Namanatar Movement 17 वर्षांचा संघर्ष असंख्य बलिदान आणि इतिहास घडवणारे नामांतर आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कसे झाले? Namanatar आंदोलनाचा इतिहास

जानून घ्या Namanatar Movement 17 वर्षांचा संघर्ष, असंख्य बलिदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचा सविस्तर इतिहास व सत्यकथा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचा सविस्तर इतिहास

महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासात मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हे एक क्रांतिकारी पर्व ठरले आहे. राज्यामध्ये झालेले हे आंदोलन केवळ एका विद्यापीठाच्या नावासाठी नव्हते, तर ते दलित बौद्ध समाजाच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक समतेचे प्रतीकात्मक युद्ध होते असे म्हटले जाते. १९७६ ते १९९४ या काळात तब्बल १७ वर्षांच्या संघर्षात चाललेल्या या आंदोलनाने देशासह महाराष्ट्र हादरून सोडला.

राज्यातील औरंगाबाद स्थित तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, ही या आंदोलनाची मुख्य प्रमुख आणि न्याय्य मागणी होती. शिक्षण हेच येथील मागासवर्गीय समाजाच्या परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हे डॉ बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. उच्च शिक्षणाशिवाय समाजपरिवर्तन शक्य नाही, ही त्यांची सुरुवातिपासुनची ठाम भूमिका होती.

डॉ बाबासाहेबांचे स्वप्न व् मराठवाड्यात विद्यापीठ इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मागासलेला भाग असलेल्या मराठवाडयात १९५० साली औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून या भागातील दलित, शोषित आणि वंचित समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणीवेळी बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते, या ठिकाणी केवळ महाविद्यालय नव्हे तर एक विद्यापीठ उभे राहिले पाहिजे.” त्यांच्याच दृष्टीकोनातूनच १९५८ साली त्यांच्या पश्चात मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.

या विद्यापीठाला नाव देण्या करीता शासन नियुक्त समितीने अनेक नावे सुचवली होती. ज्यामध्ये तत्कालीन परिस्थिति लक्षात घेउन प्रामुख्याने भौगोलिक आणि ऐतिहासिक स्थळांची नावे होती. आणि व्यक्तींच्या नावांमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच नावे होती. मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने कोल्हापूर येथे विद्यापीठ स्थापन झाले होते आता मात्र बाबासाहेबांच्या नावाने कोणतेही विद्यापीठ नव्हते त्यामुळ ह्या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब अंबेडकर यांचे नाव द्यावे ह्याकारिता संघर्ष सुरु झाला.

विद्यापीठ Namanatar राचा विधानमंडळाचा ठराव आणि पेटलेला संघर्ष

२७ जुलै १९७८ रोजी राज्यातील विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. हा क्षण आंबेडकरी समाजासाठी आनंदाचा होता, परंतु काही प्रतिगामी आणि जातीयवादी शक्तींनी याला तीव्र विरोध केला. आणि या विरोधाचे रूपांतर लवकरच रौद्र रूप धारण करून दलितांवरील अमानुष अत्याचारात झाले. व् याचे रूपांतर गावोगावी दलित वस्त्यांवर हल्ले झाले, जाळपोळ, सामाजिक बहिष्कार, सार्वजनिक पाणवठ्यावर बंदी, स्त्रियांवरील अत्याचार अशा भयावह घटना ह्या राज्यात घडायला सुरुवात झाली. परन्तु पोलिसांकडूनही आंबेडकर जनतेवरच लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा आणि गोळीबार झाला.

मराठवाडा विद्यापीठ Namanatar  बलिदानांची अमर गाथा

या नामांतर आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्यामध्ये गौतम वाघमारे ह्या तरुणाने नांदेडमध्ये स्वतःला पेटवून घेतले. तर परभणी जिल्ह्यात पोचिराम कांबळे या आन्दोलकाची निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर अशा असंख्य अम्बेडकरी क्रांतिकारकांनी या लढ्यात बलिदान दिले.

मराठवाडा विद्यापीठ Namanatar  करीता लॉंगमार्च आणि निर्णायक टप्पा

मराठवाडा नामांतर आंदोलनाचा निर्णायक टप्पा ठरला तो म्हणजे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील नागपूर ते औरंगाबाद लॉंगमार्च. ज्यामध्ये “जिंकू किंवा मरू” या घोषणेसह निघालेल्या या मोर्चावर सरकार व् जातीयवादी लोकांकडून अमानुष दडपशाही करण्यात आली. तरीही हे आंदोलन थांबले नाही.

मराठवाडा विद्यापीठ Namanatar  १७ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय

अखेर सरकारला अम्बेडकरी जनते पुढे माघार घ्यावी लागली आणि १४ जानेवारी १९९४ रोजी ‘मराठवाडा विद्यापीठ’चे नाव बदलून त्याला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद’ असे नामविस्तार करण्यात आले. हे मात्र पूर्ण नामांतर नव्हते, ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे, पण तरी सुद्धा हा विजय संघर्षातून मिळालेला होता.

१४ जानेवारी नामांतर दिनाचे आजचे महत्त्व

आज हे डॉ बाबासाहेब अम्बेडकर ह्यांच्या नावे असणारे विद्यापीठ नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील शेतकरी, दलित, कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ म्हणजे आशेचा किरण आहे.

विद्यापीठ नामांतर आंदोलन ही केवळ एका नावाची लढाई नव्हती, तर ती सामाजिक समतेची, स्वाभिमानाची आणि बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत साक्ष आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *