|

ह्बब..! हिंगोलीत तब्बल 14,000 महिला Cancer संशयित रुग्न आढळले ! सर्वत्र भीतीचे वातावरण   

हिंगोलीत महिलांमध्ये कर्करोगाचं Cancer  वाढतं प्रमाण; तब्बल १४,००० संशयित रुग्ण आढळले !

Hingoli Heath News ९ एप्रिल: कर्करोग (Cancer) म्हटलं की या आजाराची सर्वांनाच भीती वाटते, आणि राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील सध्याची स्थिती ही सम्पुर्ण राज्याची चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यात एक अभियान राबविण्यात आले या संजीवनी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १३,९५६ महिलांमध्ये कर्करोगाची Cancer  लक्षणं आढळली आहेत. या धक्कादायक आकडेवारीमुळे हिंगोली महाराष्ट्रातील संभाव्य Cancer  चे अर्थात कर्करोग हॉटस्पॉट बनत असल्याची भीती सम्पुर्ण स्तरातुन व्यक्त केली जात आहे.

हिंगोलीत १३,९०० महिला कर्करोग संशयित; जिल्हाधिकारी अभिवन गोयल यांनी दिली महिती

हिंगोली, ९ एप्रिल: हिंगोली जिल्ह्यात संजीवनी अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सुमारे १३,९०० महिला कर्करोग संशयित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण तीन लाखांहून अधिक महिलांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानंतर लक्षणं असलेल्या महिलांची तपासणी आणि योग्य उपचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सर्वाधिक प्रकरणं गर्भाशयाच्या कर्करोगाची Cervical Cancer

संजीवनी अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील १ लाख महिलांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामधील या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमान खालीलप्रमाने आहे.

  1. ७,५२४ महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणं आढळून आली. तर
  2. ३,७३३ महिलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं आढळली आहेत, तसेच
  3. २,६९९ महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं आढळून आली आहेत. या अहवालामुळे सम्पुर्ण राज्यात व विशेषत: जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

हिंगोलीतील आरोग्य विभागाने काय कार्यवाही केली आहे ?

या धक्कादाय आकडेवारीनंतर आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून जिल्ह्यातील सम्पुर्ण तालुका स्तरावर आता तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच संशयित महिलांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी व्हीआयए टेस्ट, गरज असल्यास बायोप्सी तसेच इतर आवश्यक निदान करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

कर्करोगाची लक्षणं आणि जनजागृतीची गरज !

Cancer  कर्करोगासारख्या गंभीर आजारात वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य होऊ शकतात, पण अनेकदा आपण प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे असे केल्याने स्थिती बिघडते.

Cancer  ची प्राथमिक लक्षणांमध्ये  ?

  • ओटीपोटात वारंवार वेदना
  • वजनात अचानक बदल
  • गिळताना त्रास
  • त्वचेतील बदल
  • सतत पोटदुखी, मळमळ
  • तीव्र डोकेदुखी

जर आपल्याला वरिल लक्षण आपल्यामध्ये दिवस असतील तर आपण तत्काळ या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिवन गोयल यांची माहिती

हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिवन गोयल यांनी सांगितलं की, “८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या दिवसाला ‘संजीवनी अभियान’ सुरू करण्यात आलं. या अभियाना अंतर्गत ३ ते ३.५ लाख महिलांचं आशा कार्यकर्तींमार्फत सर्वेक्षण करण्यात आलं होत त्यामध्ये तब्बल १३,९०० महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळली आहेत.”

पुढील टप्प्यातील तपासणी आणि उपचार

या सर्व संशयित महिलांची आता PHC, RH, SDH आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाणार आहे. यासोबतच या सर्वांची तपासणीत VIA टेस्ट (Visual Inspection with Acetic Acid) केली जाईल व त्यांच्यामध्ये जर लक्षणांची पुष्टी झाल्यास त्यांच्यावर बायोप्सीद्वारे निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी यानी दिली.

हिंगोली जिल्ह्यात महिलांमध्ये मुख्यतः कोणते प्रकार आढळून आले ?

या अभियानातील तपासणीत महिलांमध्ये गर्भपिशवी (गर्भाशय) आणि स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं अधिक प्रमाणात आढळली आहेत. आता या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद एकत्रितपणे काम करत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ही गंभीर स्थिती वेळेवर हाताळल्यास अनेक महिलांचे प्राण वाचवता येऊ शकतात. जिल्हा प्रशासनाची ही मोहीम इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते.

निष्कर्ष

हिंगोली जिल्ह्यातील ही स्थिती केवळ एक जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यासाठी गंभीर इशारा आहे. वेळेवर या आजाराचे निदान आणि उपचार, तसेच लोकांमध्ये या आजाराबद्दल जनजागृती हेच कर्करोगावर मात करण्याचे प्रभावी उपाय आहेत.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *