Site icon Desh Varta

पाडव्याच्या आधीच सोन्याचे दर उंचावले! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा Gold भाव

पाडव्याच्या आधीच सोन्याचे (Gold) दर वधारले! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर Gold Price Today आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे का, फक्त येथे क्लिक करा.

सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर; भाव वाढीचे कारणे आणि परिणाम कोणते ?

  1. सोन्याचा आजपर्यंतचा विक्रमी उच्चांक

आपल्याला माहीतच आहे कि गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव ऑल-टाइम हायवर पोहोचले आहेत, सामान्य नागरिकाना अशी आशा होती कि सोन्याचे दर आज नाही तर उद्या कमी होतील परंतू या आशेची आता निराशा होताना दिसत आहे, त्या सर्वांचा भ्रमनिरास होत चालला आहे. सोन्याचे दर आजपर्यंतच्या सर्वाधीक उच्चांकावर येऊन पोहचले आहेत. गेल्या काही दिवसानमध्ये सोन्याचे दर प्रति ग्राम 9000 पेक्षा जास्त झालेले आहेत. त्यामुळे आता सोन्याचे भाव कमी होतील हा केवळ एक भ्रम आहे असे तज्ञांचे मत आहे.

तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,440 रुपये इतका झाला आहे हा उच्चांक आजपर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे लवकरच सोने एक लाखाचा आकडा पार करेल असे मानले जात आहे.

जस-जसे सोन्याचे दर वाढत आहेत तस-तसे चांदीनेही उच्चांक गाठला असून प्रति किलोमागे चांदी 1,05,000 रुपयांपर्यंत भाव पोहोचलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देशात जास्त प्रमानात लग्नाचे प्रमान असते त्यामुळे त्यांच्याकरिता सोने चांदीची खरेदी म्हणजे एक प्रकारे मोठी परिक्षाच झालेली आहे.

  1. सोने – चांदीचे Gold Price भाववाढीची कारणे ?

अमेरिकेमध्ये नुकतेच डोनाल्ड ट्रम्प सरकार स्थापन झालेले आहे व त्याठीकानी चलनवाढ आणि वाढलेली महागाई नियंत्रित करण्यासाठी तेथील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सातत्याने वाढ केली होती त्याचाच परिनाम म्हणून भारतामध्ये आणि इतरत्र सोने-चांदी महाग होताना दिसत आहे त्यासोबतच अमेरिकेतील या निर्णयामुळे मात्र, व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे व सोन्यातील जागतीक स्तराच्या गुंतवनुकीमुळे त्याचे भाव हे वाढने सहाजीकच आहे व त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय.

आपल्याला माहीतच आहे कि मागिल काही वर्षापासुन रशिया व यक्रेन युद्ध, तसेच इस्राईल आणि हमास यांचा संघर्ष आणि चीन-तैवान तणावामुळे जागतिक स्थरावर अस्थिरता वाढली आहे व याचा वाहतुकिवर, निर्यात आयातीवर तसेच तेलाच्या भावावर सुध्दा याचा परिणाम होतो. या सर्वांवर उपाययोजना म्हणून व सुरक्षित गुंतवणुकीसाठी मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं आहे.

2022 पासून देशपातळीवरील मध्यवर्ती बँका दरवर्षी 1000 टनांपेक्षा अधिक सोनं खरेदी करत आहेत. या अनुसार भारताने 2024 मध्ये 726 टन सोनं खरेदी केलं, तर चीनने 44 टन सोनं विकत घेतले आहे.

  1. सोन्याच्या किंमतींवर होणारा परिणाम ?

सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याच्या किमती गेल्यानंतर मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी सोनं खरेदी करणे कठीण झाले आहे. भारतातील बहुतांश कुटूम्ब हे मध्यमवर्गीय आहे त्यांचे उत्पन्न हे त्यांच्या शेतीवर अवलंबुन असते तसेच शिजनेबल प्रमाणात मध्यमवर्गियांकडे पैसा येतो त्यामुळे नेमके त्याच वेळेस सोने व चांदीच्या भावात वाढ होत असते. त्यामुळे याचा विपर्यास सुध्दा होताना अपल्याला यावेळेस दिसुन येतो आहे तो असा कि सोन्याच्या उच्च भावांमुळे सोनं खरेदी करण्याऐवजी सामान्यांकडू सोने विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. व यामुळे सोन्याच्या दरात आणखी कमालीची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  1. सोन्याचे आर्थिक आणि ऐतिहासिक महत्त्व !

भारतीय समाजामध्ये सोन्याला अनन्य साधारन महत्व आहे स्री चा दागीना व घरातील लक्ष्मी म्हणून तसेच कठिन प्रसंगाचा सोबती म्हनुन त्याकडे पाहले जाते. त्यामुळे सोनं हे केवळ दागिन्यांसाठीच नव्हे, तर गुंतवणुकीसाठीही सर्वोत्तम पर्याय आपल्या समाजात मानलं जातं. ज्याप्रमाने परिवारामध्ये काही आर्थिक संकट आले तर आपण सोने गहान ठेवतो अथवा मोडतो त्याचप्रमाने देशपातळीवर आर्थिक संकटात देश सोनं तारण ठेवून कर्ज घेतात, जसे भारताने 1991 मध्ये केलं होतं. व जागतिक पातळीवरील व देशपातळीवरील मध्यवर्ती बँका सोनं विकत घेतल्यानंतर ते आपापल्या देशांमध्ये नेण्यास प्राधान्य देत आहेत.

  1. सोन्याच्या भाववाढीवरील भविष्यातील तज्ञांचा अंदाज?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा दर हा लवकरच नवा विक्रम करित नवा उच्चांक गाठनार आहे तो म्हणजेच लवकरच ते 1,00,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. जागतिक स्तरावर जर अश्याच प्रकारे आर्थिक किंवा भूराजकीय अस्थिरता कायम रंगत राहिली, तर सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात.

महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचा भाव कसा तपासावा?

क्र. क्र. जिल्हा 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम) 1कि. चांदीचा भाव
1 मुंबई ₹90,105 ₹1,05,100
2 पुणे ₹90,494 ₹1,05,092
3 नागपूर ₹90,305 ₹1,05,090
4 नाशिक ₹90,105 ₹1,05,092
5 औरंगाबाद ₹90,092 ₹1,05,092
6 सोलापूर ₹90,110 ₹1,05,094
7 कोल्हापूर ₹90,112 ₹1,05,096
8 ठाणे ₹90,104 ₹1,05,091
9 नवी मुंबई ₹90,105 ₹1,05,092
10 अमरावती ₹90,104 ₹1,05,092
11 अकोला ₹90,105 ₹1,05,093
12 जलगाव ₹90,105 ₹1,05,092

 

निष्कर्ष

सोन्याच्या किंमतींच्या वाढीचा हा उच्चांक गरिब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठी आर्थिक अडचण ठरू शकते. याउलट सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मात्र ही एक चांगली संधी ठरू शकते. आगामी काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावा.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version