“National Librarian Day महाराष्ट्रातील शाळांमध्ये ग्रंथपालच नाहीत, मग विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती कशी वाढणार?”
National Librarian Day निमित्त विशेष ग्रंथालये आहेत, पुस्तके आहेत; पण ग्रंथपाल कुठे आहेत? महाराष्ट्रातील शालेय ग्रंथालयांची व्यथा”
१२ ऑगस्ट National Librarian Day दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शाळांच्या ग्रंथालयांना आणि ग्रंथपालांना न्याय कधी?
अनेक शाळांमध्ये ग्रंथालय आहे, पुस्तके आहेत; पण ग्रंथपाल मात्र नाहीत तर ग्रंथपाल कुठे आहे? गेल्या अनेक वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या ग्रंथपाल पदांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाचे नुकसान होत नाही का? किवा हा महत्वाचा प्रश्न नाही अथवा यांकडे राज्यातील शासन का दुर्लक्ष करीत आहे ?
आपल्याला माहिती असावे कि १२ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन (National Librarian Day) म्हणून साजरा केला जातो. देशातील ग्रंथालय व माहिती शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी ग्रंथालयाला केवळ पुस्तकांचे कपाट न मानता समाजाच्या ज्ञानविकासाचे केंद्र मानले.
एवढे असून सुद्धा दरवर्षी १२ ऑगस्टला शाळा-महाविद्यालयांमध्ये ग्रंथपाल दिनाचे कार्यक्रम होतात, तसेच भाषणे होतात, विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व सांगितले जाते आणि ग्रंथपालांचा गौरव केला जातो. परंतु या गौरवाच्या पलीकडे जाऊन मात्र राज्यातील शालेय ग्रंथालयांची आणि ग्रंथपालांची वास्तविक परिस्थिती काय आहे, हा प्रश्न आपण कधी विचारणार?
आज आपल्याला गरज आहे ती केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या शुभेच्छां’ देण्याची नाही; तर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय ग्रंथालय व्यवस्थेच्या आत्मपरीक्षणाची.
शाळेत ग्रंथालय असणे पुरेसे आहे का? National Librarian Day निमित्त विशेष
महत्वाचा प्रश्न हा आहे कि, शाळेत ग्रंथालयाची खोली असणे, कपाटांमध्ये पुस्तके असणे आणि स्टॉक रजिस्टरमध्ये पुस्तकांची नोंद असणे म्हणजे केवळ यालाच शालेय ग्रंथालय कार्यरत आहे असे म्हणता येईल का?
नक्कीच नाही. तर
प्रत्येक विद्यालयातील ग्रंथालय जिवंत ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडणारा, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड ओळखणारा, योग्य पुस्तकाची निवड करून देणारा, वाचन उपक्रम राबवणारा आणि पुस्तकांना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जोडणारा प्रशिक्षित ग्रंथपाल आवश्यक आहे.
भारत सरकारच्या शालेय शिक्षणविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्येही शाळेतील ग्रंथालय हे वाचनाची सवय विकसित करण्यासाठी महत्त्वाचे साधन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात याची अमलबजावणी राज्य सरकार करीत आहे का ? Samagra Shiksha अंतर्गत ग्रंथालय अनुदान, वाचन उपक्रम, विद्यालयात Readers’ Club, Storytelling, Story Writing आणि इतर वाचनविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे.
मग प्रश्न असा आहे—
या सर्व उपक्रमांचे सुसज्य नियोजन आणि यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शाळेत एक प्रशिक्षित ग्रंथपाल का नसावा?
महाराष्ट्रातील शाळांमध्ये ग्रंथपालांची व्यथा
देशामध्ये महाराष्ट्र हे देशातील प्रगत आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे राज्य मानले जाते. परंतु शालेय ग्रंथालयांच्या बाबतीत परिस्थिती अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिंताजनक आहे.
आणि जर शाळांमध्ये ग्रंथपालांची पदे मंजूर असतील, तर ती वर्षानुवर्षे रिक्त का राहतात? आणि जर पद रिक्त झाले तर ते पद झाल्यानंतर भरण्यासाठी प्रक्रिया वेळेवर का सुरू होत नाही?
आणि यामध्ये सर्वांत महत्त्वाची विशेष बाब म्हणजे—
एका प्रशिक्षित ग्रंथपालाच्या जागी इतर कर्मचाऱ्यांकडून ग्रंथालयाचे काम करून घेणे ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाधिकाराशी तडजोड नाही का?
ग्रंथालय व्यवस्थापन हे केवळ पुस्तक कपाट उघडणे-बंद करणे नाही तर ग्रंथपालाचे काम म्हणजे पुस्तकांचे वर्गीकरण, सूचीकरण, संदर्भसेवा, माहिती साक्षरता, वाचनविकास, डिजिटल साधनांचा वापर, विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या गरजेनुसार साहित्य निवड, वाचन उपक्रम आणि ज्ञानस्रोतांचे व्यवस्थापन करणे होय. म्हणूनच ग्रंथपाल हा शाळेतील केवळ ‘Non-Teaching Staff’ म्हणून पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वाचा ज्ञान-सहकारी म्हणून पाहण्याची आज गरज आहे.
ग्रंथपाल Librarian रिक्त पदांचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना
ग्रंथपालाचे Librarian पद रिक्त राहिले की त्याचा परिणाम केवळ एका रोजगाराच्या संधीवर होत नाही.
तर त्याचा परिणाम हा अनेक कारणांवर होतो जसे —
- विद्यार्थ्यांच्या वाचनाच्या सवयीवर
- पुस्तकांच्या सु-योग्य वापरावर
- ग्रंथालयाती संदर्भ साहित्याच्या वापरावर
- विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर
- सामान्य ज्ञानाच्या विकासावर
- भाषिक कौशल्यावर
- सर्जनशीलतेवर
- चिकित्सक विचारक्षमतेवर
- माहिती शोधण्याच्या क्षमतेवर
- डिजिटल आणि माहिती साक्षरतेवर
म्हणजेच एका रिक्त Librarian पदाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संपूर्ण ज्ञानप्रक्रियेवर होऊ शकतो असे आपल्याला प्रकर्षाने जाणवते.
Librarian पदाबाबत गैरसमज व त्या पदाची आवश्यकता
ग्रंथालय म्हणजे फक्त पुस्तके आहेत असे काही लोक म्हणतात तर आजच्या डिजिटल युगात काही जण असा प्रश्न विचारतात की, “मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात ग्रंथालयाची गरज काय?” असाही प्रश्न उपस्थित केला जातो.
हा प्रश्नच मुळात अतिशय चुकीचा आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात माहितीची कमतरता नाही; उलट तरुणांना अविश्वसनीय माहितीच्या प्रचंड गर्दीत योग्य माहिती ओळखण्याचे आव्हान मात्र मोठ्या प्रमाणत आहे.
आजच्या घडीला विद्यार्थ्याला Google किंवा AI वर माहिती मिळू शकते; परंतु—
योग्य माहिती कोणती?
विश्वसनीय स्रोत कोणता?
संदर्भ कसा तपासायचा?
पुस्तकातून माहिती कशी शोधायची?
माहितीचा शैक्षणिक उपयोग कसा करायचा?
वाचनातून स्वतःचे मत कसे तयार करायचे?
ह्या सर्व बाबी व्यवस्तीत शिकवण्यासाठी त्या समजून घेण्याकरिता ग्रंथालय आणि प्रशिक्षित ग्रंथपालाची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरते.
NEP 2020 अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येसुद्धा देशातील विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि सार्वजनिक ग्रंथालये मजबूत व आधुनिक करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच सक्षम ग्रंथालयांसाठी पुरेसा Library Staff उपलब्ध करून देण्याची आवश्यकता स्पष्टपणे नमूद केली आहे.
आजच्या डिजिटल युगातही ग्रंथपाल का आवश्यक?
आज आपल्याला माहिती आहे कि, राष्ट्रीय ई-पुस्तकालयासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी हजारो डिजिटल पुस्तके उपलब्ध होत आहेत. तसेच राष्ट्रीय ई-पुस्तकालयामध्ये विविध वयोगटांसाठी आणि भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढे असून सुद्धा डिजिटल संसाधन उपलब्ध करून देणे आणि त्याचा प्रभावी शैक्षणिक वापर करून घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
येथे पुन्हा प्रशिक्षित ग्रंथपालाची गरज निर्माण होते. तर
ग्रंथपाल हा पुस्तकांचा रखवालदार नसून ज्ञानाचा मार्गदर्शक आहे.
ग्रंथपाल म्हणजे ‘बुककीपर’ नव्हे, तर ‘Knowledge Facilitator’ हे समजून घेणे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे, आजच्या काळातील आदर्श शालेय ग्रंथपालाची भूमिका बदलली आहे.
त्याने आपल्या ग्रंथालयात —
- Reading Club सुरू करावा
- Book Talk आयोजित करावा
- Storytelling करावे
- Book Review स्पर्धा घ्यावी
- लेखकांशी संवाद आयोजित करावा
- पुस्तक प्रदर्शन भरवावे
- विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य वापरायला शिकवावे
- डिजिटल लायब्ररीची माहिती द्यावी
- Information Literacy विकसित करावी
- विद्यार्थ्यांना योग्य पुस्तकाची निवड करून द्यावी
- विविध विषयांशी संबंधित वाचन साहित्य उपलब्ध करून द्यावे
- विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र वाचनाची सवय निर्माण करावी
आपल्याला माहिती असायला हवे कि Samagra Shiksha च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही Reading Clubs आणि विविध वाचनविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
मग आता प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाला…
राज्याच्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल आपण सातत्याने चर्चा करतो. तसेच स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण, AI, ICT, कौशल्याधारित शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा याबद्दल मोठ्या प्रमाणावर बोलले जाते. परंतु या सर्वांसोबत विद्यार्थ्यांच्या वाचनसंस्कृतीचे काय?
शाळांमध्ये ग्रंथालये आहेत का?
असतील तर ती नियमितपणे चालतात का?
पुस्तकांचा वापर किती विद्यार्थी करतात?
ग्रंथपालाची पदे किती मंजूर आहेत?
त्यापैकी किती पदे रिक्त आहेत?
किती पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत?
रिक्त पदे भरण्यासाठी शासनाची निश्चित कालमर्यादा काय आहे?
या प्रश्नांची सार्वजनिक आणि पारदर्शक उत्तरे महाराष्ट्रातील पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रंथपालांना मिळायला नकोत का?
Librarian भरतीचा प्रश्न रोजगारापुरता मर्यादित नाही
राज्यशासनाने शालेय शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रियेचा विचार केला असल्याची माहिती मध्यंतरी २०२५ मध्ये समोर आली होती. या प्रक्रियेत ग्रंथपालांसारख्या शिक्षकेतर पदांचाही समावेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. राज्य शासनाची ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु आता गरज आहे ती घोषणांची नव्हे, तर ठोस अंमलबजावणीची. कारण राज्यात शिक्षण भरती होत असता ग्रंथपाल Librarian पदाबद्दल अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही हि चिंतेची बाब आहे.
जर महाराष्ट्राला ‘वाचनसमृद्ध महाराष्ट्र’ बनवायचे असेल तर…
महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत, विद्यालयात —
ग्रंथालय + पुरेशी पुस्तके + प्रशिक्षित ग्रंथपाल + नियमित वाचन उपक्रम + डिजिटल संसाधने
ही पाचही घटक एकत्र असणे आवश्यक आहे. आता केवळ ग्रंथालयाची खोली बांधून किंवा काही पुस्तके खरेदी करून वाचनसंस्कृती निर्माण होणार नाही. तर त्यासाठी माणूस आवश्यक आहे. आणि तो म्हणजे— प्रशिक्षित ग्रंथपाल.
Librarian पदभरती बाबत आता निर्णयाची वेळ आली आहे
१२ ऑगस्टला आपण डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन करू.
त्यांच्या ग्रंथालयविषयक विचारांची आठवण करू.
परंतु त्याच वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारूया—
“तुझ्या शाळेत ग्रंथालय आहे का?”
आणि त्यानंतर शासनाला विचारूया—
“तुमच्या शाळेत प्रशिक्षित ग्रंथपाल आहे का?”
जर उत्तर ‘नाही’ असेल तर पुढचा प्रश्न अधिक गंभीर आहे—
“मग विद्यार्थ्यांना वाचनाची आणि ज्ञानाची संस्कृती कोण देणार?”
महाराष्ट्र शासनाने या प्रश्नाकडे केवळ ग्रंथपालांच्या पदभरतीचा विषय म्हणून पाहू नये.
हा विषय आहे— महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीच्या ज्ञानाचा.
आज रिक्त असलेले एक ग्रंथपाल पद उद्या एका विद्यार्थ्याच्या हातातील पुस्तक कमी करू शकते असे राज्यशासनाला नाहीका वाटत? आणि एका विद्यार्थ्याच्या हातातील पुस्तक कमी झाले, तर कदाचित एका समाजाच्या ज्ञानविश्वातील एक खिडकी बंद होते असे नाहीका होत ?
म्हणूनच या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी मागणी एकच—
“महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत सक्षम ग्रंथालय आणि प्रत्येक आवश्यक शाळेत प्रशिक्षित ग्रंथपाल द्या!”
कारण!
शाळा ज्ञानाचे मंदिर असेल, तर ग्रंथालय त्याचे ज्ञानभांडार आहे आणि ग्रंथपाल त्या ज्ञानभांडाराचा मार्गदर्शक आहे.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने हा प्रश्न केवळ ग्रंथपालांचा नाही—तो प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे.
National Librarian Day निमित्त राज्यशासनास (मुख्यमत्री महोदय व शिक्षण मंत्री महोदायास खुले पत्र)
प्रति,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
विषय : महाराष्ट्रातील शालेय ग्रंथालये सक्षम करण्यासाठी रिक्त ग्रंथपाल पदे तातडीने भरणे व प्रत्येक आवश्यक शाळेत प्रशिक्षित ग्रंथपाल उपलब्ध करून देण्याबाबत.
महोदय,
१२ ऑगस्ट हा सबंध देशभरात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी शालेय ग्रंथालयांचे महत्त्व, वाचनसंस्कृती आणि ग्रंथपालांची भूमिका यावर अनेक कार्यक्रम शैक्षणिक क्षेत्रात आयोजित केले जातात. मात्र या कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील शालेय ग्रंथालय व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आता आली आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये ग्रंथालये उपलब्ध आहेत; परंतु अनेक ठिकाणी प्रशिक्षित ग्रंथपालांची पदे रिक्त असल्याची समस्या सातत्याने चर्चेत आहे. काही ठिकाणी रिक्त पदांमुळे ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भसाहित्य आणि उपलब्ध संसाधनांचा विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रमाणात उपयोग करून देणे कठीण होते.
म्हणून या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाला काही थेट प्रश्न विचारणे आवश्यक वाटते.
शासनाला काही मूलभूत प्रश्न अश्याप्रकारे आहेत !
१. महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित आणि इतर संबंधित शाळांमध्ये ग्रंथपालांची एकूण किती मंजूर पदे आहेत?
२. त्यापैकी सध्या किती पदे रिक्त आहेत?
३. गेल्या पाच/दहा वर्षांपासून रिक्त असलेल्या ग्रंथपाल पदांची संख्या किती आहे?
४. रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने निश्चित कालबद्ध कार्यक्रम आखला आहे का?
५. ग्रंथपाल पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र आणि पारदर्शक प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
६. शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या ग्रंथालयांचा प्रत्यक्ष वापर किती प्रमाणात होतो, याचे नियमित मूल्यांकन केले जाते का?
७. ज्या शाळांमध्ये ग्रंथपालाचे पद नाही किंवा पद रिक्त आहे, त्या शाळांमध्ये ग्रंथालयाचे व्यवस्थापन कोण करीत आहे?
८. प्रशिक्षित ग्रंथपालाऐवजी इतर कर्मचाऱ्यांकडून ग्रंथालयाचे काम करून घेतल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या वाचनविकासावर काय परिणाम होतो, याचे शासनाने मूल्यांकन केले आहे का?
९. प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय जीवनात नियमित वाचनाची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वतंत्र वाचनविकास नीती आहे का?
१०. डिजिटल शिक्षणाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर शालेय ग्रंथपालांना Digital Library, Information Literacy, AI Literacy आणि डिजिटल संसाधन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची योजना शासनाकडे आहे का?
शासनाने आता काय करावे म्हणून अपेक्षा ?
आमची मागणी केवळ ग्रंथपालांची पदे भरण्यापुरती मर्यादित नाही.
राज्यातील शालेय ग्रंथालयांसाठी पुढील उपाय तातडीने करण्यात यावेत—
१. रिक्त ग्रंथपाल पदांची राज्यव्यापी आकडेवारी जाहीर करावी.
जिल्हानिहाय, विभागनिहाय आणि शाळानिहाय रिक्त पदांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करावी.
२. मंजूर व रिक्त पदांच्या भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.
‘कधी भरती होणार?’ या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना आणि पात्र उमेदवारांना मिळाले पाहिजे.
३. प्रत्येक आवश्यक शाळेत प्रशिक्षित ग्रंथपाल उपलब्ध करून द्यावा.
ग्रंथालय हा शाळेचा अविभाज्य शैक्षणिक घटक म्हणून विकसित करावा.
४. शालेय ग्रंथालयांसाठी स्वतंत्र आणि पुरेसे अर्थसंकल्पीय नियोजन करावे.
पुस्तक खरेदीसोबतच फर्निचर, डिजिटल संसाधने, ई-पुस्तके, संगणक, इंटरनेट आणि ग्रंथालय व्यवस्थापन प्रणाली यासाठीही निधी उपलब्ध करावा.
५. ‘Reading Maharashtra’ किंवा ‘वाचन समृद्ध महाराष्ट्र’ अभियान सुरू करावे.
प्रत्येक शाळेत—
- Reading Club
- Book Review
- Storytelling
- पुस्तक प्रदर्शन
- लेखक संवाद
- वाचन स्पर्धा
- पुस्तक चर्चा
- विद्यार्थी ग्रंथालय समिती
अशा उपक्रमांचे वार्षिक नियोजन करावे.
६. ग्रंथपालांसाठी नियमित प्रशिक्षण सुरू करावे.
आधुनिक ग्रंथपालाला केवळ पुस्तक व्यवस्थापन नव्हे, तर डिजिटल संसाधने, माहिती साक्षरता, AI साधने, ई-लायब्ररी आणि विद्यार्थ्यांच्या वाचनविकासाचे प्रशिक्षण आवश्यक आहे.
७. शालेय ग्रंथालयांचे नियमित ऑडिट करावे.
फक्त पुस्तकांची संख्या तपासण्याऐवजी—
किती विद्यार्थी ग्रंथालय वापरतात?
दर महिन्याला किती पुस्तके वितरित होतात?
वाचन उपक्रम किती झाले?
ग्रंथालय किती तास खुले असते?
डिजिटल संसाधनांचा वापर किती होतो?
याचेही मूल्यांकन व्हावे.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी आजचा शेवटचा प्रश्न
महाराष्ट्राला ज्ञानाधारित, वाचनसमृद्ध आणि विचारशील समाज घडवायचा असेल, तर शाळेतील ग्रंथालयाकडे दुय्यम घटक म्हणून पाहणे थांबवावे लागेल. भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणांमध्येही वाचनसंस्कृती वाढविणे, शैक्षणिक संस्थांतील ग्रंथालये मजबूत करणे आणि पुरेसा ग्रंथालय कर्मचारी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.मग महाराष्ट्राने या दिशेने अधिक ठोस पाऊल उचलण्याची वेळ आलेली नाही का?
१२ ऑगस्टला ग्रंथपालांचा सत्कार करा, त्यांच्या कार्याचा गौरव करा; पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील रिक्त ग्रंथपाल पदे भरा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ग्रंथालय पोहोचवा.
कारण विद्यार्थ्याला पुस्तक देणे म्हणजे केवळ पुस्तक देणे नाही तर त्या विद्यार्थ्याला विचार करण्याची संधी देणे हा आहे. आणि विद्यार्थ्याला विचार करण्याची संधी देणे म्हणजेच महाराष्ट्राच्या भविष्याला दिशा देणे आहे.
विषय : शालेय ग्रंथालय व ग्रंथपालांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेला एक साधारण परंतु अतिशय महत्वपूर्ण प्रश्न ?
शरद खंडारे
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

