Republic Day 2026 भारत साजरा करणार 77वा प्रजासत्ताक दिन जाणून घ्या महत्त्व
Republic Day 2026 या वर्षी भारत 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. ज्यामध्ये संविधानाचा इतिहास, राजधानीतील कर्तव्य पथावरील संचलन, 26 जानेवारीचे महत्त्व व देशभरातील उत्सवाची सविस्तर माहिती वाचा.
Republic Day 2026 77वा की 78वा? जाणून घ्या सविस्तर माहिती
ह्या वर्षी 26 जानेवारी 2026 रोजी भारत देश 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार; संविधान, लोकशाही व् त्याची मूल्ये आणि राष्ट्रीय एकतेचा हा उत्सव आहे. 26 जानेवारी 2026 रोजी भारत देश आपला 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात सम्पूर्ण देशभरात साजरा करणार आहे. याच दिवशी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले असून, भारताने स्वतःच्या संविधानानुसार राज्यकारभार सुरू केला होता. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन लोकशाही, बहुविविधता आणि संविधानाच्या शाश्वत प्रभावावर केंद्रित असेल. भारताला इंग्रजांपासून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले, तरी 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाल्यानंतरच भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला हे सर्वाना माहिती असायला हवे.
Republic Day 2026, 77 वर्षांचा संविधानिक प्रवास कसा आहे ?
यंदा भारतीय संविधान लागू होउन 77 वर्षे पूर्ण होत आहेत. या सम्पूर्ण कालावधीत संविधानाने देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीला दिशा देण्याचे कार्य केले आहे.
Republic Day 2026 च्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व
- 77 वर्षामध्ये भारताच्या संविधानिक प्रवासाचा गौरव
- लोकशाही तत्वान्च्या संस्थांची मजबुती करने
- देशातील प्रशासन, संरक्षण, तंत्रज्ञान व सामाजिक विकासातील प्रगती
- भारताच्या ‘विविधतेत एकता’ या तत्त्वाशी असलेली बांधिलकी जपने
Republic Day 2026 कर्तव्य पथावर भव्य प्रजासत्ताक दिन संचलन
नवी दिल्लीतील कर्तव्य पथ (Kartavya Path) येथे होणारे प्रजासत्ताक दिन संचलन हे उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. आणि प्रत्येक वर्षी येथे असंख्य देशप्रेमी संचलन बघायला दखल होतात.
Republic Day 2026 निमित्त कुणाला संचलनात पाहायला मिळणार?
Republic Day 2026 करीता या वर्षी दिल्ली येथे विविध लष्कर व निमलष्करी दलांची भव्य संचलने सादर करण्यात येतील त्यासोबतच, विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आकर्षक चित्ररथ सुद्धा पहावयास मिळतील तसेच स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होणार आहे व या निमित्ताने भारताच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारे कार्यक्रम प्रस्तुत होतील.
संविधानाची विशेषत राष्ट्राची आत्मा
भारतीय संविधान हे जगातील सर्वात दीर्घ लिखित तसेच सर्वात मोठे लिखित संविधान मानले जाते. ते नागरिकांना पुढील प्रमाने मूलभूत अधिकारांची हमी देते—
- भारतीय संविधान हे नागरिकांना मूलभूत अधिकार देतात
- भारतीय संविधान हे नागरिकांना कायद्यापुढे समानता शिकवतात
- भारतीय संविधान हे नागरिकांना धर्मनिरपेक्षतेचा अधिकार देतात
- भारतीय संविधान हे नागरिकांना सर्व नागरिकांसाठी न्याय व स्वातंत्र्याची हमी देतात
- 77 वर्षांनंतरही संविधान भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ आहे.
- सम्पूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचे उत्सव साजरे केले जातात.
प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात कोठे आणि कश्या उपक्रमांनी साजरा केला जातो ?
देशातील सम्पूर्ण शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात येतो. सर्व ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणे होतात तसेच स्वातंत्र्यसैनिक व संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहिली जाते तसेच राष्ट्रीय अभिमान दर्शवणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.
संविधानिक मूल्यांची आठवण
प्रत्येक वर्षी २६ जानेवारी रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन हा केवळ औपचारिक सोहळा नसून, संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची सामूहिक जबाबदारी तसेच देशाप्रती आठवण करून देणारा दिवस आहे. 77वा प्रजासत्ताक दिन भारताच्या संघर्षमय इतिहासाला, आजच्या यशाला आणि उज्ज्वल भविष्याला समर्पित असा राष्ट्रीय उत्सव ठरणार आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

