3 January Balika Diwas Speech: सावित्रीबाई फुले – मुलींच्या शिक्षणाची ज्योत
3 January Balika Diwas निमित्त Savitribai Phule (सावित्रीबाई फुले) जयंती विशेष लेख. देशातील मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे कार्य, विचार व प्रेरणादायी योगदान जाणून घ्या.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेची संघर्षगाथा Savitribai Phule Jayanti 2025
Savitribai Phule Jayanti भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची ओळख.
Savitribai Phule Jayanti 2025: Inspirational Speech & Life Journey
आदरणीय अध्यक्ष महोदय/महोदया,
प्रमुख पाहुणे,
सन्माननीय शिक्षकवृंद
आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण
आज आपण सर्वजन येथे एकत्र आलो आहोत त्याचे कारण आज ३ जानेवारी म्हणजेच – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त. आज केवळ एक जयंती नसून, ती भारतातील स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याची आठवण करूण देणारा दिवस आहे.
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) ह्या आपल्या भारत देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत मिळून १८४८ साली पुण्यात पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथे सुरू केली. त्या काळातील चालीरीती अनुसार मुलींना शिक्षण देणे हे पाप मानले जात होते, म्हणून समाजाकडून त्यांना अपमान, शिवीगाळ व विरोध सहन करावा लागला. पण तरीही सावित्रीबाईंचा निर्धार ढळला नाही त्यानी खंबीरपणे आपला सामाजिक व् शैक्षणिक लढा सुरु ठेवला.
त्या नेहमी म्हणत,
“शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे.” तसेच ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही तयास मानव म्हणावे काय? हा प्रश्न त्यानी उपस्तित केला.

Savitribai Phule यांचे सामाजीक कार्य
सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणाचाच नव्हे, तर समाजामध्ये आमूलाग्र बदल घडावन्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी विधवा पुनर्विवाह, बालविवाह बंदी, अस्पृश्यता निवारण यांसारख्या अनिष्ट प्रथा व् सामाजिक सुधारणांसाठीही मोलाचे कार्य केले. त्यांनी त्या कठिन समाई अनाथ बालकांसाठी आश्रयगृह सुरू केले, 20 व्या शतकाच्या सुरुवातीला देशात प्लेगची साथ पसरली असता प्लेगच्या काळात रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राणही पणाला लावले.
Savitribai Phule यांचे सामाजिक क्षेत्रातील मोलाचे योगदान
आजच्या २१ शतकाच्या काळात आपण शिक्षण सहज घेतो, पण त्या शिक्षणामागे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचा संघर्ष, त्याग आणि क्रांती दडलेली आहे, हे आपण कधीही विसरू नये.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी असा संकल्प करूया की –
- शिक्षणाचा योग्य उपयोग करू व् सामाजिक उन्नतिकारिता त्याचा वापर करू
- स्त्री-पुरुष समानतेचा आदर करू तसेच तो वाढवन्याकारिता कार्य करू
- समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सदैव कार्य करू
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची प्रमुख ग्रंथसंपदा
1 काव्यफुले (1854)
Savitribai Phule यांचा हा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानी यामध्ये शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा विरोध आणि सामाजिक विषमता यावर आधारित कविता लिहाल्या आहेत. त्यांचा हा काव्यसंग्रह हा ग्रंथ मराठी साहित्यात सामाजिक प्रबोधनाचा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
2 बावनकशी सुबोध रत्नाकर (1892)
या संग्रहमध्ये विशेषतः नीतिकथा व बोधकथा यांचा संग्रह आपल्याला दिसून येतो. ज्यामध्ये समाजातील अस्पृश्यता त्यामध्ये असनारा अन्याय, स्त्रियांची परीस्थिती, तसेच नैतिक मूल्ये यावर भाष्य केलेले आहे. आणि वेशेष म्हणजे सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत या संग्रहाचे लेखन करण्यात आले आहे.
3 सावित्रीबाई फुले यांची पत्रे (पत्रसंग्रह)
सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना लिहिलेली पत्रे याचा संग्रह सुध्दा जोपासुन ठेवन्यात आलेला आहे. ज्यामध्ये त्या काळातील सामाजिक परिस्थिती, स्त्री शिक्षणातील अडचणी व त्यांचा संघर्ष स्पष्टपणे दिसतो. याच्या माध्यमातून हा संग्रह त्यांच्या विचारांची प्रगल्भता दाखवतो.
सावित्रीबाई फुले यांच्या लेखनाचे ग्रंथसम्पदेचे विशेष महत्त्व
सावित्रीबाई फुले या त्यांच्या केलेल्या कार्यामुले पहिल्या आधुनिक मराठी स्त्री लेखिका मानल्या जातात.
त्यांच्या ग्रंथांमधून शिक्षण, समता, स्त्रीस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांचा ठाम पुरस्कार दिसून येतो.
शेवटी एवढेच म्हणेन की,
सावित्रीबाई फुले या केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत, तर त्या एक विचार आहेत – जो आजही आपल्याला मार्गदर्शन करतो.
धन्यवाद
जय सावित्रीबाई फुले!
जय शिक्षण!
जय समाजसुधारणा!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
