Site icon Desh Varta

Paint Mumbra Green वाद: AIMIMच्या 22 वर्षीय नगरसेविका Sahar Sheikh यांचे आक्रमक भाषण व्हायरल ! नेमका वाद काय ?

‘Paint Mumbra Green’; Sahar Sheikh’s Viral Speech Puts AIMIM at Centre of Political Debate

मुंब्रामधील AIMIMच्या सर्वात तरुण नगरसेविका Sahar Sheikh यांच्या ‘पुढील 5 वर्षांत मुंब्राला हिरवे रंगवू’ या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. आक्रमक भाषणामुळे राजकीय वाद पेटला.

‘पुढील 5 वर्षांत मुंब्राला पूर्णपणे हिरवे रंगवू’ – AIMIMच्या 22 वर्षीय नगरसेविका Sahar Sheikh यांचे वादग्रस्त वक्तव्य; व्हिडिओ व्हायरल

महापालिका निवडणुकीनंतर Sahar Sheikh यांच्या आक्रमक भाषणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देशावार्ता | प्रतिनिधी

राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत AIMIMला मिळालेल्या भासघोस यशानंतर मुम्ब्रा येथे निवडून आलेल्या पक्षाच्या 22 वर्षीय आणि सर्वात तरुण महिला नगरसेविका Sahar Sheikh यांच्या विजया नंतर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या भाषणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Sahar Sheikh नेमक्या काय म्हणाल्या ?

त्यांच्या म्हनन्यानुसार सर्वाना वाटत होते की ‘AIMIM संपेल असे वाटले, पण आम्ही जिंकलो’ – तर विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात बोलताना sahar-sheikhयांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या,

“आमचे विरोधकाना वाटत होते AIMIM संपेल असे ते समजत होते. पण आम्ही नियोजनबद्ध लढत दिली आणि विजय मिळवला.”

स्वतःची तुलना सिंहाच्या पिल्लाशी करत तिने असा दावा केला की, “माझ्याविरोधात गिधाडांची फौज उतरवण्यात आली होती, पण ती अपयशी ठरली.” त्यानी बोलताना असेही वक्तव्य केले की ‘पुढील पाच वर्षांत मुंब्रातील प्रत्येक उमेदवार AIMIMचा असेल’ त्यांच्या या भाषणातील सर्वात वादग्रस्त विधान म्हणजे, पुढील पाच वर्षांत मुंब्रातील प्रत्येक उमेदवार AIMIMचा असेल. मुंब्राला पूर्णपणे हिरवे रंगवायचे आहे.” राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या मते, हे वक्तव्य राजकीय एकत्रीकरण आणि संघटनाची स्पष्ट घोषणा असून, त्यांच्या या भाष्यामुळे मुम्ब्र्यातिल परिसरातील ध्रुवीकरण अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही टीकाकारांकडून दिला जात आहे.

Sahar Sheikh यांचा विरोधकांवर आरोप

ह्या निवडनुकित पैशांचा वापर, कटकारस्थानांचा आरोप त्यानी ह्या वेळेस केलेला आहे, sahar-sheikhयांनी त्यांच्या भाषणात महापालिका निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर आणि राजकीय कटकारस्थानं झाल्याचा आरोप केला. मात्र, “जनतेने या सर्व गोष्टी नाकारून पतंग या AIMIMच्या चिन्हावर विश्वास दाखवला,” असे sahar-sheikhम्हणाल्या.

Sahar Sheikh यांचा राजकीय वारसा आणि नेतृत्वाची पार्श्वभूमी काय ?

आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना Sahar Sheikh यांनी “इक्बाल शेख आणि युनूस शेख” यांच्याशी असलेल्या आपल्या नात्याचा उल्लेख केला आहे. हा संघर्ष, जनतेशी थेट संपर्क आणि मैदानातील राजकारणाचा वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले.

NOTA मतांनी दिला धक्का; NOTA ला तुतारी’पेक्षा अधिक मते !

विजयी सभेतील भाषणादरम्यान Sahar Sheikh यांनी मुंब्रामधील NOTA (None of the Above) मतांवरही विधान केले आहे. त्यांच्या या विधानानुसार, सुमारे 12 हजार मतदारांनी NOTAचा पर्याय निवडला, जो शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ या चिन्हापेक्षा अधिक आहे. त्यांच्या मते “हे पारंपरिक राजकीय पक्षांविरोधातील नाराजी आणि नव्या पर्यायाच्या शोधाचे संकेत आहेत,” असे Sahar Sheikh म्हणाल्या.

Sahar Sheikh यांच्या विधानाने राजकीय तापमान वाढण्याची शक्यता !

Sahar Sheikh यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे ठाण्यातील मुंब्रा परिसरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता सांगितली जात असून, येत्या काळात AIMIMची भूमिका अधिक आक्रमक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version