Buddha Purnima बुद्ध पूर्णिमा जगभरात का साजरी केली जाते? जाणून घ्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाशी संबंधित या पवित्र दिवसाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व.
जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा Buddha Purnima पवित्र योग; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात भव्य परंपरा
Buddha Purnima ही जगभरातील बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण म्हणून ओळखली जाणारी “बुद्ध पूर्णिमा” आज समूर्ण देशभर आणि जगभरात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येणाऱ्या या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील तीन अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या जसेकी त्यांचा —जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण.
Buddha Purnima गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?
बौध इतिहासानुसार, तथागत भगवान बुद्धांचा जन्म आजच्या नेपाळमधील Lumbini येथे झाला. त्यांची आई माता महामाया यांनी त्यांना शाल वृक्षाखाली जन्म दिला आणि नंतर त्यांचे पालनपोषण हे त्यांची मावशी प्रजापती गौतमी यांनी केले. राजकुमार सिद्धार्थ म्हणून जन्मलेल्या बुद्धांनी वैभवशाली जीवनाचा आषाढ़ पोर्णिमेच्या दिवशी त्याग करून सत्याच्या शोधासाठी कठोर तपश्चर्या ध्यानसाधाना केली.
Buddha Purnima गौतम बुद्धाचा ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वान ?
यानंतर, सिद्धार्थ गौतमास बिहारमधील बोधगया येथे बोधिवृक्षाखाली वैशाख पोर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली. त्यांनी त्यांच्या उपदेशांचा पहिला प्रसार उत्तर प्रदेशातील Sarnath या ठिकाणाहून प्रारंभ केला. जेथे त्यांनी मृगदाय वनात धर्मचक्र प्रवर्तन केले. व् वैशाख पोर्निमेलाच पुढे, उत्तर प्रदेशातील Kushinagar कुशिनारा येथे त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले.
वैशाख पोर्णिमेच्या दिवशी बौद्ध अनुयायी विहारात जाऊन प्रार्थना करतात, ध्यानसाधना करतात आणि भगवान बुद्धांच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करतात. लुंबिनी, सारनाथ आणि कुशीनगर ही स्थळे बौद्ध धर्मातील सर्वाधिक पवित्र तीर्थक्षेत्रे मानली जातात, जिथे हजारो नाही तर लाखो धम्म बांधव दर्शनासाठी येतात.
आज भारताबरोबरच थायलंड, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, व्हियतनाम, चीन, जापान यांसारख्या देशांमध्येही बुद्ध पूर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी समाजात शांती, अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला जातो.
Buddha Purnima महाराष्ट्रात कशी साजरी केली जाते ?
महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताचे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अम्बेडकर यांनी 1953 पासून देहु पुणे ह्या ठिकाणाहून बुद्ध जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. त्यांच्या प्रेरणेने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. लाखो अनुयायी एकत्र येऊन भगवान बुद्धांना अभिवादन करतात आणि त्यांच्या शिकवणींचा प्रसार करतात.
आज आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात, भगवान बुद्धांचा स्वातंत्र्य, शांतता, समता आणि सहिष्णुतेचा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. बुद्ध पूर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून, मानवतेला मानवमुक्तिचा योग्य मार्ग दाखवणारा एक प्रेरणादायी दिवस आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

