|

राज्यात GBS Virus चा उद्रेक; आजच धक्कादायक माहिती आली समोर !

GBS च्या वाढत्या केसेस – नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

महाराष्ट्रात GBS Virus चा उद्रेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आजारामुळे स्नायू दुर्बलता, मुंग्या येणे आणि अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसत आहेत. राज्यातील वाढत्या प्रकरणांमागील कारणे, लक्षणे आणि आवश्यक खबरदारी जाणून घ्या.

महाराष्ट्रात GBS चा वाढता धोका – जाणून घ्या कारणे आणि लक्षणे!

हा आजार दूषित पाण्यापासुन तसेच खाण्यातून हे Infection होतं असल्याच्या सांगितल्या जात आहे. ज्याला हा आजार होतो त्याच्यामध्ये काही लक्षणे सुध्दा दिसुन येतात जसे उलटी होणे, जुलाब, असे लक्षणे दिसुन येतात. यासोबतच ज्याला हा आजार झालेला असेल त्याच्यामध्ये दोन ते तीन आठवड्यानंतर पायापासून अशक्तपणा चालू होतो अशी लक्षणं दिसतात रुग्नामध्ये दिसुन येतात. शरिरामध्ये अशक्तपणा चालू होतो आणि अंगात मुंग्या येतात नंतर याचं जर प्रमाण वाढल म्हणजे या आजाराचं सिव्हिरिटी वाढली तर श्वास घ्यायला त्रास होणे, पाणी पिताना सुद्धा गिळण्यास त्रास होणे, अशी अशे लक्षणं रुग्नामध्ये दिसुन येतात.

GBS म्हनजे काय ?

Guillain Barre Syndrome असे या वायरस चे नाव आहे. गुहिलेन बॅरे सिंड्रोम काय आहे ? तर गुहिलेन बॅरे सिंड्रोमचा हा एक दुर्मिळ असा आजार आहे. प्रत्येक वर्षाला एक लाख लोकांमध्ये केवळ एका व्यक्तीला हा आजार होतो. याचं निदान सांगन थोडं गुंतागुंतीचं आहे, यामध्ये हा आजर ज्याला होतो त्याला चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लूइड चाचण्या याच्या निदानाकरता आवश्यक असतात.  आयव्हीआयची किंवा प्लाज्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला या आजारापासुन मदत होते.  ह्या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होतात! 20% रुग्णांना सहा महिन्यानंतरही हालचाली करण्यामध्ये थोड्याप्रमाणात अडचणी येऊ शकतात असे तंज्ञान्चे मत आहे.

GBS महाराष्ट्रात का वाढतोय? तज्ज्ञांचे मत आणि खबरदारीचे उपाय

काही तज्ञांच्या मतानुसार ह्या आजारा मुळे स्नायु कमजोर होतात, स्नायु कमजोर झाल्यामुळे रुग्नाला वेदना होतात, व्यक्तीच्या स्नायूची संवेदना कमी होते चेहरा, छाती, शरीरातील स्नायू वर या वायरस चा परिणाम होतो. या आजारामुळे व्यक्तिला अर्धांगवायू आणि श्वसन चा त्रास होतो. हाताची बोट त्यासोबतच रुग्नाच्या पायामध्ये वेदना होतात. चालताना समस्या येतात, व्यक्ती चिडचिड होतो त्याचा चेहरा व शरिरामध्ये कमजोरी ही प्रमुख लक्षण त्याच्यामध्ये आढळुन येते.

GBS Virus पासुन वाचण्यासाठी खबरदारीचे उपाय

खबरदारीचे उपाय म्हनुन कशी काळजी घ्यायची? तर हाथ वारंवार स्वच्छ धुवायला हवेत, त्यासोबतच इतर संक्रमित रुग्णांपासुन दूर रहा, शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी योग्य आहार घ्यायला हवा आणि व्यक्तिने नियमित व्यायाम करायला हवा. सोबतच शरीरात मुंग्या येत असतील तर किंवा अशक्तपणा जानवत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. घरी उपचार न करता डॉक्टराचा सल्ला घ्या.

अकोल्यात GBS चे रुग्न आढळून आल्याने चिंता !

अकोला जिल्ह्यात जीबीएस बाधित पाच रुग्ण आढळुन आलेले आहेत.  जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या रुग्नांवर पाच जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासोबत खबरदारी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे.  अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जीबी सिंड्रोमचे – जीबी चे पेशंट पाच होते त्यापैकी एकाची तब्येत चांगली होती म्हणून त्याला रुग्नालयामधुन सुट्टी देण्यात आली. आता एकूण चार पेशंट जीएनसी मध्ये आहेत. त्यामधले तीन पेशंट वार्ड मध्ये आहेत. आणि एक रुग्न जो जास्त प्रमाणात आजारी आहे त्याला आयसीयू ची केअर आहे त्याला आयसीयू मध्ये ठेवलाय. त्यामुळे अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सध्या या जीबीएस च्या अनुषंगाने सतर्क झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे.

GBS मुळे पूणे जिल्ह्यात रुग्नाचा म्र्युत्यू !

पुणे जिल्ह्यात आज जीबीएस वायरस मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्न पुणे शहरातील आहे जो जीबीएस बाधित रुग्णाचा दुसरा मृत्यू झाला आहे तो पुण्यातील नांदेड गावातील 60 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक यांचा मृत्यू उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. मागील पंधरा दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये या रुग्नावर उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत.

पुण्यातील पिंपरी येथे जीबीएस मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय; हा रुग्न पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या 36 वर्षीय युवकाला 21 जानेवारी रोजी जीबीएस ची लागण झाली होती या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते या रुग्णाला जीबीएस नंतर निमोनियाची सुध्दा लागण झाली होती उपचारा दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला उपचारात हायगाय झाली का याची चौकशी करण्यासाठी आयसीएम ने समिती स्थापन केलेली आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *