Site icon Desh Varta

UGC नियमांवरील स्थगितीवर प्रकाश आंबेडकर संतप्त; नोकरदार वर्गाला इशारा ?

तुम्ही आरक्षणापुरतेच आहात का? – प्रकाश आंबेडकरांचा UGC नियमंवारून सुशिक्षित बहुजनांना थेट सवाल ?

UGC नियमंवारून “तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आहात का?” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित नोकरदार वर्गाला परखड सवाल ? काय आहे नेमके प्रकरण जानून घ्या.

UGC नियमांवरून वाद पेटला; प्रकाश आंबेडकरांचा सुशिक्षित बहुजनांना थेट प्रश्न ?

राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण धारी बहुजन समाजातील सुशिक्षित आणि नोकरदार वर्गावर तीव्र शब्दांत त्याना संकेत देत, सामाजिक चळवळीबाबतची उदासीनता उघड केली आहे. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहेत. यूजीसीच्या (UGC) नव्या नियमावलीविरोधातील सुरु असलेल्या आंदोलन आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा थेट सवाल केलेला आहे.

UGC नियमांवरचे नेमके प्रकरण काय आहे?

देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचे असणारे विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक संस्थांमध्ये जाती, धर्म, वंश, लिंग आणि दिव्यांगत्वाच्या आधारे होणारा भेदभाव याला रोखण्यासाठी नवीन नियम लागू केले होते. या नियमांचा उद्देश एससी, एसटी, ओबीसी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरक्षित, समताधिष्ठित वातावरण उपलब्ध करून देणे हा होता. परंतु या नियमांविरोधात देशातील सवर्ण आणि काही विशिष्ट गटांकडून जोरदार आंदोलने करण्यात आली. या आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टाने संबंधित नियमांना तात्पुरती स्थगिती दिली, ज्यामुळे बहुजन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.

“जातिवादी रस्त्यावर उतरले, तुम्ही कुठे होता?” प्रकाश अम्बेडकरांचा सवाल?

वंचिताचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत आरक्षण धारी सुशिक्षिताना विचारले की, “जातिवादी गट रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते, तेव्हा तुम्ही काय करत होतात? तुम्ही रस्त्यावर का उतरला नाही?” हां सवाल त्यानी सुशिक्षित आणि नोकरदार बहुजन वर्गावर बोट ठेवत त्यांनी विचारले की, “तुम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा आणि आरक्षणाचा फायदा घेण्यासाठीच आहात का? आराक्षनाच्या विरोधात जेव्हा प्रतिगामी रस्त्यावर उतरत आहे तर तेव्हा तुम्ही काय करत आहात ?

UGC नियमांवरुन ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा स्पष्ट इशारा जात कधीच माफ करत नाही!

शिक्षित समाजाला उद्देशून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा स्पष्ट इशारा दिलेला आहे की “तुम्ही कितीही प्रगती केली, कितीही उच्च पदावर पोहोचला, तरी जातिवादी मानसिकता तुम्हाला तुमच्या जातीच्या चष्म्यातूनच पाहते,” असा इशारा देत आंबेडकरांनी सामाजिक वास्तव अधोरेखित केले. यावेळी त्यानी रोहित वेमुला आणि डॉ. पायल तडवी यांच्या दुर्दैवी मृत्यूंचा संदर्भ देत त्यांनी विचारले, की “तुमची मुले उद्या पुढील बळी ठरावीत असे तुम्हाला वाटते का?”

पुढची पिढी माफ करणार नाही!

प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की, आजचे आजी-आजोबा आणि आई-वडील यांनी रक्ताचे पाणी करून, वेळ आणि पैसा देऊन ही चळवळ जिवंत ठेवली. त्यामुळेच आजची पिढी सन्मानाने जगत आहे. मात्र, “ही पिढी आता इतिहासाचा भाग होत चालली आहे. आजची सुशिक्षित पिढी आणि नोकरदार वर्ग चळवळीसाठी नेमके काय योगदान देत आहे?” असा थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आज जर आपल्या न्याय्य हक्कांसाठी,तसेच अधिकारांसाठी रस्त्यावर उतरलो नाही, तर तुमची पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुले राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ

यूजीसी च्या धोरना वरुण सुरु झालेला गदारोळ व त्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे हे वक्तव्य केवळ राजकीय नाही, तर सामाजिक आत्मपरीक्षण घडवणारे असल्याचे मानले जात आहे. बहुजन समाजातील सुशिक्षित वर्गाची भूमिका, जबाबदारी आणि भविष्यातील दिशा यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

 

Exit mobile version