Site icon Desh Varta

Akola मानसशास्त्र विद्यार्थ्यांची कर्णबधिर बालविकास केंद्र व मनोरुग्णालयाला अभ्यासपूर्ण भेट

Akola मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त मानसशास्त्र विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

कर्णबधिर बालविकास केंद्र व मनोरुग्णालयाला भेट; प्रत्यक्ष अनुभवातून मानसिक आरोग्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृत

अकोला, दि. ६ ऑक्टोबर २०२६ :

श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहा’निमित्त विविध अभ्यासपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी कर्णबधिर बालविकास केंद्र तसेच मनोरुग्णालयाला भेट देऊन मानसिक आरोग्य, विशेष बालकांचे सक्षमीकरण आणि मानसोपचार क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा अनुभव घेतला

श्री शिवाजी कॉलेज Akola News

 

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी ज्योतीनगर, जठारपेठ येथील ‘एकविरा बहुउद्देशीय संस्था’ संचलित कर्णबधिर बालविकास व पालक सक्षमीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्रातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, शिक्षण, प्रशिक्षण आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेविषयी माहिती घेतली.

यावेळी संस्थेची माहिती देताना डॉ. आशिष कांडेलकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सन २००८ पासून कार्यरत असलेल्या या संस्थेतून आतापर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल केली आहे. सध्या ४२ कर्णबधिर बालके शिक्षण घेत असून, स्वमग्नता (ऑटिझम) असलेल्या ८ बालकांनाही मार्गदर्शन, प्रशिक्षण व समुपदेशन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सारिका कांडेलकर, शिक्षक योगेश वाढवी व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष पस्तापुरे यांनी संस्थेचे चालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

यानंतर विद्यार्थ्यांनी जठारपेठ येथील डॉ. सुजय पाटील यांच्या मनोरुग्णालयाला भेट दिली. येथे विद्यार्थ्यांना विविध मानसिक आजारांची लक्षणे, रुग्णांचे व्यवस्थापन आणि उपचारपद्धती याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली. डॉ. सुजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, विविध मानसोपचार पद्धती तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रातील आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले.

या क्षेत्रभेटीमुळे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष क्षेत्रातील कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. विशेष बालकांचे सक्षमीकरण, मानसिक आजारांविषयी संवेदनशीलता आणि मानसिक आरोग्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now

फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप

टेलिग्राम जॉईन करा

Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version