Akola हादरलं! किरकोळ वादामुळे एकाची हत्या, आरोपी फरार घटना सीसीटीव्हीत कैद
Akola हादरलं! किरकोळ वादातून एका 22 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही संपुर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी सध्या फरार आहेत. पोलिस तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ताज्या अपडेट्ससाठी वाचा संपूर्ण बातमी!
-
Akola किरकोळ वादातून युवकाचा खून,
अकोल्यातील जेतवन नगरमध्ये एका किरकोळ वादातून एका 22 वर्षीय युवकावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये करण दशरथ शितळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असनारे त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. या संपुर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
तरुनावर हल्ला कसा घडला हल्ला?
दि. 23 मार्च रविवारचा दिवस असल्याने करण घरीच होता. त्यामुळे त्याच्या कामाचा पगार घेण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. मात्र, काही वेळातच काही हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात अडवले व त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रुपांतर चाकू हल्ल्यात झालं. करणवर एकामागोमाग एक असे अनेक वार करण्यात आले. त्याच्या सोबत असनारे त्याचे दोन मित्रही या हल्ल्यात गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.
करणने हल्ला सुरू असतानाच त्याने आपल्या आईला फोन केला आणि मदतीची याचना केली. लगेच त्याची आई घटनास्थळी धावत आली, मात्र तोपर्यंत करण रक्ताच्या थारोळ्यात लोळत पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
-
करणच्या आईची आर्त हाक !
करणचा त्याच्या आईला शेवटचा कॉल?
“करणचा पगारीचा दिवस होता, म्हणून तो पगार घेऊन येतो म्हणत घराबाहेर गेला होता. थोड्या वेळातच त्याने फोन केला आणि म्हणाला, ‘आई, मला मारतायत!’ मी धावत घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत तो रक्ताच्या थारोळ्यात होता.”
करणच्या आईने सांगितलं की करणच्या सोबत असलेले दोन मित्रही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या शासकिय रुग्नालयात उपचार सुरू आहेत.

-
करणवर झालेल्या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट नाही !
अकोल्यामध्ये दिवसा घडलेल्या या घटनेमागचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. हल्लेखोर फरार असून खदान पोलीस यासंदर्भात त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसाना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
-
सीसीटीव्ही फुटेजमधील धक्कादायक दृश्य समोर !
हि सम्पुर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे ज्यात फुटेजमध्ये काही युवक हातात धारदार शस्त्र घेऊन करणवर हल्ला करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजमधून पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, त्याद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
गँगवॉरचा संशय Akola परिसरात चर्चा?
23 मार्च ला घडलेल्या या घटनेनंतर शहरात गँगवॉर सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी देखील शहरात अशा प्रकारचे हल्ले घडले होते. शहरातील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
पोलीस तपास आणि पुढील कारवाई ?
या हत्याप्रकरणात खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असुन आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करित आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
मात्र सध्या करणच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ?
अकोला शहरात दिवसाढवळ्या अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुध्दा केलं आहे.
शेवटची सूचना
या प्रकरणातील पुढील तपासानंतर आणखी काही धक्कादायक तथ्य समोर येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी ‘देशवार्ता’ वर नजर ठेवा.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

One Comment