-
बाबासाहेबांच्या विचारांचे युग सुरू झाले आहे; अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विधान!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात एक महत्वाचे विधान केले आहे; त्यानी असे म्हटले आहे कि, सम्पुर्ण देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत झाली व होत आहे, महाराष्ट्रासोबत इतर राज्यांतही बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आपल्याला वाढताना दिसत आहे. बाबासाहेबांच्या विचारांकडे एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या महत्वपुर्ण विधानात असे मत स्पष्ट केले आहे की, आंबेडकरी विचारसरणीच्या तरुनांनी तसेच त्यांच्या अनुयायांना आता फक्त बाबासाहेबांचे जीवन मांडण्यापेक्षा, त्यांच्या विचारांचा अनुकरण करताना नव्या काळातील प्रश्नांना उत्तर देण्यावर भर द्यावा लागेल.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीसमोर आजच्या काळातील नवे प्रश्न ?
तसेच बाळासाहेबानी असे म्हटले आहे कि, घोषणा देण्याचे युग आता संपले आहे. तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे युग केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर सम्पुर्ण देशामध्ये सुरू झाले आहे. नव्या पिढीसमोर आता जे प्रश्न उभे आहेत, त्यांची उत्तरं फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणे हे आजच्या तरुण पिढीपुढील सर्वात मोठं आव्हान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर समाजात एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजदेखील जाती-धर्माच्या भिंती काही अंशी टिकून आहेत याकडे दुर्लक्ष करुण चालनार नाही. तसेच त्यानी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना या एका मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये ते असे म्हणतात – समाजामध्ये जशी नवी पिढी येते, तशी जुन्या लढ्यांविषयीची माहिती कमी होत जाते. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वत: अनुभवली जात नाही, तोपर्यंत तिचा खरा अर्थ समजत नाही. आज समाजात काही राजकीय पक्षांनी धर्म आणि जात या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक आता त्या चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर मह्त्वाचे विधान !
आजचा हा काळ ‘घोषणाबाजीचे युद्ध’ न राहता विचारांच्या निर्मितीचा, तसेच मनावर परिणाम करणाऱ्या साहित्य निर्मितीचा आणि समाजाच्या वास्तवाला भिडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आहे. या पार्श्वभूमीवर, फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंतांनी भावनिकतेपेक्षा वास्तववादी भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचे आजच्या काळाशी सुसंगत विश्लेषण करणे आणि समाजाला दिशा देणे ही मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.
अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याचे टाळले ?
पत्रकारानी अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा मुद्दा देखील उपस्थित केला ते असे म्हनाले बाबासाहेबांच्या जयंती निमीत्त एका कार्यक्रमाच्या पत्रिकेत या दोघांची नाव असतानाही त्यांना भाषणाची संधी नाही मिळाली यावर तुमचे मत काय ? असा प्रश्न विचारला असता अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी यासंदर्भात मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. मात्र, त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून एवढे मात्र स्पष्ट झाले की बाबासाहेबांच्या विचारांना राजकीय स्वार्थासाठी वापरण्याचे प्रकार समाज आता ओळखू लागला आहे.
डॉ. बाबासाहेबांनी सांगितले होते की, “माणूस हा समाजाचा केंद्रबिंदू आहे.” आज त्यांच्या याच तत्वावर आधारित व्यवस्था उभी करण्याची वेळ आहे. समाजाला दिशा देणारे विचारवंत ही जबाबदारी कशी पार पाडतात, यावरच पुढील समाजघटनांचे भवितव्य अवलंबून आहे. असे महत्वाचे विधान अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

