संविधान दिवसानिमित्त : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महानता सांगणारे अतुलनिय भाषण

Constitution Day अतुलनिय भाषण

सगळ्यांना सुप्रभात…. आदरणीय शिक्षक व माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो….

आपण आज का जमलेलो आहे हे सांगण्याची मला आवश्यकता नाही कारण आजचा हा ऐतिहासिक दिवस आपण संविधान दिवस किंवा Constitution Day म्हणून साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो यामागे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करण्याचा हा एक अद्वितीय असा क्षण असतो. म्हणून हा आपण दिवस कायदा दिन, किंवा संविधान दिवस किंवा महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नाहीत तर ते एक थोर महापुरुष, विचारवंत, समाज सुधारक, देशभक्त, अर्थतज्ञ, विधितज्ञ, बहुजन समाजाचे उद्धार करते आणि या देशातील सर्वोच्च उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित असं व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांना संपूर्ण जग ज्ञानाचा उगवता सूर्य या नावाने संबोधतो आणि त्यांना बुद्धी सम्राट असं म्हटल्या गेलेला आहे. त्याने संविधान निर्माण करताना सामाजिक समता, बंधुता, न्याय यावर आधारित समाजाचे रचना केलेले आहे. जे संविधानाच्या मूळ उद्देशपत्रिके मध्ये आपल्याला ठासून दिसते ज्यामुळे आपला देश आज सर्व धर्म जात वंशलिंग याच्यात समानता टिकून ठेवत आहे. त्याचे सर्व श्रेय या महामानवाला जाते.

Constitution Day संविधान दिवसानिमित्त बाबासाहेबांचे महत्त्व

मित्रहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केवळ या देशाचे संविधान दिलं नाही तर आपल्याला जगण्यासाठी मूलभूत अधिकार, हक्क आणि न्याय हे देखील आपल्याला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज ही आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतात त्यांनी म्हटलं होतं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे जो पिनार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही..! शिक्षण हे एक प्रकारे मुक्तीचे शस्त्र आणि साधन आहे. असे त्यांनी वंचित शोषित, उपेक्षित या लोकांसाठी या भारतामध्ये महत्त्वाचा लढा दिला म्हणून त्यांना मुक्तिदाता या नावाने संबोधण्यात येते. संविधान निर्माण करण्याच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतले. त्यांनी दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवस झिजून, रात्र दिवस मेहनत करुन अपल्या तबियत कडे लक्ष न देउन या भारताचे संविधान निर्माण केलं त्यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करून जे भारताला योग्य आणि उच्च शिखरावर नेऊ शकेल असे एकमेव संविधान जगातील सर्वात मोठे त्यांनी निर्माण केलेले आहे त्यांचा दृष्टिकोन हा केवळ आपल्या भारताएवढाच मर्यादित नव्हता तर सर्वत्रिक मानवता ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी या देशांमध्ये नव्हे तर जगामध्ये सर्वप्रथम मानवतेचे, बंधुत्वाचे व न्यायाचे प्रेम व करुणेचे, समतेचे विचार पेरले होते त्याच भगवान बुद्धांना आणि महापुरुषांना आदर्श मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची म्हणजेच कायद्याचे निर्मिती केलेले आहे हे आपल्याला संविधानाच्या प्रत्येक कलमांमध्ये दिसून येत.

मित्रहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात नवचेतना देतात बाबासाहेबांनी लिहिलेले लोकशाहीचे मूल्य आपल्याला या देशात रुजवायची आहेत ते नेहमी म्हणायची जी लोकशाही राजकीय स्वरूपात टिकते पण सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात फळ ठरते ती खरी लोकशाही नसते त्यामुळे आजही आपण समान संदेश शिक्षण आणि समता यासाठी संघर्ष करत राहणे हे आजच्या तरुणाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे म्हणून तरुणांना त्यांनी एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आदर्श दिलेला आहे असा आपल्याला दिसतं.

Constitution Day संविधानाचा मुख्य संदेश ?

आपल्या संविधानाचा महत्त्वाचा आणि मुख्य संदेश असा आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे जोपासना करायला आपल्या सुविधा भाग पाडतो.

भारताचे संविधान किती लोकांनी लिहिले ?

मित्रहो हा आज सर्वांनाच पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न असतो पण भारताच्या संविधान सभेमध्ये अनेक सदस्य असताना सुद्धा या संविधान सभेचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडलेले आहे ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी यामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले संविधान बनवण्याचे धोरण आपल्या खांद्यावर पेलले म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे मूळ शिल्पकार असे म्हटल्या गेलेला आहे.

संविधान म्हणजे काय ?

मित्रहो कुठल्याही देशाला चालविन्यासाठी एका सक्षम कायद्याची आवश्यकता असते, संविधान म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रहो एखादे राज्य देश चालवण्यासाठी काही विशिष्ट नियम असावे लागतात या विशिष्ट क्रमानुसार केलेल्या नियमांचे मांडणी आणि त्या मांडणीचे केलेले अनुसरण म्हणजेच एक प्रकारे संविधान होय असं थोडक्यात मात्र तरी चालेल.

आपले भारतीय संविधान किती पानांचे आहे ?

संविधान 4500 शब्दांपेक्षा कमी सुमारे 10 लांब लचक पानांचे आहे.

Constitution Day महिला मुक्ती दिन का म्हटल्या गेल्या ?

मित्रहो भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान देण्यात आलेले होते त्यांना नेच वागणूक देण्यात आलेले होते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये श्री पुरुष समानता यावर जोर दिलेला असून कायद्यापुढे सर्व समान आहेत हे ब्रीद वाक्य त्यांनी त्यामध्ये नमूद केलेले आहे भारतीय महिलांना त्यांनी मतदानाचा शिक्षणाचा सामाजिक न्यायाचा समतेचा अधिकार दिलेला आहे म्हणून से महिला हजारो वर्षापासून कितपत पडलेले होते त्या महिलेला समतेचा अधिकार दिल्यामुळे संविधान दिवस कायदा दिवस अर्थात महिला मुक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो हा दिवस 26 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या या अर्थक परिश्रमाला आपण सदैव आठवत राहो त्यांच्या ऋणात राहो आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचे आपण रक्षण तथा पालन करू हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो तथा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा संविधान दिनाच्या महिला मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो.

बाबासाहेबांचे महत्त्व: आपल्याला या निमित्ताने समजुन घेने महत्वाचे आहे.

धन्यवाद.
जय भिम, जय भारत!

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

 

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *