महिला शिक्षणाचे उगमस्थळ भिडेवाडा(Bhidewada) संकटात, शासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह ?

जिथे पेटली मुलींच्या शिक्षणाची ज्योत, तो भिडेवाडा (Bhidewada) आजही दुर्लक्षित

फुले दाम्पत्यानी सुरु केलेल्या पुण्यातील (Bhidewada) भिडेवाडा : देशातील पहिल्या मुलींच्या (First Girls School in India) शाळेची दुर्दैवी अवस्था झाली असताना व् त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून, या शालेच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी तीव्र

महात्मा फुले व् सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची आज दयनीय अवस्था

देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया ज्या ऐतिहासिक वास्तूने घातल्या गेला, त्या पुण्यातील भिडेवाडा येथील देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची आज अत्यंत बिकट व् दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी येथे देशातील पहिली मुलींची शाळा भिड़ेवाडा येथे सुरू केली. मात्र, देशाच्या इतक्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कार्याची साक्ष देणाऱ्या या स्थळाला आजवर राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळालेला नाही, वा त्याचे पुनर्जीवन झालेले नाही  ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.

पुण्यातील (Bhidewada) भिडेवाडा हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

भिडेवाडा हे केवळ एक इमारत नसून, ते देशातील सामाजिक क्रांतीचे केंद्र होते व् आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता येथे मुलींना शिक्षण देण्याचे कार्य केले. मुलीना शिक्षण देत असता त्यांच्यावर शेण, दगड फेकले गेले, तरीही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही. आज मात्र, त्या त्यागाची आणि लढ्याची आठवण करून देणारे हे स्थळ दुर्लक्षामुळे जीर्ण अवस्थेत पोहोचले आहे ह्याची शोकांतिका आहे.

पुण्यातील (Bhidewada) भिडेवाडा ह्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी?

राज्यामध्ये अनेक इतिहास अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून सातत्याने भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात द्यावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे शासन स्तरावर ठोस पावले उचलली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकदा निवेदन, आंदोलने आणि मागण्या करूनही केवळ आश्वासनांपलीकडे काहीच घडत नसल्याचा आरोप केला जात आहे.

महिला शिक्षणाचा उगमस्थळ आज संकटात

देशात महिला शिक्षणावर जोर देत असता मोठमोठ्या योजना राबवल्या जात असताना, ज्या ठिकाणी मुलींच्या शिक्षणाची पहिली ज्योत पेटली, तेच ठिकाण आज अस्तित्वाच्या लढ्यात आहे ही फार मोठी शोकांतिका आहे. ह्या इमारतीची पडझड, ह्याकडे अपुरी देखभाल आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून ह्यावर शासनाने लक्ष देने खुप महत्वाचे आहे.

पुण्यातील (Bhidewada) भिडेवाडा ला तात्काळ संरक्षणाची गरज

अनेक अभ्यासक तसेच तज्ज्ञांचे मत आहे की, भिडेवाड्याचे संरक्षण, जतन आणि संवर्धन तातडीने व्हावयास हवे. आणि या ठिकाणी एक सुसज्ज स्मारक, संग्रहालय आणि अभ्यास केंद्र उभारल्यास देशभरातून या ठिकाणी अनेक विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटक येथे येऊ शकतील. यामुळे पुढील पिढ्यांना सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल.

सरकारने (Bhidewada) भिडेवाडा पुर्नार्जिवित करण्याकरीता पुढाकार घ्यावा

स्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवनार्या भिडेवाडा हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे ऐतिहासिक वैभव आहे. त्यामुळे या वास्तुकडे केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे पुढाकार घेऊन या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

शोकांतिका

जर आजही आपण वेळेत पावले उचलली नाहीत, तर उद्या देशाच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय केवळ पुस्तकांपुरताच उरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *