Site icon Desh Varta

राज्यात Temperature Alert! अकोला सर्वाधिक तर, नागपूर 42.2 पार !

राज्यात तापमान वाढत असून हवामान विभागाने Temperature Alert जारी केला आहे. अकोला ४३.२ अंशांसह राज्यात सर्वाधिक तापले, तर नागपूरमध्ये ४२.२ अंशांची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेचा तडाखा जाणवतोय. उद्या कोकणासाठी Yellow Alert जारी!

विदर्भात उन्हाचा तडाखा! अकोला राज्यात सर्वाधिक उष्ण, नागपूरमध्ये ४२.२ अंशांची नोंद पहा तुमच्या शहरातील आजचे तापमान किती ?

अकोला, ७ एप्रिल – राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या प्रभावानंतर दोन दिवस राज्यात उष्णता कमी प्रमाणात होती परंतू पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा जाणवू लागला आहे. रविवारी राज्यातील अकोला, नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील तापमानाने उसळी घेतली असून तर दर वर्षीप्रमाने अकोला राज्यातील सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानासह आघाडीवर राहिला आहे.

राज्यातील हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये तापमान ४२.२ अंशांवर पोहोचले असून, हे तापमान या वर्षीच्या हंगामातील सर्वाधिक असे तापमान ठरले आहे. मागील २४ तासांत तापमानात तब्बल २ अंशांची वाढ झाल्याची दिसली आहे. त्यामुळे उन्हाच्या दिवसामध्ये आनखी किती वाढ होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे, सोबतच नागपूरकरांनी रविवारी दोन वर्षांतील सर्वात उष्ण दिवस अनुभवला आहे.

विदर्भातील इतर जिल्ह्यातील तापमान नोंदी:

राज्यातील बुलढाणा वगळता संपूर्ण विदर्भात पारा ४० अंशांच्या वर गेला असल्याचे पहायला मिळत आहे.

राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही वाढता उष्माघात !

मराठवाड्यातील परभणीमध्ये तापमान ३८.२ अंशांपर्यंत पोहोचले असून, नाशिकमध्येही यंदा पारा ४०.२ अंशांवर गेला आहे जो मागिल वर्षीच्या तुलनेने जास्त प्रमाणात मानला जात आहे. सोबतच मालेगाव, धुळे, जळगाव आणि यवतमाळमध्येही तापमान ४० अंशांच्या वर नोंदवले गेले आहे. यासोबतच राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जसेकी सोलापूर, जेऊर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा येथे तापमान ३९ अंशांपेक्षा अधिक पहायला मिळाला आहे.

कोकणात तापमानाचा (Temperature Alert!) येलो अलर्ट:

उद्या (8 एप्रिल) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता वर्तवली असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्याच्या इतर भागांतही ढगाळ हवामानासह तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील हवामान बदलामागील कारणे:

मागील काही दिवसान्मध्ये दक्षिण भागातील कर्नाटक परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, राज्यातील मराठवाड्यापासून ते दक्षिणेतील तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असून, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. व याचाच परिणाम म्हणुन राज्यात काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी उष्ण वातावरण पहावयास मिळत आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती आहे? खाली कमेंटमध्ये तुमच्या भागातील हवामानविषयी माहिती शेअर करा!

Exit mobile version