Chhaava चित्रपटाचा Box Office वर जलवा ! 100 कोटी करणार पार !

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘Chhaavaचित्रपटाचा Box Officeवर धुमाकूळ

लक्षम उतेकर यानी तयार केलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘Chhaava’  चित्रपटाने एक वेगळाच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे! विकी कौशलच्या जोरदार अभिनयासह, लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या मराठमोळया परंतु हिंदी ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई करत ‘छावा’ने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडत नवा विक्रम रचताना आपल्याला दिसत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातील थिएटर्स हाऊसफुल्ल असून, हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे असे सांगितले जात आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गौरवगाथा सांगणाऱ्या या दमदार चित्रपटाबद्दल तुमचे मत काय?  ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा!

  1. Chhaava ची दमदार ओपनिंग आणि विक्रमी कमाई

‘छावा’ चा पहिला दिवस: महाराष्ट्रासह सम्पुर्ण भारतात या चित्रपटाने ₹37 कोटी ग्रॉस (₹31 कोटी नेट) आणि भारताबाहेर म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ₹10 कोटी, एकूण ₹47 कोटी कमाई केलेली आहे.

दुसरा दिवस: ‘छावा’ ने दुसर्या दिवसाला तब्बल ₹15 कोटींची कमाई, म्हणजेच दीड दिवसांत ₹55+ कोटी पार करनार असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे.

‘छावा’ चे पहिले तीन दिवस: हा चित्रपट पहिल्या तीन दिवसान्मधेच 100 कोटी पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  1. विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग !

अभिनेता विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ने Box Office वर (₹8.62 कोटी) ची कमाई केली होती आणि ‘उरी’या चित्रपटाने (₹8.20 कोटी) ची कमाई केलेली होती आता दोन्ही चित्रपटाना मागे टाकत ‘छावा’ची पहिल्या दिवशी ₹33 कोटी नेट कमाई केलेली आहे म्हणुन विकी कौशल करिता हा ऐतिहासिक चित्रपट वरदान ठरत आहे.

Chhaava 2025 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट.

  1. Box Office वर इतर चित्रपटांना मागे टाकले

Box Office वर नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट ‘सनम तेरी कसम’, ‘लव आप्पा’, ‘बॅड एस रवीकुमार’, ‘स्काय फोर्स’ यांसारखे चित्रपट ‘छावा’ चित्रपटाच्या तुलनेत काहीच टिकू शकलेले नाहीत. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे अनेक चित्रपट थिएटर्समधून हे चित्रपट काढले गेले असल्याचे समजत आहे, तर ‘छावा’ला सर्वाधिक स्क्रीन्स मिळत असल्यासचे समजत आहे.

  1. Chhaava चित्रपटाचा थिएटरमध्ये गर्दीचा उच्चांक

Chhaava शोजचा प्रतिसाद:

पहिल्या दिवसाला सकाळच्या शोला 30%, च्या दरम्यान तर दुपारच्या शोला 34%, संध्याकाळच्या शोला 40%, आणि रात्रीच्या शोला तब्बल 62% गर्दी मिळाल्याचे समजले जात आहे. Chhaava चित्रपटाचे महाराष्ट्रात 24×7 शो दाखवले जात असून, अजुनपर्यन्त म्हणजे आज तीसर्या दिवसाला देखील थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत.

  1. पॅन इंडिया स्क्रीन्स आणि प्रमुख शहरांतील प्रदर्शन

महाराष्ट्र सह, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार सोबतच पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर स्क्रीन्स मिळाल्या आहेत. प्रामुख्याने सांगायचे झाल्यास मुंबई (1339 शोज), दिल्ली (1335 शोज), पुणे (688 शोज), अहमदाबाद (705 शोज), कोलकाता (326 शोज) चित्रपट प्रदर्शित करित आहेत.

  1. Chhaava ची दुसर्या आठवड्यातील मोठी कमाई होण्याची शक्यता !

Chhaava चित्रपटाचा बजेट हा ₹130 कोटी असून, पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट मोठ्या कमाईचा उच्चांक गाठत आहे. Chhaava प्रदर्शित होऊन आता वीकेंड आणि पुढील सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट आणखी उच्चांक गाठत मजबूत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

निष्कर्ष:

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असनारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावतोय. Chhaava या चित्रटाने पहिल्या दिवसापासूनच विक्रमी कमाई करत ‘Chhaava’ने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व प्रस्थापित प्रस्थापीत करायला सुरुवात केलेली आहे. येणार्या पुढील काही आठवड्यांत हा चित्रपट यापेक्षाही अजून मोठे यश मिळवेल, असे चित्रपट विश्लेषकांचे मत आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

तुम्ही ‘छावा’ पाहिला का? तुम्हाला तो कसा वाटला? कमेंट करून सांगा!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *