फाल्गुन पूर्णिमा विशेष बुद्धाच्या जीवनात त्रिगुणी महिमा Buddha Dhamma
फाल्गुन पूर्णिमा बुद्धाच्या जीवनात काय महत्त्व आहे ?Buddha Dhamma
Buddha Dhamma त फाल्गुन पूर्णिमेला विशेष महत्त्व आहे हा बौद्ध धम्मातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. याच पोर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर प्रथमच कपिलवस्तु येथे आगमन केले. याच पोर्णिमेला राहुल आणि नंद यांची संघात दीक्षा झाली, ज्यामुळे या दिवसाला त्रिगुणी महत्त्व प्राप्त झाले. बुद्धानी दिलेला त्याग, व् निर्माण केलेली समता आणि धम्मस्वीकाराचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेविषयी सविस्तर माहिती वाचा.
फाल्गुन पूर्णिमेला कपिलवस्तूत भगवान बुद्धांचे ऐतिहासिक आगमन Buddha Dhamma
फाल्गुन पूर्णिमा : भगवान गौतम बुद्धांच्या कपिलवस्तू आगमनाची आणि राहुल-नंद यांच्या दीक्षेची ऐतिहासिक घटना
नमो बुद्धाय!
साधारणता मार्च महिन्याला येणारी फाल्गुन पूर्णिमा हा बौद्ध धम्माच्या इतिहासातील अत्यंत पवित्र तसेच प्रेरणादायी दिवस मानला जातो. कारण याच पोर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सात वर्षानी प्रथमच आपल्या जन्मभूमी असलेल्या कपिलवस्तु नगरीत आगमन केले. त्यांच्या या आगमनाने संपूर्ण नगरात आनंद, उत्साह आणि भक्तिभावाची लाट उसळली होती असे म्हटल्या जाते.
Buddha Dhamma फाल्गुन पूर्णिमेला कपिलवस्तूमध्ये बुद्धाचे भव्य स्वागत
२९ व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्या व् ज्ञान प्राप्ति नंतर तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या भिक्खू संघासह कपिलवस्तूत आले तेव्हा त्यांचे वडिल राजा शुद्धोधन यांनी संपूर्ण नगरी सजवून त्यांच्या स्वागताची भव्य तयारी केली होती. नगरातील सर्व नागरिकबुद्धाच्या दर्शनासाठी उत्सुक होते. बुद्धांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि शांत मुद्रेने सर्वांचे मन जिंकले.
तसेच त्यांची मावशी असणार्या राजवाड्यात महाराणी महाप्रजापती गौतमी यांना आपल्या पुत्राचे दर्शन घेऊन अपार आनंद झाला. तथापि, त्यांची पूर्व जिवनातील पत्नी असणारी यशोधरा मात्र अंतर्मुख होत्या. त्या स्वतः बुद्धांकडे न जाता आपल्या पुत्र राहुलाला त्यांच्या भेटीस पाठवतात.

Buddha Dhamma फाल्गुन पूर्णिमेला राहुलाची पित्याशी भेट
फाल्गुन पोर्णिमेला जेव्हा बुद्ध ज्ञान प्राप्ती नंतर कपिलवस्तु ला जातात तेव्हा राजकुमार राहुल, वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी, राजवस्त्र परिधान करून भगवान बुद्धांच्या भेटीस गेले. व् त्यांनी बुद्धांकडे जाऊन पित्याजवळ जाऊन आपला वारसा मागितला. तेव्हा बुद्धांनी अत्यंत शांतपणे सांगितले की, “माझ्याकडे धन, संपत्ती किंवा राज्य नाही; पण माझ्याकडे धम्माचा अमूल्य ठेवा आहे.” असे सांगितले व् राहुलने ते मान्य केले या प्रसंगानंतर राहुलाला भिक्खू संघात प्रवेश देण्यात आला. बुद्धाच्या सोबत असणारे भिक्षु सारिपुत्त यांनी राहुलाचे मुंडन करून त्याला प्रव्रज्या दिली. अशाप्रकारे फाल्गुन पोर्णिमेला राहुल हा पहिला बालसंन्यासी ठरला.
बुद्धाचा भाऊ असणार्या नंदाची दीक्षा केव्हा झाली ?
फाल्गुन पूर्णिमेच्या दिवशी प्रजापती गौतमी व् शुद्धोधन राजाचे पुत्र असणारे म्हणजेच बुद्धांचे सावत्र भाऊ अर्थात नंद यांनाही संघात दीक्षा देण्यात आली. त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिक भेटीचा नव्हे, तर धम्मपरिवर्तनाचा आणि त्यागाचा महान दिवस ठरला.
Buddha Dhamma फाल्गुन पूर्णिमेला यशोधरेचा त्याग आणि धम्मस्वीकार
इतिहासामध्ये यशोधरेने मोठ्या धैर्याने आणि समजुतीने आपल्या प्रिय असणार्या पुत्राला धम्ममार्गावर पाठवले. त्यांचा हा त्याग आणि धम्मनिष्ठा बौद्ध इतिहासात अजरामर आहे. नंतर पुढे महाप्रजापती गौतमी यांनीही स्त्रियांसाठी भिक्खुणी संघ स्थापनेची विनंती केली, जी पुढे मान्य झाली आणि इतिहासात प्रथमच महिलांनाही धम्ममार्ग खुला झाला.
फाल्गुन पूर्णिमेचे बुध्द जीवनात त्रिगुणी महत्त्व काय आहेत ? Buddha Dhamma
फाल्गुन पूर्णिमा बौद्ध परंपरेत तीन कारणांनी विशेष महत्त्वाची मानली जाते:
- भगवान बुद्धांचे कपिलवस्तू आगमन
- राहुल आणि नंद यांची दीक्षा
- कुटुंबीयांनी धम्मस्वीकाराचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय
फाल्गुन पोर्निमेचा हा दिवस आपल्याला त्याग, करुणा, समता आणि धम्मनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा देतो. फाल्गुन पोर्णिमेच्या दिवशी आपण बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण करून, समता, बंधुता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारूया.
जय भीम! नमो बुद्धाय!
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
