Karuna Global Foundation व जीवन विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम मोफत नेत्र तपासणी शिबिर सम्पन्न !
Karuna Global Foundation व जीवन विकास संस्थेच्या विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर सम्पन्न !
समाजामध्ये वावरत असताना समाजातील गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेऊन याच उद्देशाने करुणा Karuna Global Foundation , जीवन विकास बहुउद्देशीय संस्था आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सरलादेवी विद्यालय, वाघदरा, हिंगणा, नागपूर येथे यशस्वी पार पडले.
शिबिराचे उद्दिष्ट आणि सामाजिक महत्त्व
नेत्रासंबंधी असनारा आरोग्याचा प्रश्न हा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक गंभीर विषय आहे. अनेक लोकाना नेत्र तपासणीसाठी आर्थिक मर्यादांमुळे योग्य उपचार मिळत नाहीत. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या पार्श्वभूमीवर आयोजित या शिबिराचा उद्देश नागरिकांना मोफत नेत्र तपासणी सेवा देणे आणि गरजूंना आवश्यक ते उपचार उपलब्ध करून देणे हा होता.
या शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने डोळ्यांची सखोल तपासणी केली. त्यासोबतच, ज्याना चष्म्याची गरज आहे त्या गरजु असलेल्या रुग्णांना मोफत चष्मे देण्याची व्यवस्था करण्यात आली. व ज्या रुग्णांना विशेष उपचारांची गरज होती असल्या रुग्नाना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

नेत्र तपासनी शिबिराचे उद्घाटन आणि प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी करुणा ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई बोरकर यांनी शिबिरामध्ये उपस्थित सर्व डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांचे स्वागत केले. तसेच त्यांनी “नेत्र हे शरीराचे अत्यंत महत्त्वाचे व नाजूक अंग असून त्यांचे आरोग्य जपणे अत्यावश्यक आहे” असे मोलाचे मार्गदर्शनपर आपले विचार मांडले.
तसेच, शालिनीताई मेघे हॉस्पिटलचे ओएसडी चैतन्य मेघे सर, हॉस्पिटल मधिल नेत्रतज्ज्ञ डॉक्टर्स व त्यांची टीम, तसेच शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, करुणा ग्लोबल फाउंडेशनच्या सचिव सौ. आभा वाघमारे, ऋषिकेश डोळे, सीमा धारगावे, तसेच जीवन विकास संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
शिबिरादरम्यान परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
शिबिरामध्ये परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या शिबिराचे औचित्त्य साधुन अनेक जणांनी मोफत नेत्र तपासणी करून घेतली आणि डॉक्टरांच्या आवश्यक त्या सल्लामसलती घेतल्या. यादरम्यान विशेषतः वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. अनेक विद्यार्थ्याना तर डोळ्यांची नियमित तपासणी आणि योग्य चष्मा परिधान करणे गरजेचे आहे याची जाणीव या शिबिरामुळे झाली, असे मत कार्यक्रमादरम्यान येथील शिक्षकांनी व्यक्त केले.
शिबिराचे यशस्वी आयोजन आणि संचालन
या विशेष कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रिद्धी खोटेले यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार प्रदर्शन समन्वयक देवानंद डोंगरे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी करुणा ग्लोबल फाउंडेशन, जीवन विकास संस्था आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.
शिबिराचा समारोप आणि पुढील उपक्रम
शिबिराच्या शेवटी, भविष्यातही अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना लाभ देण्याचा संकल्प याठिकानी करण्यात आला.
संपूर्ण समाजाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. करुणा ग्लोबल फाउंडेशन आणि जीवन विकास संस्थेच्या या स्तुत्य कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळाले. भविष्यातही समाजसेवेच्या दिशेने असेच उपक्रम राबवले जातील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

2 Comments