Dr. Babasaheb Ambedkar जयंती निमित्त सुंदर, सोपे परंतू खनखनित भाषण कसे द्यावे!
Dr. Babasaheb Ambedkar जयंती निमित्त खनखनित भाषण कसे द्यावे!
पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नही होता…, 2
बेरंग रहती ये जमीन और आसमा का रंग नीला नही होता,
भारत तो कब का कंगाल हो जाता यारों…2
अगर इसे भीम जैसा हिरा मिला नही होता….2
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण pdf
सम्पुर्ण जगाला शांतीचा व क्रांतीचा संदेश देनारे महामानव तथागत भगवान गौतम सम्यक संबुध्द, तुमच्या आणि माझ्या जीवनातील गुलामगीरी नष्ट करुन अम्हाला अम्हाला अंधाराच्या अज्ञानातुन बाहेर काढून प्रज्ञेचा प्रकाश दाखविनारे तुमच्या आणि मझ्या जीवनाचे प्रमुख शिल्पकार प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर याना सर्वप्रथम विनम्र अभीवादन,,,, सर्वाना माझा क्रांतिकारी जय भिम…येथे उपस्थित सन्माननीय प्रमुख अतिथी, आदरणीय गुरुजन, आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज आपण याठीकानी कशासाठी एकत्र आलो आहोत ते आपल्याला माहीतच आहे आपण एका महान युगप्रवर्तकाच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी म्हणजेच बोधिसत्व, परमपुज्य, महामानव The Symbol of Knowledge– डॉ. बाबासाहेब आंबेडकर! यांच्या जन्मदिनाचा हा दिवस म्हणजेच १४ एप्रिलचा हा दिवस भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते कायदेपंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन म्हणून केवळ भारतामध्येच नाही तर सम्पुर्ण जगामध्ये साजरा केला जातो.

🔷 बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचे योगदान !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या सैनिकांच्या छावनीमध्ये एक शिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजी अम्बेडकर सैन्यामध्ये नोकरीला होते, परंतू तरिसुध्दा बाबासाहेब अर्थात भीमरावाला जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता यांचा त्यांना लहानपणापासूनच सामना करावा लागला. परंतु कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि शिक्षणाच्या बळावर त्यांनी संपूर्ण जगामध्ये त्यांनी आपले नाव बुलंद केले. म्हणून जग त्याना ज्ञानसुर्य म्हणून ओळखत.
आणि म्हणून मला याठीकानी म्हणावस वाटत…. भीमाने आपल्याला शक्तीवान बनवलं,
जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं,
नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं,
आणि एका हवेच्या झुळुकेला वादळ बनवलं,
इंग्रज अधिकारी बेवरेल निकोल्सन नावाचा अधिकारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असे म्हटले होते की डॉ आम्बेडकरांच्या तोंडून बाहेर पडनारे शब्द म्हणजे पिस्तुलामधुन बाहेर पडनारे बार आहेत…
ह्याच महामानवाने सबंध भारताचे संविधान लिहीले म्हणून त्याना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखतात. त्यांनी लोकशाही आणि समानतेच्या तत्वांवर आधारित संविधानाची निर्मिती केली, जे आज आपल्या देशाच्या प्रगतीचा एक मजबूत आधार आहे. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा म्हणून आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर संघर्ष केला व नंतर कायदे मंत्री असताना व संविधान सभेत असताना अनेक कायदे आणि सुधारणांची अंमलबजावणी केली.
🔷 आंबेडकर जयंतीचे महत्त्व The World Biggest Jayanti Festival
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले की “शिका, संघर्ष करा! आणि संघटित व्हा !” कारण त्यांनी ओळखले होते कि शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे एकमेव खरे शस्त्र आहे. बहुजन समाजाला त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व शैक्षणिक समानतेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर त्यांचे महान समाजहिताचे व परिवर्तनाचे विचार प्रत्यक्षात आणण्याचा एक सुवर्ण सोहळा आहे.

🔷 बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार Dr. Ambedkar Thoughts
✅ *”मी पहिल्यांदा आणि शेवटपर्यंत भारतीय आहे.”
✅ “जो समाज शिक्षण घेत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही.”
✅ “स्वातंत्र्य हे कधीही भीक म्हणून मिळत नसते, तर ते संघर्षानेच मिळवावे लागते.”
मी कुठल्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरुन ठरवीतो
शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे जो पीणार तो गुरगुरल्या शिवाय राहनार नाही !
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोन्ही जानार नाही
आकाशातील ग्रह आणि तारे जर माझे भाग्य ठरवीत असतील तर माझ्या मेंदू आणि मनगटाचा उपयोग काय !
स्वातंत्र्याकरिता शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यन्त लढले पाहीजे !
जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडऊ शकत नाही…
🔷 निष्कर्ष
आज आपल्या सर्वाना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनुसार एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे. शिक्षण, समानता, आणि बंधुता व न्याय यांचे पालन करून आपण त्यांचे स्वप्न साकार करू शकतो. आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवू आणि देशाला पुढे नेऊ.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
🙏”जय भीम! जय भारत!” 🚩
