Site icon Desh Varta

Weather Alert १२ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट – शेतकरी आणि नागरिकांनी घ्यावी खबरदारी

मागिल काही दिवसांमध्ये राज्याचे तापमान 43-44 पार गेले असताना आता मात्र राज्यातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार,  राज्यासाठी पुढील 3(तीन) दिवसात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी राज्यात किमान १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पुढील काही दिवसामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचे लक्षणीय परिणाम दिसून येणार आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील विशेषतः हिंगोली, लातूर, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि धराशिव या जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

🌡️ उष्णतेचा त्रास कमी होणार नाही!

राज्यात सध्याच्या घडीला ढगाळ वातावरण तयार झालं असलं तरीसुध्दा उष्णतेचा त्रास काहीसा कायम आहे. सूर्यप्रकाश जरी तीव्र नसला, तरिसुध्दा हवामानात उकाडा आणि दमटपणा प्रचंड वाढला आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात राज्यातील काही भागात थंडीचा गारवा जाणवत नाही, याउलट राज्यातील नागरिकांना असह्य उष्णतेचा सामना करावा लागत आहे.

⚠️ राज्यातील हवामान बदलामागची Weather Alert कारण काय?

राजस्थानच्या पश्चिम भागापासून ते राज्यातील विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या कारणामुळे राज्यात पावसाला पूरक असे वातावरण तयार झाले आहे. आणि यामुळे वाढत असलेल्या उष्णतेमुळे त्याच्या बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आला असून त्यामुळे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

🏙️ Weather Alert हवामान बदलावार मानवनिर्मित कारणांचा परिणाम!

राज्यातील मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये तसेच मोठ्या शहरांमध्ये कॉंक्रिटीकरणाच्या कामामध्ये होत असलेली वाढ, तसेच पुनर्विकास प्रकल्प आणि बांधकामांमुळे जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर घटली आहे कमी झालेली आहे. यामुळे नैसर्गिक गारवा कमी होत आहे, आणि भूभागावरील म्हणजेच जमिनीवरील पाणी लवकर बाष्पीत होत आहे, ज्याचा सरळ परिणाम हवामान बदलावर होत आहे.

📢 प्रशासनामार्फत नागरिकांना आवाहन:

पंजाबराव डक यांचे अवकाळी पावसासंबंधी महत्वाचे भाकीत !

राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची साखळी सुरू होणार आहे. मात्र, हा पाऊस एका भागात सातत्याने न पडता दररोज वेगवेगळ्या ठिकाणी फिरत फिरत पडणार आहे. म्हणजेच, दर एक/दोन दिवसांनी हा पाऊस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पडनार आहे.

📍 राज्यात कोणत्या भागांपासून पावसाची सुरुवात होईल ?

नुकत्याच हवामान बदलामुळे राज्यात अवकाळी पावसाची सुरुवात हि आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकच्या सीमालगत असलेल्या भागांपासून होणार आहे. ज्यामध्ये राज्यातील मराठवाडा भागातील व पश्चिम महाराष्ट्रातील उदगीर, लातूर, सोलापूर, जत, सांगली आणि कोल्हापूर या पट्ट्यात थोडं खराब वातावरण राहण्याची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे कर्नाटकातील पावसाचा अप्रत्यक्ष परिणाम पहावयास मिळनार असून, त्या भागांत काही प्रमाणात पावसाचे वातावरण निर्माण होईल.

📅 15 व 16 एप्रिल – पावसाकरिता महत्त्वाचे दिवस!

15, 16 आणि 17 एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा राज्यात हवामानात मोठा बदल होणार असल्याचे दिसत आहे. या काळात राज्यातील वातावरण पुन्हा ढगाळ आणि खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामात आणि नियोजनात विशेष काळजी घ्यावी.

🌡️ Weather Alert राज्यात उष्णतेचा इशारा – तापमान 42-43 अंशांपर्यंत जाणार!

राज्यात जरी पावसाच्या सरी काही भागांत बरसनार असल्याचा अंदाज लावल्या जात आहे तरी मात्र राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा जबरदस्त असणार आहे. ज्यामध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version