JNV बसमत, हिंगोली येथे राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहाचे भव्य उद्घाटन
प्राचार्य व ग्रंथपालांचा प्रेरणादायी संदेश—JNV बसमतमधील ग्रंथालय सप्ताह जाणून घ्या
JNV Basmat, Hingoli येथे National Library Week चे उद्घाटन प्राचार्य Shri. Gawai यांच्या हस्ते पार पडले. Librarian Sharad Khandare यांनी students ना आठवडाभर चालणाऱ्या library activities व competitions बद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने participation करण्याचे आवाहन.
JNV बसमत येथे विविध उपक्रम व स्पर्धांमधून विद्यार्थी ग्रंथसंपदेची ओळख करून घेणार !
राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय, JNV बसमत (जि. हिंगोली) येथे आज राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहाचा भव्य उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. जे. गवई सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या निमित्ताने विद्यालयाचे ग्रंथपाल श्री. शरद खंडारे यांनी विद्यार्थ्यांना सप्ताहातील सर्व उपक्रम, स्पर्धा व ग्रंथालयाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम — पुस्तक प्रदर्शन, वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पुस्तक समीक्षा, पोस्टर मेकिंग, भाषण प्रतियोगिता, रंगोली प्रतियोगिता यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा समारोपिय कार्यक्रम २६ नोव्हेंबर अर्थात संविधान दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रतिभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

JNV बसमत प्राचार्य श्री. गवई सर यांचा संदेश:
“विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग आहे. अश्याप्रकराचा उपक्रम तसेच ग्रंथालय सप्ताह हे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. मी विद्यालायाचा प्राचार्य या नात्याने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, आठवडाभर चालणाऱ्या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हा व ज्ञानसंपदेचा लाभ घ्या.”
JNV बसमत ग्रंथपाल श्री. शरद खंडारे यांचा संदेश:
कुठल्याही विद्यालायाचे “ग्रंथालय हे फक्त पुस्तकांचे भांडार नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे केंद्र आहे. या सप्ताहात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थी नवी माहिती, नवे विचार आणि सृजनशीलता विकसित करतील. अशी आशा त्यानी व्यक्त केली तसेच वाचनाने महत्त्व विद्यार्थी व् मनुष्य जीवनामध्ये किती आहे यावर प्रकाश टाकित त्यानी डॉ बाबासाहेब अंबेडकर यांचे विचार सांगितले ते म्हणाले होते की “वाचन हे मनाला अन्न पुरवित, त्या अन्नाच जार श्रवण केले तरच ते पचते व् तेव्हाच आपल्या बुद्धीचा विकास होतो.” या शब्दात त्यानी विद्यार्थ्याना प्रोत्साहित केले तसेच सर्वांनी या पुस्तक सप्ताहांत सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी करावा.”
संक्षिप्त बातमी
JNV बसमत येथे राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहाचे उद्घाटन प्राचार्य श्री. गवई सर यांच्या हस्ते पार पडले. ग्रंथपाल श्री. शरद खंडारे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण आठवड्यातील उपक्रमांची माहिती दिली. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवावा असे प्राचार्य आणि ग्रंथपाल यांनी आवाहन केले.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
