Gold Rate Today 27 January 2026: सोन्याच्या दरात 1.61% वाढ आजचे नविन दर काय ?
मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू व दुबईतील Gold Rate Today जाणून घ्या ?
27 जानेवारी 2026 रोजी सोन्याच्या दरात 1.61% वाढ. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू व दुबईतील 22K, 24K Gold Rate Today जाणून घ्या. 27 जानेवारी 2026 रोजी देशात व राज्यात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून सोन्याचा दर २७ जानेवारी रोजी 1.61 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळ आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा ₹1,58,960 प्रति 10 ग्रॅम इथपर्यंत पोहचला असून कालच्या तुलनेत आजच्या दरात ₹2,520 ची वाढ झाल्याचे दिसत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,45,713 प्रति 10 ग्रॅम वर येउन पोहचला आहे.
आजच्या दिवसतिल सोन्याचे दर (₹ प्रति 10 ग्रॅम) किती आहेत ?
| प्रकार | आजचा दर (₹) | कालचा दर (₹) | वाढ (₹) |
| 24 कॅरेट | 1,58,960 | 1,56,440 | 2,520 |
| 22 कॅरेट | 1,45,713 | 1,43,403 | 2,310 |
| 18 कॅरेट | 1,19,220 | 1,17,330 | 1,890 |

भारत विरुद्ध दुबई येथील सोन्याच्या दरातील मोठा फरक किती आहे ?
27 जानेवारी 2026 रोजी देशातील 24 कॅरेट सोन्याचा दर जर आपण पाहिला तर तो ₹1,58,960 इतका आहे तर, दुबईमध्ये तो केवळ ₹1,12,816 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यामुळे दुबई च्या तुलनेत भारतातील सोनं हे ₹46,144 म्हणजेच सुमारे 40.90% महाग असल्याचे समजत आहे. तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरातही भारत व दुबईमध्ये जवळपास 40.90% चा फरक असल्याचे समजत आहे. हा (कर, शुल्क व आयात कर वगळून) सांगण्यात येत आहे.
आज सोन्याचा दर का वाढला?
आज सोन्याच्या दरात लाक्षनीय वाढ होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत? जागतिक भू-राजकीय तणावात प्रतिदिन वाढ होत असल्या कारणाने तसेच 🇺🇸 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा व दक्षिण कोरियावर जास्त आयात शुल्क लावण्याची धमकी दिली असल्या कारणाने याचा फटका सर्व स्तरात होताना दिसत आहे. ट्रंप यांच्या वक्तव्यामुले
डॉलर निर्देशांकात कमजोरी हाल्याचे दिसत आहे तसेच त्यामुले अमेरिकन फेडकडून व्याजदर कपातीची शक्यता वर्तवली जात आहे, व केंद्रीय बँकांकडून सोन्याची सातत्याने खरेदी करत असल्याचे बोलले जात आहे, आणि गोल्ड ETF मध्ये मजबूत गुंतवणूक सुरु असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळ या सर्व कारणांमुळे सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven) म्हणून सोन्याची मागणी होत आहे व् याचाच परिणाम म्हणून सोन्याचे भाव हे वाढत आहे.
गुंतवणूकदारांसाठी सोन्याचा पुढील अंदाज
तज्ज्ञांच्या मते, डॉलर कमजोर राहिल्यास त्याचा जागतिक तणाव वाढत राहिल्यास आणि केंद्रीय बँकांची खरेदी कायम राहिल्यास तसेच सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे. नुकत्याच आगामी अमेरिकन फेडच्या बैठकीत फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या वक्तव्याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे, ज्यावरून सोन्याच्या किमतींची पुढील दिशा ठरू शकते.
सोन्याचे दर नेहमी चढ-उतार का होत असतात?
सोनं ही केवळ आता दागिन्यांची वस्तू नसून राहिली ती आता जागतिक आर्थिक अस्थिरतेचा आरसा मानली जाते. खालील घटकांमुळे सोन्याचे दर सतत बदलत असतात:
- डॉलरची किंमत : डॉलर कमजोर झाला की सोनं स्वस्त वाटते, त्यामुळे मागणी वाढते.
- आंतरराष्ट्रीय तणाव : युद्ध, व्यापार युद्ध, निर्बंध यावेळी गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात.
- व्याजदर : बँकांचे व्याजदर कमी असतील तर सोनं अधिक आकर्षक ठरते.
- भारतातील कर व आयात शुल्क : भारतामध्ये आयात शुल्क व GST मुळे सोनं दुबईपेक्षा महाग असते.
- केंद्रीय बँकांची भूमिका : जगभरातील केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढवत असतील तर दर वाढतात.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
सोन्याची खरेदी करण्यापूर्वी केवळ स्थानिक बाजारातील दर नाही तर आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलर इंडेक्स, फेडच्या धोरणांवर लक्ष ठेवा तसेच दीर्घकालीन दृष्टीने सोन्याचा कल तेजीचा (Bullish) राहण्याची शक्यता आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
