|

जेठालाल तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडन्याच्या तयारीत

जेठालाल तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडन्याच्या तयारीत

भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले लहान पडद्यावरील मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मागील अनेक दशकांपासून चर्चेत आहे त्याचे विविध कारणे आहेत त्यापैकी काही कारणे येथे देत आहे यामध्ये वेगवेगळे कलाकार जसे की जेठालाल, चंपक चाचा, टप्पू, दयाबेन, भिडे, बबीता, अय्यर, सोदी, तारक मेहता, अंजली भाभी, डॉ हाती आणि आणखी बरेच कलाकार या मालिकेमुळे भारतामध्ये प्रचलित झाले आहेत. या सिरीयल मध्ये महत्त्वाची भूमिका अदा करणारा अभिनेता दिलीप जोशी हा चर्चेत आहे आणि तो चर्चेत असण्याचे कारण असे की त्याने तारक मेहता का उल्टा चश्मा या सिरीयलचे दिग्दर्शक असित कुमार मोदी यांची कॉलर पकडली आणि सिरीयल सोडण्याचे इशारा दिला.

का सोडत आहे जेठालाल तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका

न्यूज अठराच्या माहितीनुसार दिलीप जोशी अर्थात जेठालाल आणि तारक मेहता सिरीयलचे दिग्दर्शक असित मोदी यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासुन भांडणाला सुरुवात झाली खरं सांगायचं झालं तर हे भांडण त्यांच्या पगारावरून नाही तर सुट्ट्यांवरून झालेले आहे असे दिसते.

जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांना काही दिवसांसाठी सुट्टी हवी होती ते त्यांनी मालिकेचे दिग्दर्शक मोदी यांना मागितली परंतु मोदी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं व जेठालाल याना ते रुचलं नाही किंवा आवडलं नाही असं म्हटलं जातं की त्यांचं भांडण इतका वाढली की त्यांची मारामारी हाणामारी पर्यंत पोहचल.

सूत्रांना मिळालेल्या माहितीच्या आधारे असे दिसले की ?? यांचा शूटिंगचा शेवटचा दिवस होता त्यांनी असे म्हटले आहे की जेठालाल यांनी दिग्दर्शकाची येण्याची वाट पाहिली परंतु त्यांना त्यांच्याशी सुट्ट्यांविषयी बोलायचे टाळले होते पण ते आले नाही आणि थेट ?? भेटायला गेले त्यावरून जेठालाल चिडला आणि या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे आपल्याला दिसून येते एवढेच नाही तर त्यांचं भांडण एवढं वाढलं की जेठालाल यांनी असित मोदी यांची कॉलर धरली आणि तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो म्हणजेच मालिका सोडण्याचे धमकी सुद्धा दिली .

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका आता अनेक वादांमध्ये सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळते कारण अनेक अभिनेत्यांनी ही मालिका सोडली जसे सोडी, अंजली, डॉ हाती, तारक मेहता, अंजली भाभी असे अनेक प्रकारचे कलाकार टप्पू सेनेतील काही यांनीही मालिका सोडलेली आहे. दयावेन यांची प्रतीक्षा आजही सामान्य जनता करत आहे त्यामुळे दयाबेन सुद्धा त्या मालिकेतून निघून गेल्या की काय असा सवाल लोकांमध्ये आहे ? त्यामुळे या मालिकेचे भविष्यात होणार तरी काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे ?

जेठालालबद्दल काही महत्त्वाची माहिती:

  1. अभिनेते: हे पात्र दिलीप जोशी या उत्कृष्ट अभिनेत्याने साकारले आहे.
  2. व्यवसाय: जेठालाल गडा इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानाचा मालक आहे, जे गोकुलधाम सोसायटीच्या बाहेर स्थित आहे.
  3. कुटुंब:

– पत्नी: दया गडा (हास्यविनोदाच्या प्रसंगांमध्ये त्यांची जोडी खूप प्रसिद्ध आहे).

– मुलगा: टप्पू (त्याच्या खोडकर स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतो).

– वडील: चंपकलाल गडा (जेठालालसोबत सतत विनोदी वाद होतात).

  1. स्वभाव:

– जेठालाल नेहमीच अडचणीत सापडतो, विशेषतः बबिताजींवर त्याचा प्रेमाचा हळवा कोपरा असल्यामुळे.

– तो आळशी, पण मनाने चांगला आहे.

– दयाबेनच्या अनोख्या शैलीवर त्याचा कायम तक्रारीचा सूर असतो, पण त्याचवेळी तिच्यावर खूप प्रेम करतो.

  1. भाषा: जेठालालचा संवाद मुख्यत्वे गुजराती मिश्रित हिंदीत असतो, त्यामुळे तो अत्यंत मजेशीर वाटतो.

 मालिकेतील जेठालालची भूमिका:

– जेठालाल हे पात्र मालिकेतील मुख्य स्तंभ मानले जाते. त्याच्या सभोवती फिरणारे विनोदी प्रसंग मालिकेचे मुख्य आकर्षण आहेत.

– मित्रांच्या गटातही (विशेषतः तारक मेहताशी) त्याच्या चर्चा आणि अडचणी खूप मनोरंजक असतात.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालीकेबद्दल महिती

तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKUC) ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रदीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. ही मालिका Sony Sub TV वाहिनीवर 28 जुलै 2008 रोजी प्रसारित होऊ लागली. हि मालिका हास्य आणि कौटुंबिक मनोरंजन यांचा उत्कृष्ट नमुना आहे.

TMKUC  मालिकेबद्दल थोडक्यात माहिती:

  1. निर्माता: असित कुमार मोदी
  2. लेखन: ही मालिका ज्येष्ठ लेखक तारक मेहता यांच्या दुनिया ने उंधा चष्मा या गुजराती कॉलमवर आधारित आहे.
  3. प्रसारित करणारे चॅनल: सब टीव्ही
  4. शैली: कौटुंबिक विनोद आणि हलकीफुलकी मनोरंजन मालिका
  5. स्थान: मुंबईतील काल्पनिक गोकुलधाम सोसायटी

TMKUC महत्वाचे मुख्य पात्रे:

  1. जेठालाल चंपकलाल गडा (दिलीप जोशी):

गडा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक, हास्यप्रधान आणि नेहमीच अडचणीत सापडणारे मुख्य पात्र.

  1. दयाबेन (दिशा वकानी):

जेठालालची पत्नी, ज्याचे गरबा आणि अनोख्या शैलीतील संवाद हे मालिकेचे खास वैशिष्ट्य आहे.

  1. चंपकलाल गडा (अमित भट्ट):

जेठालालचे वडील, शांत व विनोदी स्वभावाचे पात्र.

  1. तारक मेहता (शैलेश लोढा/सचिन श्रॉफ):

जेठालालचे मित्र आणि मार्गदर्शक, मालिकेतील ‘सूट-शांत’ व्यक्तिरेखा.

  1. बबिता आणि अय्यर (मुनमुन दत्ता आणि तनुज महाशब्दे):

एक आधुनिक जोडपं, ज्यामुळे अनेकदा विनोदनिर्मिती होते.

  1. टप्पू सेना:

सोसायटीतील मुलांचा गट, जो प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतो.

TMKUC मलिकेचे प्रमुख वैशिष्ट्ये:

– सांस्कृतिक विविधता: मालिकेत भारतातील विविध प्रांतांचे लोक आणि त्यांच्या परंपरांचा समावेश आहे.

– सकारात्मकता: मालिकेत नेहमी आनंदी, सकारात्मक आणि एकत्र राहण्याचा संदेश दिला जातो.

– सर्वांसाठी विनोद: कुटुंबातील सर्व वयोगटासाठी मजेदार प्रसंग, त्यामुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे.

TMKUC मलिकेची लोकप्रियता:

  1. ही मालिका भारतातील सर्वाधिक TRP मिळवणाऱ्या मालिकांपैकी एक आहे.
  2. 4000+ भाग पूर्ण करून ही मालिका टीव्ही इतिहासात नवा विक्रम बनवते.
  3. पात्रांच्या संवाद शैली (उदा., “हे भगवान!” – जेठालाल, “टप्पू के पापा” – दया) आणि हास्यपूर्ण संवाद नेहमी चर्चेत राहतात.

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *