Ghibli फोटो तयार करताय? हे वाचा आधी – तुमचं खाते रिकामं होऊ शकतं!
Ghibli फोटो तयार करताय? तुमचं खाते रिकामं होऊ शकतं!
Ghibli फोटो ट्रेंडच्या नादात तुम्ही बँक खातं रिकामं करताय का? नागपूरमध्ये वाढलेले सायबर फसवणुकीचे प्रकार पाहून पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा! फसवणूक टाळण्यासाठी हे वाचा.
Ghibli फोटोच्या ट्रेंडमागे सायबर फसवणुकीचं सावट; नागपूरमध्ये अनेकांच्या खात्यातील पैसे गायब !
नागपूर – मागिल काही दिवसांपासुन प्रत्येकाच्या मोबाईल वर म्हणजेच सोशल मीडियावर Ghibli इमेज’चा ट्रेंड प्रचंड वेगाने पसरत आहे. म्हणजे आपले फोटो या Ghibli च्या माध्यमातुन तयार करुन सोशल मिडीयामध्ये अपलोड करित आहेत, या फोटोंची आकर्षकता इतकी आहे की सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी, तसेच राजकारणीसुद्धा या ट्रेंडच्या नादाला लागले आहेत. मात्र, या ट्रेंडच्या आडून सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचं जाळं पसरवलं आहे हे तुम्हाला माहिती आहेका ? नाही तर हि बातमी केवळ तुमच्यासाठी असून या ट्रेंड च्या माध्यमातुन नागपूरमध्ये अशा प्रकारांमध्ये अनेक घटना घडल्या आहेत व त्याला नागरिक बळी पडले आहेत.
सावधान! ‘Make Ghibli Photo’ लिंकवर क्लिक केला तर बँक खाते रिकामं
बर्याच मोबाईलवर सायबर गुन्हेगार Ghibli फोटो तयार करा’ अशा प्रकारच्या बनावट लिंक्स सोशल मिडियाच्या WhatsApp, Instagram, Facebook अशा प्लॅटफॉर्म्सवर पाठवत आहेत. व या लिंक्सवर क्लिक करताच वापरकर्त्यांना त्यांचा फोटो अपलोड करण्यास सांगितले जाते आणि त्यानंतर त्यांना गिबली स्टाईलमध्ये एडिट केलेले फोटो डाउनलोडसाठी पाठवले जातात. मात्र, या फोटोंच्या फाईल्समध्ये मालवेअर किंवा ट्रोजन घातलेले असतात जे सामान्य युजरकर्ता ओळखु शकत नाही व त्याचाच फायदा सायबर गुन्हेगारानी घेतलेला आहे.
या माध्यमातुन वापरकर्ता जेव्हा त्याचा फोटो डाउनलोड करतो, तेव्हा हे मालवेअर त्यांच्या मोबाईल किंवा संगणकात सक्रिय होतात आणि त्यातून बँक अकाउंटशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करुन युजर्स ची पर्सनल माहिती चोरी केली जाते. या माहितीचा वापर करून सायबर चोरटे बँक खात्यातून पैसे काढून घेतात.
राज्यातील नागपूरमध्ये याच पद्धतीने सायबर गुन्हेगारानी अनेक नागरिकांचे बँक खाते रिकामे केले आहेत. यासंदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या असून सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे, तसेच अश्या प्रकारच्या फ्रॉडपासुन वाचावयास सांगितले आहे.
Ghibli फ्रॉड संदर्भात सायबर पोलिसांचा इशारा
- युजरकर्त्याने कोणत्याही प्रकारच्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये.
- ‘गिबली फोटो’ तयार करण्याच्या नावाखाली येणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नका, अथवा त्यावर क्लिक करु नका.
- आपली बँक माहिती किंवा मोबाईल नंबर किंवा कुठल्याही प्रकारची पर्सनल माहिती अशा लिंक्सवर कधीच शेअर करू नका अथवा कुनाला सांगु नका.
- आपल्या मोबाईल व संगणकातील अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा.
- आपण केवळ फक्त अधिकृत आणि विश्वासार्ह वेबसाईट्सवरूनच फोटोज अपलोड किंवा डाउनलोड करा जे शासन मान्य आहेत.
Ghibli च्या माध्यमातुन होत असनार्या फ्रॉड संदर्भात नागपुर पोलिसानी या संदर्भात जनजागृतीची मोहीम राबवीली आहे. सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग असलेल्या कोणत्याही गोष्टींचा भाग होताना नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणं गरजेचं आहे, अन्यथा आकर्षक फोटोच्या नादात आपली मेहनतीची कमाई गमवावी लागू शकते.

🌟 Ghibli ट्रेंड काय आहे?
Ghibli ट्रेंड म्हणजे एक असा व्हिज्युअल ट्रेंड आहे, जो प्रसिद्ध Studio Ghibli या जपानी अॅनिमेशन स्टुडिओच्या खास अॅनिमेशन स्टाईलवर आधारित आहे. ज्यामध्ये सोशल मीडियावर लोक आपले काही फोटो Ghibli सारख्या अॅनिमेटेड लूकमध्ये कन्व्हर्ट करतात व ते फोटो सोशल मिडीयावर शेअर करत आहेत यालाच ‘Ghibli Image Trend’ म्हणून ओळखलं जातं.
🖼️ Ghibli ट्रेंड कसा काम करतो?
इंटरनेटवर काही AI टूल्स च्या माध्यमातुन किंवा वेबसाईट्सवर तुम्ही तुमचा फोटो अपलोड करता. व नंतर त्या फोटोला Studio Ghibli च्या अॅनिमेशनसारखा देखावा दिला जातो ज्यामध्ये मोठे डोळे, सौम्य रंगसंगती, निसर्गरम्य पार्श्वभूमी वगैरे निर्माण केल्या जाते. हा तयार फोटो अगदी “Spirited Away” किंवा “My Neighbor Totoro” यासारख्या Ghibli चित्रपटातल्या दृश्यांसारखा वाटतो. जो अतिशय आकर्शक स्वरुपाचा वाटतो. व नंतर हा फोटो अनेकजन आपल्या सोशल मिडीयातील Instagram, WhatsApp, Facebook वर शेअर करत आहेत.
⚠️ धोका काय आहे?
Ghibli ची ही लोकप्रियता पाहून काही सायबर गुन्हेगार बनावट Ghibli फोटो तयार करणाऱ्या वेबसाइट्स तयार करत आहेत. व या वेबसाइट्समध्ये:
- बनावट लिंक पाठवून वापरकर्त्यांचे फोटो, माहिती घेतली जाते.
- त्या माध्यमातून मालवेअर किंवा ट्रोजन व्हायरस मोबाईलमध्ये येतो.
- आणि मग त्याचं कारण होऊन बँक खाते रिकामं केलं जातं.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
