Amravati धार्मिक नगरीत पवित्रतेला काळिमा – रिद्धपूर आश्रमातील संतापजनक प्रकार
Amravati रिद्धपूर धार्मिक नगरीत पवित्रतेला काळिमा फासनारी घटना समोर आली आहे, एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची हि घटना ज्यामुळे सम्पुर्ण परिसरामध्ये असंतोषाचे वातावरन निर्माण झालेले आहे वाचा सविस्तर …
Amravati रिद्धपूर आश्रमातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: संपूर्ण घटनाक्रम
-
Amravati रिद्धपूर धक्कादायक प्रकरन उघड!
अमरावती जिल्ह्यातील एका महानुभाव संप्रदायाच्या रिद्धपूरमधील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनोनमहिने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे, पीडित मुलगी आता आठ महिन्यांची गर्भवती आहे.
-
Amravati रिद्धपूरच्या पीडितेने केला गंभीर आरोप !
आश्रमातील पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2024 मध्ये 75 वर्षीय महंत सुरेंद्र मुनी तळेगावकर यांनी तिला जबरदस्तीने आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला असल्याचे पीडितेचे म्हनने आहे. त्यानंतर आश्रमातील 40 वर्षीय बाळासाहेब देसाई यांनीही वेगवेगळ्या वेळेस तिचे शोषण केले. विशेष बाब म्हणजे तीने जेव्हा हे प्रकरन आपल्या आप्त स्वकियाना सांगितले तेव्हा पीडितेच्या मावशी व मामांनीही तिला गप्प बसण्यासाठी दबाव टाकल्याचा सुध्दा आरोप पीडितेने केलेला आहे.
-
Amravati रिद्धपूर प्रकरणाचा खुलासा ?
काही महिन्यांनंतर पीडितेची तब्येत बिघडल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेव्हा तपासणीअंती ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेने धाडसाने पोलिसांत तक्रार दाखल केली तेव्हा हे सर्व प्रकरण उघडकिस आले.
-
पोलिस कारवाई ?
जेव्हा हे प्रकरण पीडितेने पोलिसाना सांगितले तेव्हा शिरखेड पोलिस ठाण्याने यावर तातडीने कारवाई करत आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या IPC कलम 376, 376(ड), 376(2)(एन), 323, 506 तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्या अंतर्गत आरोपी महंत, त्यांचे सहकारी, पीडितेची मावशी आणि मामा अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.
-
Amravati रिद्धपूर प्रकरनावर न्यायालयीन प्रक्रिया सुरु ?
या सर्व आरोपीना अटक करुन 20 फेब्रुवारी रोजी आरोपींना वरुड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने हि सर्व बाब लक्षात घेऊन आरोपीना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
समाजासाठी धोक्याची घंटा !
असल्या प्रकारची ही घटना एका धार्मिक स्थळी घडल्याने मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी भक्ती आणि सेवेची भावना असावी, तिथे असे कृत्य घडत असेल, तर समाजाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे व आपल्या मुलाबाळाना सावधान करण्याची गरज आहे असे स्वर समाज माध्यमातुन व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेने नेमका विश्वाक ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न उपस्तित केला जात आहे ?
Amravati रिद्धपूर ची ही घटना केवळ एक गुन्हा नसून संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. जो समाजामध्ये राहत असताना वावरत असताना आपल्या सजग राहन्याचा इशारा देत आहे !
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
