HMPV व्हायरस: लक्षणे, उपचार, प्रतिबंध आणि महत्त्वाची माहिती
HMPV व्हायरस म्हणजे काय? लक्षणे, उपचार, वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय यांची सविस्तर माहिती. आपल्या कुटुंबासाठी आवश्यक खबरदारी घ्या.
HMPV व्हायरस म्हणजे काय?
HMPV हा श्वसन संस्थेशी संबंधित व्हायरस आहे. तो पहिल्यांदा 2001 साली ओळखला गेला. हा व्हायरस मुख्यतः थंडी, खोकला, श्वास घेण्यात अडचण यांसारख्या आजारांमुळे ओळखला जातो.
HMPV व्हायरस महत्त्वाची माहिती
एचएम टीव्ही अर्थात ह्युमन मेटा न्यू व्हायरस जो आहे याची लागण पहिल्यांदा जी आहे ती चीनमध्ये झालेली होती. आता भारताची एक चिंता वाढवणारी गोष्ट अशी आहे की भारतातल्या बंगळुरू शहरामध्ये एका आठ महिन्याच्या चिमुकलीला जे लहान बाळ आहे तिला या विषाणूची लागण झालेली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, आजारामध्ये सर्दीपडसा आणि त्यावरून श्वसनाचं जे संक्रमण आहे ते वाढत असतं आणि त्यातून हा आजार खरंतर उद्भव असतो आणि लहान मुलं, सोबतच वृद्ध असतील किंवा कमी रोग प्रतिकारशक्ती असेल त्यांच्यामध्ये या विषाणूची लवकर लागण होते.
WHO ने WMPV बद्दल दिलेले निर्देश
who ने याबाबत काही पाळावयाचे निर्देश देखील जारी केलेली आहे त्यामध्ये त्यानी असे म्हटले आहे वारंवार साबनानं हात धुवा म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये ऍडव्हायझरी होती तशीच ऍडव्हायझरी सध्या जारी केली आहे. सोशल मीडियावर प्रामुख्यानं इंग्रजी माध्यमांमध्ये सीन मधल्या ज्या बातम्या येतात त्यामुळे संपूर्ण देशभरात सध्या भीतीच वातावरण आहे.
HMPV व्हायरसची लक्षणे:
नाक वाहणे, सतत खोकला, ताप, थकवा, श्वास घेण्यात त्रास, न्यूमोनियासारख्या स्थिती हि या आजाराची प्रमुख लक्षने आहेत.

HMPV व्हायरस पासुन वाचन्याचे उपचार आणि काळजी:
सध्या HMPV साठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस अजून पर्यंत नाही त्यामुळे लक्षणांवर आधारित उपचार केले जातात असे काही आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
भरपूर पाणी प्या, शरीराला विश्रांती द्या, ताप किंवा खोकल्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेली औषधे घ्या.
HMPV व्हायरस बद्दल अनेक डॉक्टरांची मते ?
महाराष्ट्रात सुद्धा एचएम पीव्ही विषाणू बाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यामध्ये चिंतेचे वातावरण तयार झालंय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे यासोबतच अनेक डॉक्टरानी आपआपली मते व्यक्त केलेली आहेत. अनेक जण एचएम पीव्ही चा संबंध कोरोनाशी जोडतायत पण एचएम पीव्ही बाबत काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं तज्ञ डॉक्टरांचे म्हणणं आहे. जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यानी आपले मत व्यक्त केले आहे. एक दोन पेशंट महाराष्ट्रामध्ये आढळुन आलेत परंतु घाबरुन जान्याचे काहीही कारन नाहि असेही त्या म्हणाल्या.
नागपुर येथे HMPV व्हायरस रुग्न आढळुन आल्याने खळबळ !
नागपूरमध्ये एचएम पीव्ही व्हायरसचे दोन रुग्ण आढळलेत दोन लहान मुलांचा रिपोर्ट हा एचएम पीव्ही पॉझिटिव्ह आलाय सात वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खाजगी रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली होती मात्र या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता दोन्ही मुलांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज भासली नाही हे दोघेही घरीच उपचार घेत आजारातून बरे झाल्याची माहिती मिळाली आहे.
हिवाळ्यामध्ये एचएम पीव्ही व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो असं तज्ञ डॉक्टर सांगतात एचएमपी वायरसमुळे सर्दी किंवा खोकला होतो किंवा सौम्य ताप येतो त्यात, चिंता करण्यासारखं काहीही नाही मंगळूर मधील दोन प्रभावित नवजात बालकांच्या जीवाला देखील कोणत्याही प्रकारचा धोका नाही. लहान मुलांमध्ये एचएमपी वायरसचा प्रादुर्भाव कमी होतो रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाणही कमी आहे त्यामुळे काळजी घ्याच मात्र घाबरू नका ह्युमन मेटानेमो व्हायरस एचएम पीव्ही हा लाखो व्हायरस प्रमाणेच एक व्हायरस आहे सर्दी खोकला आणि सौम्य ताप ही या व्हायरसची लक्षणं आहेत पाच वर्षांखालील सगळ्याच लहान मुलांना एचएम पीव्ही चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे नऊ महिन्यांच्या आत जन्मलेली बाळ किंवा दमा असलेल्यांना या व्हायरसचा धोका अधिक आहे एचएम पीबी मुळे जीवाला धोका निर्माण होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे त्यामुळे कोविड-19 विषाणूशी याची तुलना करू नका तसं करणे योग्य नाही या व्हायरस अस्तित्व पहिल्यांदा 2001 सिद्ध झालंय मात्र एचएम पीव्ही व्हायरस किमान 50 ते 70 वर्षांपासूनच अस्तित्वात आहे असं तज्ञ मानतात जगात अनेक ठिकाणी हिवाळ्याच्या दुसऱ्या उत्तरार्धात एचएम पीव्ही चा प्रादुर्भाव वाढतो तरिदेखील जास्त प्रमानामध्ये घाबरुन जान्याचे कारन नाही असे अनेक तज्ञांचे मत आहे.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

One Comment