बाबा आढाव यांच उपोषण मागे.. पण थेट सरकारला ईशारा ..!
बाबा आढाव यांचे उपोषन का ?
महाराष्ट्रात नुकतेच काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले परंतु विरोधी पक्षांकडून ज्यांना कमी जागा मिळाल्या आणि सामाजिक संस्थांकडून इव्हिएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या गेलेले आहेत. ईव्हीएम मुळे आम्ही जिंकलो नाही असा वारंवार वाक्य प्रयोग विरोधी पक्षांकडून होताना दिसत आहे. त्यामध्येच सामाजिक संस्थेमध्ये अग्रणी, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी काही दिवसांपूर्वी उपोषणाला सुरुवात केली होती. अनेक राजकारणातील दिग्गज त्यांच्या भेटीला गेले शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी त्यांना विनवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी बाबा आढाव यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे जाहीर केले तसेच त्यांनी सरकारला एक कडक इशार सुद्धा दिलेला आहे.
राज्यामध्ये राजकिय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेला पैशाचा गैरवापर होत असलेला पाहुन त्यांचा ईव्हीएम वरून संशय असेल यावरून राज्यांमध्ये राजकारण तापलेलं होतं. त्यातच बाबा आढाव यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. तर अनेक ठिकाणी ईव्हीएम घोटाळे झाल्याचे चित्र विरोधकानी वेठीस धरुन ठेवल्याने आम्हि एव्हिएम मुळे हरलो असल्याचा दावा त्यानी केला होता. त्यामुळे बाबा आढाव यानी जिंकल्याचा दावा विरोधांकडून बाबा आढावांकडून करण्यात आला आहे अशातच बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले यांच्या वाड्यात जो वाडा महात्मा फुलेचे राहते घर आहे तेथे ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केले आहे, निवडनुकि पश्च्यात प्रश्न उपस्थित झाला होता की हे आंदोलन नेमके कशासाठी आणि कशामुळे आहे. महाराष्ट्र मध्ये नुकतीच पार पडलेले विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये राज्यातील नागरिकांकडून शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या त्यावर काहीतरी निराकरण करण्यात यावं ह्या सरकारच्या जबाबदाऱ्याच्या हेतूने सरकारची भूमिका काय असायला हवी यासाठी बाबा आढावांनी उपोषणाला सुरुवात केली होती.
सामान्य लोकांकडून होत असलेला EVM विरोध हा लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते आढाव त्यांनी महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये तीन दिवसांपुर्वी उपोषनाला सुरुवात केली होती, सरकारने तातडीने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवावे असा अग्रह त्यानी धरला.

बाबा आढाव यानी केलेले आरोप
इव्हिएम घोटाळा झाला असल्याचा आरोप बाबा आढाव यानी केलेला आहे.
ऐन निवडनुकिच्या तोंडावर पैसे वाटनारी योजना आनुन सविधानाचा अपमान केल्याचा अरोप.
विधानसभा निवडनुकित लोकशाहिच वस्रहरन झाल्याचा अरोप.
विधानसभा निवडनुकित सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली.
इव्हिएम आणि पैशामुळे राज्यात वेगळा निकाल.
राज्यघटना आणि लोकशाही सोबत होत असलेला एक प्रकार या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या अवघ्या 95 व्या वर्षी पदार्पण केलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी फुले यांच्या वाड्यामध्ये हे उपोषण सुरू केले होते राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळत असतानाच अनेक नेते त्यांच्या भेटीला गेले. त्यांचे विनवणी करण्यात आली आणि त्यांनी आज उपोषण मागे घेतलेले आहे. व सरकारला कडक इशारा सुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की तीन दिवस आत्मक्लेष आंदोलन केले असले तरी त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अडाणींवर कारवाई झाली पाहिजे, अनेक नेत्याना अडाणींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिले जात नाही, या सरकारच्या विरोधात मी सत्याग्रह करणार असल्यासही त्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी सांगितलेले आहे.
बाबा आढावांची मागनी
संविधानाने व लोकशाहीचे होत असलेले विटम्बन आणि ईव्हीएम वर देखील संशय व्यक्त केला जात असलेले पाहून सरकार शांत आहे, हे पाहत असूनच बाबा आढाव यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता त्यावर आता त्यांनी पूर्णविराम लावलेला आहे. सत्तेत विरोधी पक्षांकडून ईव्हीएम विरुद्ध पुकारण्यात आलेल्या मुद्द्यवर बोलत असताना सत्तधारी पक्षानी असे म्हटले आहे कि, हे पक्ष हरले आहेत म्हनुन केवळ ईव्हीएम वर संशय व्यक्त करित आहेत मात्र जिंकले अस्ल्यास गप्प राहतात. ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा नाही आहे असं वारंवार सांगितले जात आहे. मात्र बाबा आढाव यांनी असं म्हटलेलं आहे कि चोर कधीच मी चोरी केली आहे असे म्हनत नाही त्यामुले सरकारने केवळ लोकांच्या प्रंश्नाचे निराकरन करावे असे त्यानी म्हटले आहे. एव्हिएम मध्ये घोळ होऊ शकत नाही हे सिद्ध करुन दाखवायला हवे. त्यांनी असं म्हटलं की एक्सपर्ट नेऊन दाखवावे, आणि लोकांचा आवाज दाबला जात असलेले प्रकरन त्वरित थाबवावे, काही घोड काही आक्षेप ते सिद्ध करून दाखवत तांत्रिक म्हणून एक्सपर्ट आनावे व सिध्द करावे म्हणजे लोकांचा त्यावर विश्वास राहिल. तसेच जे पैशाचा गैरवापर तुम्ही निवडनुकिच्या काळात केला आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे वाटण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांकडून वारंवार झालेला आहे, हे रोखण्यासाठी माझं उपोषण आहे असं बाबा आढाव यांनी म्हटलेलं आहे
|
YouTube |
Subscribe Now |
|
फेसबुक ग्रुप |
|
| व्हाट्सएप ग्रुप |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

One Comment