“हा शेवट नाही, फक्त सुरुवात आहे” – Harampreet Kaur चं Emotional वक्तव्य World Cup विजयावर!
India Wins Women’s World Cup! Harampreet Kaur ने सांगितला विजयानंतरचा गुपित मंत्र
२०२५मध्ये भारताने पहिल्यांदाच महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आहे! महिला संघाच्या कर्णधार (Harampreet Kaur) हरमनप्रीत कौरने विजयावर भाष्य करत म्हटलं – “हा शेवट नाही, फक्त सुरुवात आहे.” नवी मुंबईतील प्रेक्षकांचे आभार मानत ती म्हणाली की संघाने आत्मविश्वास आणि सकारात्मकतेच्या जोरावर परिस्थिती बदलली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल जाणून घ्या सविस्तर.
“हा शेवट नाही, फक्त सुरुवात आहे!” असेकाम्हणाली Harampreet Kaurभारताने महिला वर्ल्ड कप जिंकत रचला इतिहास;
नवी मुंबईतील चाहत्यांचे हरमनप्रीतनेआभार मानत पुढे म्हणाली – “आमच्याकडे परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी खास होते”
नवी मुंबई :
नुकताच भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे! प्रथमच भारताने महिला वर्ल्ड कप जिंकत संपूर्ण देशाचीमान अभिमानाने उंचावलेली आहे. या झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आपल्या भावनिक आणि प्रेरणादायी वक्तव्याने सर्वांचे मन जिंकले आहे.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर Harampreet Kaurम्हणाली –
“तिने सर्वप्रथम नवी मुंबईतील प्रेक्षकांबद्दल बोलताना म्हटलेआहेकी, मी खूप आभारी आहे. ते खरोखरच अद्भुत आहेत. आमच्या सामन्यादरम्यान सर्व चढ-उतारांमध्ये आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही सलग तीन सामने हरलो होतोतरी आम्ही आमचाआत्मविश्वास कायम ठेवला. आम्हाला माहित होते की परिस्थिती बदलण्यासाठी आमच्याकडे काहीतरी खास आहे.”
हरमनप्रीतने पुढे सांगितले की, “जेव्हा लॉरा आणि सुने फलंदाजी करत होत्या, तेव्हा त्या खूप चांगल्या दिसत होत्या. पण ज्या वेलेस शफालीने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, तेव्हा मात्रमला जाणवले की हा आपला दिवस आहे. मी माझ्या अंतर्मनावर विश्वास ठेवला आणि तिला एक षटक दिलं — तोच आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला असेमलावाटते.”
ती म्हणाली, “या सामान्या दरम्यान शफाली खूप सकारात्मक होती. तसेचती म्हणाली होती की जर गोलंदाजी मिळाली, तर ती दहा षटके टाकेल. याचेश्रेय तिलाच जाते, कारण तिच्या आत्मविश्वासामुळे आम्ही परत सामन्यात आलो.”
दक्षिण आफ्रिकेच्या खेळावर भाष्य करत हरमनप्रीत म्हणाली –
“आजच्या सामन्या दरम्यान खेळपट्टी पूर्णपणे वेगळी होती. आम्हाला माहित होते की या सामन्यात धावसंख्या पुरेशी आहे. दक्षिण आफ्रिकेने सुंदर फलंदाजी केली, पण शेवटी ते दबावाखाली आले आणि आम्ही सामन्यात परतलो. यादरम्यानच योग्य वेळी दीप्ती आली आणि महत्वाच्या विकेट्स घेतल्या.”
भविष्यासाठी हरमनप्रीतचा निर्धार –
“प्रत्येक वर्ल्ड कपनंतर आम्ही विचार करत होतो की ती रेषा आम्हीकेव्हा ओलांडू. आज आम्ही तो अडथळा तोडला आहे. पण हा शेवट नाही — ही तरफक्त आमचीसुरुवात आहे. पुढे आणखी मोठ्या गोष्टी आपल्या वाट्याला येणार आहेत. आम्ही सतत स्वतःलासुधारत राहू.”
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात जल्लोष सुरू झाला आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच महिला वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. तिच्या नेतृत्वगुणांमुळे आणि संघाच्या एकजुटीमुळे हा विजय शक्य झाला.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.
