाली असून त्यांनी केवळ 841 मतांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा पराभव केलेला आहे.

तर पाचव्या क्रमांकावर सर्वात कमी मतांनी विजयी प्राप्त केला असे काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक जे नवापूर मतदारसंघातून उभे होते त्यांना एकूण 87166 मध्ये मिळाले असून त्यांनी अपक्ष उमेदवार शरद गावित यांचा केवळ 1121 मतांनी पराभव केलेला आहे अशा प्रकारे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये टॉप फाईव्ह म्हणजेच ज्यांनी सर्वाधिक मते घेऊन विजय प्राप्त केला तसेच टॉप फाईव्ह असे उमेदवार आहेत ज्यांनी सर्वात कमी फरकाने विजय प्राप्त केलेला आहे.

याचप्रमाने हि निवडनुक पार पडली आहे आता लवकरच या महायुतीचा शपतविधी समारम्भ वानखडे स्टेडियम मुम्बई या ठिकाणी होनार आहे.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version