Akola Crime: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात धक्कादायक प्रकार एकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या
अकोट तालुक्यातील धक्कादायक घटना: Akola Crime; एका युवकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली. परिसरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Akola Crime: डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या
Akola Crime: अकोला जिल्ह्यातील क्राईम प्रकरणे वाढतच आहेत त्यामध्ये आनखी एका प्रकरणाची भर पडली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये पोपटखेड मार्गावार येत असनार्या एका बंद पडलेल्या कारखाण्यामध्ये एक व्यावसायिक रमण चांडक याची निर्घुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आलेला आहे.
अकोला क्राईम : जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातील पोपटखेड मार्गाअंतर्गत येत असनार्या एका कारखान्यात एका व्यावसायिक ज्याचे नाव रमण चांडक असल्याचे समजले आहे या व्यक्तीची निर्घुन हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार मंग़ळवार दि. 8 एप्रिल रोजी समोर आलेला आहे. या प्रकरणी पोलिसानी एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले असुन त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे त्यांच्यामार्फत सांगन्यात आलेले आहे.
जिल्यातील अकोट तालुक्यापासुन काही अंतरावर असनार्या पोपटखेड मार्गावर एक बंद पडलेला कारखाना आहे. मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी या इमारतीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आलेला होता त्या मृतदेहाची ओळख पटवीली असताअ तो एका व्यापाराचा असल्याचे उघड झाले असुन त्याचे नाव रमण चांडक असे असल्याचे समजले आहे.
Akola Crime; रमण चांडक कोण आहेत ?
रमण चांडक यांचे मुळ गाव हे जिल्ह्यातील अकोट तामुक्यातील पणज हे आहे व ते मागील काही वर्षापासुन जिल्ह्यातील गीता नगरमध्ये आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहेत तसेच त्यांचा वाहन व मालमत्तेचा व्यवसाय असल्याचे सांगितले जात आहे. व गेल्या काही दिवसांपासुन त्यांचा काही व्यक्तींशी आर्थिक व्यवहारावरुन वाद सुरु असल्याचे समजले आहे. त्यावरुन ही हत्या झाली आहे का ? असा संशय व्यक्त केला जात आहे.
हत्त्येसंबधी पोलिस चौकशी सुरु ?
हि हत्या नेमकी कुठल्या वादातुन झाली आहे व काय कारणे आहेत याची चौकशी पोलिसांमार्फत करण्यात येत आहे सोबतच यासंदर्भात पोलिसानी आरोपिला पकडन्याकरिता काही पथके रवाना केलेली आहेत. रमण चांडक यांच्या डोक्यात दगड घालुन त्यांची निर्घुन हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज हा व्यक्त केला असला तरी या हत्या प्रकरनाची माहीती पोलिसाना मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकानचा पंचनामा करित मृतदेह पुढील तपासनीकरिता रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला.
Akola Crime: पोलिसांची कार्यवाही !
पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असुन त्यासंदर्भात कसुन चौकशी करावयास सुरुवात केलेली आहे व या व्यावसायिकेल्या हत्त्येमागे नेमके कोण आहेत व हत्त्येमागील कारण काय ? याचा तपास पोलिसान्मार्फत करण्यात येत आहे. संबंधीत तपास हा अकोट ग्रामिण पोलिसांच्या माध्यामातुन होत आहे.

अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; आरोपी फरार
अकोला | वरिल हत्येचे प्रकरण ताजे असतानाच व राज्यपातळीवर तथा देशपातळीवर सरकारकडून महिला सुरक्षेसाठी अनेक कठोर उपाययोजना करण्यात येत असताना देखील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाही आहेत. अश्यातच अकोल्यामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली असून, केवळ 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे.
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात दुर्दैवी घटना !
ही धक्कादायक प्रकार अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात उघडकिस आलेला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत स्टेशन परिसरात उभी होती. त्याच दरम्यान, एका मोटरसायकलवर 25 वर्षीय युवक त्या ठिकाणी आला आणि त्याने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले.
त्यानंतर आरोपीने तिला अकोट रोडवरील गोडाऊनजवळील परिसरात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरात आणून सोडले. या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडित मुलीने थेट रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिली असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी आरोपी फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले असून, आरोपी लवकरच गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील व अकोला जिल्ह्यातील ही घटना अत्यंत निंदनीय असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त असूनही अशा घटना घडतात, हे चिंतेचे कारण ठरत आहे. शासनाने कठोर पावलं उचलूनही अशा घटनांमध्ये काहीसा तरी आळा बसताना दिसत नाही. त्यामुळे महिलांनी सुरक्षित कसं राहावं, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
