Site icon Desh Varta

यवतमाळ-अमरावती मार्गावर Shivashahi बसला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

“यवतमाळ-अमरावती महामार्गावर धावणाऱ्या Shivshahi बसला भीषण आग लागली. सुदैवाने चालक, कंडक्टर आणि प्रवासी सुखरूप बचावले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अधिक वाचा या दुर्घटनेबाबत!”

पुण्यामध्ये नुकतिच आगिची घटना घडली असतना दुसरी घटन यवतमाळ- अमरावती महामर्गावर घडली आहे त्यामुळे प्रवाशांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बसमधील आगीच्या दुर्घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने यावर नेमकी काय उपाययोजना करायला हवी असा सवाल समान्य लोकांकडून उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे प्रमाण जास्त प्रमानामध्ये वाढत असत त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देने गरजेचे आहे.

शनिवार दिनांक 22 मार्च रोजी यवतमाळ-अमरावती महामार्गावर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन विभागाची शिवशाही बस जी प्रवाशाना घेऊन जात होती त्या शिवशाही बसला वाटेतच अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत येनार्या हद्दीतील चोरमाऊली या गावाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे. शिवशाही बस ला आग लागताच बसमधील चालक, कंडक्टर आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तत्काळ बसमधून बाहेर पळ काढला व आपला जीव वाचवला. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही व मोठा अनर्थ टळला, मात्र यामध्ये संपूर्ण बस काही क्षणांतच जळून खाक झाली.

या बसला आग कशामुळे लागली तर प्राथमिक माहितीनुसार, बसला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या ठिकानी हि दुर्घटना घडली त्याठिकानचे स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसला आग लागल्यानंतर काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. काही वेळानी घटनास्थळी नजीकचे बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.

Shivshahi बसमधील प्रवाशांचे प्रसंगावधान !

बसमध्ये प्रवास करित असताना घटनेच्या वेळी बसमध्ये काही प्रवासी उपस्थित होते. महामार्गावर बसला आग लागल्याचे चालकाच्या व कंडक्टरच्या लक्षात येताच चालक आणि कंडक्टरने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना त्वरित बसच्या खाली उतरवले व त्यांच्या ह्या चालाखीमुळे मात्र मोठा अनर्थ टळला व कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्यामुळे कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही.

आग नेमकी कशामुळे !  पुढील तपास सुरू ?

शिवशाही बसला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ठिकानचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला, बसचे ड्रायवर, कंडक्टर, व प्रवाशांचे मते जानुन घेतली व स्थानिक लोकांशी संवाद साधला असून पुढील तपास त्यांच्यामार्फत सुरू आहे. त्याना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हि आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे समजले जात आहे व त्याप्रकारची शक्यता मानली जात असली तरी नेमके बसला आग लागण्याचे कारण काय होते, याचा शोध स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून घेतला जात आहे.

देशातील राज्यभरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर जाणून घेण्यासाठी आजच आमच्या (देशवार्ता) न्यूज पोर्टल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version