JNV Basmat, Hingoli येथे भव्य उत्साहात पार पडला Alumni Meet 2025
नवोदय स्पिरिट पुन्हा उजळलं — JNV Basmat चा Alumni Meet 2025
JNV Basmat, Hingoli येथे Alumni Meet 2025 उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांचे परिचय सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हिंगोलीत JNV Basmat चा संस्मरणीय Alumni Meet 2025 पार पडला
हिंगोली | जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, बसमत (JNV Basmat) येथे दि. ७ दिसम्बर रोजी Alumni Meet 2025 चे भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजन रोजी करण्यात आले. या निमित्ताने विद्यालयाचे राज्यात तथा देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने विद्यालयात दाखल झाले होते. त्यानी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, “एक कुटुंब – एक नवोदय” ही भावना पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी Alumni ना मिळाली.
Alumni Meet 2025 नवोदय गीताने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक तसेच नवोदयचे माजी विद्यार्थी श्री. गायकवाड सर आणि घटकांबळे सर यांनी कौशल्यपूर्ण शैलीमध्ये पार पाडले. कार्यक्रमाची सुरुवात नवोदय गीताने करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एकात्मता, नवोदयप्रेम आणि शालेय संस्कारांचा अद्भुत माहोल निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Alumni Meet 2025 चे स्वागत सत्र
Alumni Meet 2025 चे आयोजन नवोदय हिंगोली येथे करण्यात आले. ज्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री. गवई सर यांच्या हस्ते सर्व माझी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वाना विद्यार्थी निर्मित पुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.
Alumni Meet 2025 माजी विद्यार्थ्यांचा परिचय व मनोगत सत्र
स्वागत समारंभा नंतर Alumni परिचय सत्र पार पडले. डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, उद्योजक, प्रशासनातील अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, संघर्ष आणि यशस्वी प्रवास या प्रसंगी सर्वांसमोर मांडला त्यांच्या अनुभवानी उपस्तित विद्यार्थ्यांच्या मनोबलात वाढ झाली.

तसेच त्यांनी विद्यालयाच्या जडन घडणीतल्या भूमिकेचे विशेष कौतुक केले. अनेक Alumni यांनी पुढील पिढीसाठी करिअर मार्गदर्शन, तसेच सहाय्य देण्याचे आश्वासन, शैक्षणिक साधनांची उभारणी यासाठी हातभार लावण्याची तयारी या प्रसंगी व्यक्त केली.

Alumni Meet 2025 सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली
या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना त्यांच्या शालेय काळाची आठवण करून दिली. या प्रसंगी नृत्य, गीत, कविता आणि देशभक्तीपर सादरीकरणांनी विद्यालयाच्या वातावरणात उत्साहाची लहर पसरली.
विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा
या सम्पूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या मागील काही वर्षांतील विद्यालयाची प्रगती, उपलब्धी आणि नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच शैक्षणिक निकाल, क्रीडा क्षेत्रातील तसेच स्पर्धांतील सहभाग, राष्ट्रीय स्तरावरील उपलब्धी, पायाभूत सुविधा विकास याबाबत माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
Alumni Meet 2025 प्राचार्यांचे प्रेरणादायी अध्यक्षीय भाषण
या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे प्राचार्य श्री. गवई सर यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थित सर्व Alumni चे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी त्यांच्या वक्तव्या मध्ये विद्यालयाच्या उज्ज्वल वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच त्यानी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Alumni Meet 2025 जेवणासह समारोप – पुढील वर्षी भव्य आयोजनाचा संकल्प
कार्यक्रमानंतर सर्व Alumni करीता विद्यालायत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जुन्या मित्रांशी भेट, आठवणींना उजाळा आणि भावनिक क्षणांनी परिसर भारावून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
विद्यालयाने पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात आणि नव्या उपक्रमांसह Alumni Meet आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
Alumni Meet 2025 आभार प्रदर्शन
Alumni Meet 2025 च्या आयोजनामध्ये विद्यालायाचे कर्मचारी व्रुन्दानी केलेल्या कार्याचा आढावा देत विद्यालायाचे शिक्षक तथा नवोदय विद्यालायाचे माजी विद्यार्थी श्री. साहू सर यानी सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानी याप्रसंगी संगीत विभाग तसेच शिक्षिका हेमलता यांचे आभार तसेच कला शिक्षक श्री. दत्ता सर यांचे त्यासोबतच विद्यार्थी अनुशासना सबंधी विद्यालयाचे दोन्ही क्रीडा शिक्षक श्रीमती भगत मैडम तथा प्रशांत देवार्दे यांचे तथा कार्यक्रमाकारिता सर्वानी केलेल्या कार्याबद्दल सर्व विभागांचे आभार व्यक्त केले.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
