महाराष्ट्रात हिमाचली सफरचंद? Akola च्या शेतकऱ्याची अनोखी शेती!

हिमाचली सफरचंद? Akola च्या शेतकऱ्याची अनोखी शेती!

“महाराष्ट्र राज्यातील Akola जिल्ह्यालगत असनार्या अकोट तालुक्यात शेतकरी नवनीत चांडक यांनी अकोल्यातील गरम हवामानात सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी हिमाचल आणि काश्मीरसारखी चवदार सफरचंद उगवली आहेत. जाणून घ्या या नव्या शेती प्रयोगाबद्दल सविस्तर!”

Akola जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग !

महाराष्ट्रातील Akola जिल्हा, जो प्रामुख्याने सम्पुर्ण राज्यामध्ये उष्ण हवामानासाठी ओळखला जातो, तिथे एका शेतकऱ्याने थंड हवामानात उगवणाऱ्या सफरचंद (सफरचंद) लागवडीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. जिल्ह्यातील नवनीत चांडक या शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या सफरचंदासारखीच उच्च दर्जाची फळे आपल्या शेतात पिकवली आहेत.

सफरचंद लागवडीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

जिल्ह्यातील नवनीत चांडक यांनी आपल्या 0.5 एकर शेतात सुमारे 700 सफरचंदाची झाडे लावली आहेत. ही झाडे त्यांनी हिमाचलमधून आयात केलेली आहेत. व हि झाडे विशेष वाणाची असून ती 45 अंश सेल्सियस तापमानामध्ये सुध्दा चांगली फळे देऊ शकतात. साधारनत: असे म्हटल्या गेले आहे कि, पारंपरिक दृष्टिकोनानुसार सफरचंद ही फळे थंड हवामानात चांगली वाढतात, परंतु नवनीत चांडक यांनी अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापनाच्या मदतीने हा समज खोटा ठरवला आहे.

लागवडीची वेळ आणि उत्पादन क्षमता किती आहे ?

नवनीत चांडक यांच्याकडून ही झाडे 21 डिसेंबर 2022 रोजी लावण्यात आली होती आणि डिसेंबर 2024 मध्ये या झाडांनी आपला दुसरा वाढदिवस साजरा केला. आता तिसऱ्या वर्षानंतर झाडांची उत्पादन क्षमता अधिक वाढण्याची शक्यता असून, एका झाडापासून सरासरी 50-60 किलो सफरचंद उत्पादन होईल, असा अंदाज आहे. दुसऱ्या वर्षातदेखील एका झाडाला सरासरी 10-11 किलो सफरचंद मिळत आहे.

सफरचंद मार्केटिंग आणि विक्री नियोजन कसे करण्यात आले ?

नवनीत चांडक यांनी ‘फार्मर टू कस्टमर’ या संकल्पनेनुसार थेट ग्राहकांना सफरचंद विकण्याचा विचार केला आहे. त्याचबरोबर, अकोला जिल्ह्यातील आणि अकोट तालुक्यातील व्यापारी याही उत्पादनाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. यामुळे बाजारपेठेची समस्या येणार नाही. भविष्यात उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यावरही महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील बाजारपेठेत सहज विक्री होऊ शकते.

महाराष्ट्रातील सफरचंद आणि हिमाचल-कश्मीरच्या सफरचंदामधील फरक ?

नवनीत चांडक यांच्या या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्रातही उत्तम प्रकारची सफरचंद उत्पादित होऊ शकतात. नवनीत चांडक यांच्या मते, त्यांच्या शेतातील सफरचंदाचा स्वाद हा हिमाचल आणि जम्मू-कश्मीरमधील सफरचंदाच्या तुलनेत अधिक चवदार आणि गोडसर लागतो.

शेतीतील नवा प्रयोग आणि भविष्यातील संधी

हा प्रयोग सम्पुर्ण महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. राज्यातील गरम हवामानात सफरचंदाची यशस्वी लागवड करून स्थानिक बाजारपेठेत आणि देशभर विक्री करण्याच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतरही शेतकरी या शेती पद्धतीचा अवलंब करू शकतात.

निष्कर्ष

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सफरचंदाची शेती करून नवनीत चांडक यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि शास्त्रोक्त शेती पद्धतींचा अवलंब करून, पारंपरिक समजुतींना छेद देत त्यांनी गरम हवामानातही सफरचंद उत्पादन शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांसाठी नवीन दिशा ठरू शकतो.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *