Weather Alert: हिंगोलीत पावसाने उडवली धांदल, शाळा बंद, नागरिकांची तारांबळ
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार – नद्या-नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प, शाळांना सुट्टी Weather Alert
हिंगोली जिल्ह्यातील weather update: मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प, शाळांना सुट्टी. शेती शिवारात पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले.
हिंगोली (Weather Update) : हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभर्यापासुन मुसळधार पावसाने थैमान घातले असून यामुळे जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर शेती शिवारात पाणी शिरल्याने खरीप पिकांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
नद्या-नाल्यांना पूर, वाहतूक बंद हिंगोली Weather Update
काल रात्री विजांच्या कडकडाटासह सुरुवात झालेल्या पावसाचा जोर आज दुपारी दोन वाजेपर्यंत कायम होता. जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने सालेगाव–सांडस मार्ग बंद झाला आहे. इसापुर धरणातून पाणी सोडल्याने पेनगंगा नदीला पूर आला असून पुसद–कळमनुरी–हिंगोली मार्गावरील शेंबाळपिपरी येथील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
हिंगोली गावोगावी पाणी, घरे झाले जलमय !
जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील वस्त्यांमध्ये घरे पाण्याखाली गेली आहेत यामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. पांगराशिंदे गावालगतच्या ओढ्याला पूर आल्याने काही घरांच्या उंबरठ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. वापटी गावालगतच्या पुलावर पाणी वाहत असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर
कळमनुरी तालुक्यातील कुपटी गावाजवळील तलावाचा काही भाग वाहून गेला असून पाणी थेट शेतांमध्ये शिरले आहे. त्याचप्रमाणे दांडेगाव येथेही पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पावसामुळे हिंगोलीत शेतीचे मोठे नुकसान
चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेती शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी खरीप पिके पाण्यात वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे.
पावसामुळे प्रशासन सतर्क
हिंगोली–समगा मार्गावरील लहान पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यरत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
