डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त प्रभावी, जोशपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण Bhim Jayanti
सम्पूर्ण जगामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती Bhim Jayanti मोठ्या उत्साहात साजरी होत आहे; स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण आणि न्यायाचा संदेश देणारे प्रेरणादायी भाषण आणि विविध कार्यक्रमांची माहिती वाचा.
Bhim Jayanti निमित्त समतेचा आणि परिवर्तनाचा जागतिक उत्सव पहा जोरदार मराठी भाषण
आजच्या या आनंदी सोहाळ्याच्या दिनी माननीय उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद, आणि माझ्या प्रिय बंधूंनो-भगिनींनो,
आज आपण सर्वजण या ठिकाणी एका महान व्यक्तिमत्त्वाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत — आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे जनक, एक थोर समाजसुधारक आणि मानवतेचे खरे पुजारी, Dr. B. R. Ambedkar यांची आज जयंती!

The world’s Biggest Jayanti Festival
मित्रहो ही जयंती केवळ आपल्या देशापुरती म्हणजेच भारतापुरती मर्यादित नाही, तर जगातील सर्वात मोठा जयंती उत्सव म्हणून ओळखली जाते म्हणूनच या जयन्तिला The world’s Biggest Jayanti Festival असे म्हटले जाते ही विशेष बाब कारण डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य हे केवळ एका देशासाठी मर्यादेत न रहता ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे.
बंधूंनो आणि भगिनींनो,
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म एका अत्यंत साध्या कुटुंबात मध्य प्रदेशातील महू येथे रामजी व् भीमाबाई यांच्या पोटी झाला. पण डॉ. बाबासाहेब अम्बेडकर यांच्या विचारांची उंची आकाशालाही भिडणारी होती. त्यांनी शिक्षणाला शस्त्र बनवले आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा ” हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांनी आपल्या देशाला एक मजबूत आणि समतावादी संविधान दिले. त्यांनी त्यांच्या सम्पूर्ण आयुष्यात समाजातील भेदभाव, जातिवाद आणि अन्याय याविरुद्ध लढा दिला. त्यांनी महिलांना, बहिष्कृत समाजाला आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
Bhim Jayanti निमित्त आम्ही काय संकल्प करायला हवा?
आज आपण भीम जयंतीच्या निमित्ताने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे — की, आपण डॉ. बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनात कितपत उतरवतो आहोत? आजही आपल्या समाजात अनेक ठिकाणी भेदभाव, अज्ञानता आणि अन्याय दिसून येतो. अशा वेळी बाबासाहेबांचे विचार आपल्याला दिशा दाखविन्याचे काम करीत राहतील. जर आपण सर्वाना डॉ. बाबासाहेब अम्बेडकर याना खरोखर अभिवादन करायचे असेल, तर केवळ त्यांच्या प्रतिमेला हार-फुले अर्पण करून नव्हे, तर त्यांच्या विचारांनुसार वागून करायला हवे हेच त्याना खरे अभिवादन असेल.
मित्रहो, आज “जगातील सर्वात मोठी जयंती” आपण उत्सव म्हणून तर साजरी केलीच पाहिजे तसेच, आज त्यांच्या परिवर्तन वादी विचारानची शपथ म्हणून साजरी करूया. आपण प्रत्येकाने शिक्षण घेऊया, समानतेचा मार्ग स्वीकारूया आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.
चला तर मग, आपण सर्वजण मिळून एक समतेचा, न्यायाचा आणि प्रगतीचा भारत घडवूया — हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल!
धन्यवाद!
जय भीम! जय भारत!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
