Site icon Desh Varta

वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, करणार्या वनबंधू चैत्राम पवार यांना प्रतिष्ठित Padma Shri जाहीर. चैत्राम पवार नेमके कोण ?

चैत्राम पवार यांचा संघर्ष देशाने मानला – पद्म पुरस्काराने सन्मान!

वनसंवर्धनासोबत पर्यावरण या सामाजिक कार्यामध्ये मोलाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत चैत्राम पवार यांना भारत सरकारने पद्म पुरसकाराने सन्मानित केलंय. मागील 30 वर्षांपासून वनसंवर्धन आणि पर्यावरण क्षेत्रात अश्या सामाजिक कार्यामध्ये चैत्राम पवार यानी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि पर्यावरणाचा ह्रास थाम्बविण्यासाठी त्यांनी त्यांचे संघटित प्रयत्न हे अविरतपणे सुरू ठेवले आहेत. केंद्र सरकारने वनबंधू चैत्राम पवार यांना पद्म पुरस्कार जाहीर केलाय.

चैत्राम पवार यांचा परिचय ?

धुळे जिल्ह्यातील बारेपारा या छोट्याशा गावातून वनसंवर्धनासोबत आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये सामाजिक कार्याची अनेक वर्षांपासून त्यानी या क्षेत्रात आपले संपूर्ण कार्य म्हणजेच वेळ घालवीला आहे. अशा चैतराम पवार यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यानी त्यांची पहिली प्रतिक्रिया देताना असे म्हटले की, हा पुरस्कार माझा नाही तर हा पुरस्कार मी असं म्हणेल की गावकरी वनवासी कल्याण आश्रम आणि खानदेशातल्या विविध व्यक्ती संस्था ज्या पर्यावरणामध्ये काम करतात ह्या सगळ्यांचा सन्मान आहे.
हे कार्य एका व्यक्तीकडून होने कठीण होते म्हनुन त्यानी असे म्हटले कि, मी वेगवेगळ्या संस्था संघटना जोडाव्या या उद्देशाने सुरुवात केली. त्यासोबतच वनवासी कल्याणश्रमाचा सपोर्ट आधीपासून होता. त्यामुळे हे सगळे कार्य जिथं जे विचार रुजत गेलेत ते कल्याणश्रमाच्या अनेक कार्यकर्त्यांनी येऊन म्हटले की अरे इथलं जंगल आहे. आपण सांभाळू शकतो इथं आपण वृक्षतोडीचा नियम करू शकतो अशा सगळ्या जे तांत्रिक मार्गदर्शन आहे ते कल्याणश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पोहोचवले. आणि त्याच्यामुळे तिथली समिती सक्षम झाली आणि नुसतं बारीपाडा नव्हे तर आपण या माध्यमातुन पुढे जाऊन आपण 15-20 नव्हे तर 30 गावांमध्ये काम करू शकतो असे लक्षात आले. नंतर असे लक्षात आले की वेगवेगळ्या राज्यांमध्ये करू शकतो. आणि पुढे या कामामुळे वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून व्याप्ती ही वाढत गेली.

कुनाचे सहकार्य लाभले ?

आपण सुरु केलेले कार्य आपण हे संपूर्ण मोहीम हाती घेतली, त्यामध्ये कोणाकोणाचं सहकार्य या संपूर्ण मोहिमेमध्ये आपल्यासोबत कोन होतं तर हजारो कार्यकर्त्यांनी ह्या प्रकल्पाला उचलून धरलेलं आहे. सगळ्यांना जर हात काढला ते खाली पडेल! हे लक्षात आलं आमच्या आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलं की संस्था आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला संघटन बांधून हे काम कसं पुढे नेता येईल. हे सर्व कार्य आम्ही कल्याण आश्रमाला पक्क टार्गेट केलं त्यामुले या कार्यामध्ये कल्याणश्रमाचे खुप मोठे योगदान मानावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.

आदिवासी हक्कांसाठी लढणारे वनबंधू चैत्राम पवार यांना पद्म पुरस्कार!

भारत सरकारने वनसंवर्धनासोबत आदिवासी हक्कांसाठी लढा देणारे, ज्येष्ठ कार्यकर्ते ज्याना वनबंधू नावाने ओळखले जाते असे चैत्राम पवार यांना देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. हा क्षण आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या कार्य व योगदानाची ही मोठी दखल मानली जात आहे.

आदिवासी हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा!

चैत्राम पवार हे गेल्या ३० वर्षांपासून वनसंवर्धनासोबत आदिवासी समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी संघर्ष करत आहेत. त्यांनी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीकरितासुध्दा मोठे प्रयत्न केले आणि अनेक आदिवासी कुटुंबांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या कार्यामुळे जंगलांमध्ये राहणाऱ्या आदिवासीं जमातीनी त्यांचा हक्काचा जमिनीचा तुकडा मिळाला आहे.

सामाजिक न्यायासाठी झुंजार नेतृत्व

चैत्राम पवार यांनी शिक्षणासोबत, आरोग्य तसेच रोजगाराच्या क्षेत्रात आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांचे योगदान केवळ खांदेश भागातील आदिवासी समाजापुरते मर्यादित नसून, सामाजिक न्यायाच्या व्यापक दृष्टिकोनातून आपण त्याकडे पहावयास हवे.

पद्म पुरस्कार म्हणजे देशाचा सन्मान

भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन चैत्राम पवार याना Padma Shri पुरस्कार जाहीर करून त्यांच्या संघर्षाची आणि त्यानी केलेल्या समाजासाठीच्या योगदानाची योग्य दखल घेतली आहे. हा पुरस्कार संपूर्ण आदिवासी समाजाच्या सन्मानाचे प्रतीक आहे बमल्याचे भासत आहे.

शेवटी एकच म्हनावे लागेल – संघर्ष अजूनही सुरूच!

वनबंधू चैत्राम पवार यांनी हा पुरस्कार जरी स्वीकारला असला, तरी त्यांच्या मते आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीचा लढा अद्याप संपलेला नाही. तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Exit mobile version